‘लोकनेते’च्या हंगामाचा सुनेत्राताईंच्या हस्ते शुभारंभ

सोलापूर : जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगरच्या लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी सौ. सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला..
आमदार यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार राजन पाटील, बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील आणि सर्व संचालक मंडळ, सभासद आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्रात साखर उद्योगाच्या माध्यमातून मोठी क्रांती झाली असून, त्यातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडले आहेत. येणाऱ्या काळातही लोकनेते कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी हातभार लागेल, अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली.