कृष्णा ठरला साताऱ्यातील सर्वाधित ऊस दर देणारा कारखाना

सातारा : रेठरे बुद्रुक येथील कृष्णा कारखाना हा जिल्ह्यातील सर्वाधिक दर देणारा कारखाना ठरल्याचा दावा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे. कारखान्याने नुकताच ३ हजार ३११ रुपयांचा अंतिम ऊस दर जाहीर केला असून, विनाकपात १११ रुपयांचा अंतिम हफ्ताही लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला जाणार असल्याचे कारखान्याकडून सांगण्यात आले आहे.
रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी कारखान्याने उच्चांकी ऊस दराची परंपरा जपली आहे. सन २०२४-२०२५ सालच्या हंगामात गळितास आलेल्या ऊसासाठी ३ हजार ३११ रुपयांचा अंतिम दर जाहीर केला आहे. साखर कारखान्याने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा कारखान्याने सन २०२४-२५ सालच्या गळीत हंगामात १२,३९,००८ मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून सरासरी साखर उतारा १२.५७ टक्के राहिला आहे. तसेच १४,५१,१५७ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे.
कारखान्याने मागील गळीत हंगामासाठी ३ हजार ३११ रुपयांचा अंतिम दर जाहीर केला आहे. कृष्णा कारखान्यास २०२४-२५ सालच्या गळीत हंगामात ऊस घातलेल्या सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांना यापूर्वी ३ हजार २०० रुपयांप्रमाणे बिल अदा करण्यात आले आहे. तर आता विनाकपात १११ रुपयांचा अंतिम हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला जाणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी पत्रकात म्हटले.






