सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याच्या कामगारांना २०% सानुग्रह अनुदान

आवडल्यास ही बातमी शेअर करा

चेअरमन विवेकभैया यांची घोषणा, सरकार पाण्याचे दर कमी करणार

नगर : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना दिवाळीनिमित्त २० टक्के सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन विवेकभैया कोल्हे यांनी केली.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपन विजयादशमीच्या मुहुर्तावर कारखान्याचे संचालक निलेश देवकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सोनलताई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे होते.

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत संघर्ष केला आणि मोठे योगदान दिले आहे. त्यांच्याच पावलांवर पाउल ठेवून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखानदारीत आपले मार्गाक्रमण सुरू आहे. उस दरात आमचा साखर कारखाना कधीच मागे नव्हता आणि आताही राहणार नाही, यंदाही शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू, अशी ग्वाहीदेखील विवेकभैया यांनी दिली.

उद्योगांसाठी लागणा-या पाण्याचे दर वाढविल्याने सहकारी साखर कारखानदारीसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्य सहकारी साखर संघाच्या माध्यमातून निवेदन दिले, त्यावर शासनाने इथेनॉल प्रक्रियासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे दर कमी करण्याचे आश्वासन दिले आहे, असे विवेकभैय्या यांनी सांगितले. केंद्र शासनाने इथेनॉलबाबत शाश्वत धोरण घ्यावे म्हणजे आगामी हंगामात त्याचा सहकारी साखर कारखानदारीला फायदा होईल, असे आवाहनही त्यांनी केले.

कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविक केले. ते म्हणाले की, स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण भागात साखर कारखानदारीच्या माध्यमातून विकासाची झेप घेतली. युवा अध्यक्ष विवेकभैय्या हे सतत आधुनिकीकरणाचा ध्यास घेत शेतकरी सभासदांबरोबरच कारखान्यांच्या प्रगतीत भर घालत आहेत, बिपीनदादा यांच्या मार्गदर्शनांखाली कारखान्याच्या ३ MW टर्बाईनचे आधुनिकीकरण केले आहे. त्यामुळे ऑफ सीझनमध्येही सहवीज निर्मिती सुरू ठेवता येणार आहे.

उपाध्यक्ष गाडे यांनी आभार मानले. याप्रसंगी इथेनॉल व बायोफ्यूएल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या संचालकपदी निवड झाल्याबददल संचालकांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यांत आला.
या कार्यक्रमास संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे आजी माजी संचालक, उस उत्पादक शेतकरी, सभासद, खातेप्रमुख उपखातेप्रमुख, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »