‘क्रांतिअग्रणी’ची निवडणूक बिनविरोध

सांगली : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार अरूणअण्णा लाड, शरद लाड यांच्यासह सर्व २१ संचालक बिनविरोध निवडून आले. आमदार लाड यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
नवनिर्वाचित संचालक :
आमदार अरुण गणपती लाड, शरद अरुण लाड, अनिल शिवाजी पवार, अविनाश राजाराम माळी, जितेंद्र निवृत्ती पाटील,
सतीश नाभिराज चौगुले, रामचंद्र गणपतराव देशमुख, संजय रामचंद्र पवार, अंजना गोरखनाथ सूर्यवंशी, अश्विनी श्रीरंग पाटील, सुकुमार रामचंद्र पाटील, वैभव विलास पवार,
जयप्रकाश दत्तात्रय साळुंखे, शीतल महावीर बिरनाळे, दिलीप बाबुराव थोरबोले, भगवंत तानाजीराव पाटील, प्रभाकर सावता माळी, अशोक बजरंग विभुते, सुभाष तम्मा वडेर, बाळकृष्ण शंकर दिवाणजी, संग्राम खनाजीराव जाधव.
सर्वांनी क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापूंच्या नावाला शोभेल असे काम करावे.. सरकारच्या धोरणांमुळे सहकार अडचणीत येत आहे; पण आपण सहकारातून बापूंचे विचार रुजवत आहोत. त्यामुळे येईल त्या अडचणी सोडवून सहकार टिकवून सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देऊया, असे प्रतिपादन आ. लाड यांनी यावेळी केले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. एस. एन. जाधव यांनी काम पाहिले.