कोल्हे कारखान्याच्या मिल रोलरचे विवेक भैय्या यांच्या हस्ते पूजन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोपरगांव :- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या २०२४ – २५ गळीत हंगामातील मिल रोलरचे पूजन चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते १३ ऑगस्ट रोजी विधिवत पार पडले.

प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविक करताना सांगितले की, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सन २०२४.२५ चा गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व नियोजन पूर्ण केले असून, त्यादृष्टीने काम सुरू आहे. कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन यावर्षीचे गाळप उद्दिष्ट पूर्ण करण्यावर व्यवस्थापनाचा भर आहे.

कार्मिक अधिकारी व्ही. एम. भिसे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
विवेक कोल्हे याप्रसंगी बोलताना म्हणाले की, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्याकडून मिळणारी प्रेरणा आणि संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, तसेच भाजप नेत्या सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातील सर्व संकटावर मात करून पुढे जात राहू.

याप्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री. त्रंबकराव सरोदे, बाळासाहेब वक्ते, रमेश आभाळे, विश्वासराव महाले, विलासराव वाबळे, सतीश आव्हाड, राजेंद्र कोळपे, ज्ञानदेव औताडे, अप्पासाहेब दवंगे, ज्ञानेश्वर होन, निवृत्ती बनकर, संजय औताडे, विलासराव माळी, बापूसाहेब बाराहाते, डी. पी मोरे, अमोल गवळी, कामगार नेते मनोहर शिंदे, वेणूनाथ बोळीज यांच्यासह सर्व खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब वक्ते यांनी आभार मानले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »