‘कुंभी’च्या अध्यक्षपदी नरके, उपाध्यक्षपदी पाटील

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : कुंभी कासारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार चंद्रदीप शशिकांत नरके, तर उपाध्यक्षपदी विश्वास दत्तात्रय पाटील (कोगेकर) यांची बिनविरोध निवड झाली. या निमित्ताने आयोजित नूतन संचालक मंडळाच्या बैठकीचे कामकाज करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावाडकर यांनी पाहिले.

कुंभी कासारी साखर कारखान्याच्या २०२३ ते २८ सालाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखालील नरके पॅनलने सर्वच्या सर्व २३ जागा जिंकत विजयाचा चौकार मारला. शुक्रवारी नूतन संचालक मंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पार पडला.

अध्यक्षपदासाठी चंद्रदीप नरके यांचे नाव संचालक अनिल पाटील यांनी सुचवले. याला प्रकाश पाटील (पाटपन्हाळा) यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी विश्वास दत्तात्रय पाटील (कोगे) यांचे नाव संचालक अनिष पाटील (क) ठाणे) यांनी सुचवले त्याला अनुमोदन संजय पाटील (खुपिरे) यांनी दिले.

अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी अनुक्रमे चंद्रदीप नरके व विश्वास पाटील ही दोनच नावे समोर आल्याने निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांनी दोघांचीही निवड बिनविरोध घोषित केली.

 निवडीनंतर अध्यक्ष आणि सभासदांनी आपण गेली वीस वर्षे सातत्याने राज्यात उसाचा उच्चांकी दर दिल्याने सभासदांनी आमच्यावर पुन्हा विश्वास टाकला आहे या विश्वासाला सार्थ असा कारभार करून कारखान्याची उत्तरोत्तर प्रगती साधणार असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी संचालक अनिश पाटील, दादासो लाड व बी. बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. निवडणूक अधिकारी नावडकर व कार्यकारी संचालक धीरज कुमार माने यांनी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार केला. उपाध्यक्ष विश्वास पाटील यांनी आभार मानले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »