लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचा गौरव
सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास विशेष प्रशंसापत्र देऊन गौरवण्यात आले आहे. केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाद्वारे हा सन्मान करण्यात आला.
पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेअरमन श्री. यशराजदादा देसाई यांच्या अभ्यासू नेतृत्वात कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय यांच्याद्वारे देशातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण केले जाते. सदर सर्वेक्षणात निहीत वेळेत सविस्तर विवरणपत्र सादर केल्याबद्दल भारत सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाद्वारे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास विशेष प्रशंसापत्र देऊन गौरवण्यात आले आहे.
सांख्यिकी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराजदादा देसाई यांची दौलतनगर येथे भेट घेऊन नुकतेच हे प्रशंसापत्र देऊन सन्मान केला.
पालकमंत्री ना. शंभूराज देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन यशराजदादा कारखान्याचे अभ्यासूपणे नेतृत्व करत आहेत. लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांचा जनसेवेचा वारसा सचोटीने आणि कार्यक्षमतेने ते पुढे नेत आहेत, याचा आनंद पाटणवासीयांकडून व्यक्त होत आहे.