‘कृष्णा’ कारखान्याची कामगिरी आदर्श : डॉ. तानाजीराव चोरगे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

रत्नागिरी जिल्हा बँक सर्वतोपरी सहकार्य करणार

कराड : कृष्णा साखर कारखाना शेतकरी हिताचे अनेक उपक्रम राबवत आहे. शेतकऱ्यांना चांगला दर देत आहे. म्हणूनच कृष्णा कारखान्याची कामगिरी आदर्श मानली जाते,, असे गौरवोद्गार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. तानाजीराव चोरगे यांनी काढले.

सन २०२३-२४ या गळीत हंगामात यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या नऊ लाख एकव्या साखर पोत्याचे पूजनप्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, बाजीराव निकम, श्रीरंग देसाई, कार्यकारी संचालक राम पाटील व संचालक उपस्थित होते.
डॉ. तानाजीराव चोरगे म्हणाले, राज्यात अनेक साखर कारखाने आहेत. पण कृष्णा कारखान्याने चांगल्या कामांचा डोंगर उभा केला आहे. कृष्णा साखरेबरोबरच अनेक उपपदार्थ निर्मिती करत आहे. डॉ. सुरेश भोसले यांनी आपल्या कुशल नेतृत्वाखाली कारखान्याची यशस्वी घौडदौड चालू ठेवली आहे. भविष्यात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कृष्णा कारखान्याला सर्वोतोपरी सहकार्य करेल.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कमी कालावधीत कारखान्याने चांगले गाळप केले आहे. कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान यामध्ये दिले आहे. शेतकरी कृष्णा कारखान्यातच ऊस घालवण्यासाठी आग्रही आहेत. कृष्णेच्या ऊस तोडीसाठी आग्रही आहेत. आपण कारखान्यात क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यकारी संचालक सी. एन. देशपांडे यांनी प्रस्ताविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. संचालक संजय पाटील यांनी आभार मानले. यावेळी शेतकरी सभासद, ऊस तोडणी वाहतूकदार, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »