आज मराठी भाषा दिवस

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज गुरुवार, फेब्रुवारी २७, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन ८ , शके १९४६
सूर्योदय : ०६:५९ सूर्यास्त : १८:४३
चंद्रोदय : चंद्रोदय नहीं चंद्रास्त : १८:११
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : चतुर्दशी – ०८:५४ पर्यंत
क्षय तिथि : अमावस्या – ०६:१४, फेब्रुवारी २८ पर्यंत
नक्षत्र : धनिष्ठा – १५:४३ पर्यंत
योग : शिव – २३:४१ पर्यंत
करण : शकुनि – ०८:५४ पर्यंत
द्वितीय करण : चतुष्पाद – १९:३७ पर्यंत
क्षय करण : नाग – ०६:१४, फेब्रुवारी २८ पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशि : कुंभ
राहुकाल : १४:१९ ते १५:४७
गुलिक काल : ०९:५५ ते ११:२३
यमगण्ड : ०६:५९ ते ०८:२७
अभिजितमुहूर्त : १२:२८ ते १३:१५
दुर्मुहूर्त : १०:५४ ते ११:४१
दुर्मुहूर्त : १५:३६ ते १६:२२
वर्ज्य : २२:१८ ते २३:४६

|| लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी |
| जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी |
| धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी |
| एवढ्या जगात माय मानतो मराठी || – कवी कुसुमाग्रज

मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला पाळला जातो.. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली.

जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,हि समस्त मराठीजनाची मागणी आहे। इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी,अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करता,करता ब्रम्हविध्या म्हंटले आहे,शब्दब्रह्मही म्हंटले आहे।याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते।अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा मला सार्थ अभिमान वाटतो.

आज मराठी भाषा दिवस (कुसमाग्रज जन्मदिन) आहे.

१९१२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च १९९९)

गणेश वासुदेव मावळणकर – त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरजवळचे मावळंगे हे होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर येथे आणि उच्च शिक्षण अहमदाबाद येथे झाले. ग. वा. मावळणकर हे मराठी असले, तरी त्यांचे वास्तव्य गुजरातमध्ये होते.

गणेश वासुदेव मावळणकर हे १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अहमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते. ते पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष होते. गणेश वासुदेव मावळणकर यांचे २७ फेब्रुवारी १९५६ रोजी निधन झाले
• १९५६: पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष , भारतीय वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर१८८८)
२७ फेब्रुवारी २००२ रोजी गोधरा रेल्वे स्थानकाहून निघालेल्या साबरमती एक्सप्रेसला एका मोठ्या मुस्लिम धर्मीय समुदायाने आग लावली. ह्या गाडीमध्ये अयोध्येहून मोठ्या संख्येने परतणारे हिंदू कारसेवक प्रवास करत होते. गाडीच्या एस-६ ह्या डब्यामध्ये २०० लिटर ज्वालाग्रही पदार्थ ओतून लगेचच हा डबा पेटवला गेल्याचे संशोधनामध्ये सिद्ध झाले. ह्या पूर्वनियोजित हिंसाचारात ५९ हिंदू प्रवासी मृत्यू पावले. हा हिंसाचार गुजरातमधील दंगलीला कारणीभूत असल्याचे मानले जाते.
२००२: मुस्लिम जमावाने अयोध्येहुन परत येणाऱ्या ५९ हिंदू यात्रेकरूंना गुजरातेतील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले.

  • घटना :
    १८४४: डॉमिनिकन रिपब्लिकला हैतीपासुन स्वातंत्र्य मिळाले.
    १९००: ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना.
    १९५१: अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.
    १९९९: पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक.
    २००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.

• मृत्यू :

• १९८७: अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक अदि मर्झबान यांचे निधन.
• १९३१: थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांनी अलाहबादच्या पार्क मध्ये पोलिसांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना शेवटची गोळी शिल्लक असल्यामुळे स्वता:च्याच कानशिलावर गोळी मारून प्राण मातृभूमीला अर्पण केले. (जन्म: २३ जुलै १९०६)
• १९९७: गीतकार श्यामलाल बाबू राय ऊर्फ इंदीवर यांचे निधन.
• २०१०: भारतीय शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते भारतरत्न नानाजी देशमुख यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर१९१६)
• २०१० : रा.स्व. संघाचे केंद्रीय अधिकारी डॉ . श्रीपती शास्त्री यांचे निधन ( जन्म : १९ जून, १९३५ )

  • जन्म :
    १९२६: मराठी व हिन्दी लेखिका ज्योत्स्ना देवधर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१३)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »