लेफ्टनंट शंकर पांडुरंग थोरात पाटील

आज रविवार, ऑगस्ट १०, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक १९, शके १९४७
सूर्योदय : ०६:१८ सूर्यास्त : १९:०९
चंद्रोदय : २०:०४ चंद्रास्त : ०७:०३
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : श्रावण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : प्रतिपदा – १२:०९ पर्यंत
नक्षत्र : धनिष्ठा – १३:५२ पर्यंत
योग : शोभन – ००:०२, ऑगस्ट ११ पर्यंत
करण : कौलव – १२:०९ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – २३:२४ पर्यंत
सूर्य राशि : कर्क
चंद्र राशि : कुंभ
राहुकाल : १७:३३ ते १९:०९
गुलिक काल : १५:५६ ते १७:३३
यमगण्ड : १२:४४ ते १४:२०
अभिजित मुहूर्त : १२:१८ ते १३:०९
दुर्मुहूर्त : १७:२६ ते १८:१८
अमृत काल : ०६:०४, ऑगस्ट ११ ते ०७:३६, ऑगस्ट ११
वर्ज्य : २०:४९ ते २२:२१
.
शहरी तसेच ग्रामीण भागासाठी अपारंपरिक उर्जास्त्रोत.कोणत्याही तेलापासून बनवता येते.ग्रामीण भागाचा विकास, ग्रामीण उद्योग व स्वयंरोजगारास संधी.पडीक व कोरडवाहू जमिनीचा उत्पादनासाठी उपयोग. डिझेलला पर्यायी उपाय.पर्यावरणाच्या प्रदूषणास आळा बसतो. हे बायोडिझेलचे प्रमुख फायदे आहेत.
आज आंतरराष्ट्रीय बायो डीझेल दिन आहे.
१८९४ : भारताचे ४ थे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य , केंद्रीय मंत्री, व्ही . व्ही. गिरी यांचा जन्म ( मृत्यू : २३ जून, १९८० )
कीर्ती चक्र, पद्मश्री पुरस्कार सन्मानित लेफ्टनंट शंकर पांडुरंग थोरात-पाटील – यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यातील वडगाव येथे झाला. थोरात शेतकरी कुटुंबातील असले तरी त्यांचे वडील डॉ. पांडुरंग चिमणाजी पाटील उच्चविद्याविभूषित होते. शंकर थोरात यांचे शिक्षण पुण्यातील पूना हायस्कूल आणि नूतन मराठी विद्यालयात झाले. १९२३मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९२४ ते १९२६ दरम्यान इंग्लंडमधील सॅण्डहर्ट येथील रॉयल मिलिटरी कॉलेजमध्ये त्यांचे सैनिकी शिक्षण झाले.

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश भारतीय सैन्यात काम करताना शिस्त, संघटना आणि तंत्रज्ञान अशा सर्व गोष्टी थोरात यांनी कष्टपूर्वक आत्मसात केल्या. १९३५मध्ये त्यांच्या पलटणीला जुन्या वायव्य सरहद्द प्रांतात धाडण्यात आले. तेथील खैबर खिंडीच्या भोवतालच्या प्रदेशात पठाणी टोळ्यांशी सतत चकमकी होत असत. येथेच थोरात यांच्या पलटणीचे मुख्य कार्यालय होते. या वेळी झालेल्या सैनिकी कारवाईत थोरात यांच्या कणखर नेतृत्वाखाली पलटणीने पठाणांच्या टोळीचे कंबरडे मोडले. अचूक टेहळणी व मनोधैर्याच्या जोरावर थोरात यांनी ही कामगिरी यशस्वी केली.
१९३९मध्ये दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाले. सैनिकी अधिकाऱ्याने कायमच युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी धडपड करावी, असे थोरात यांचे मत होते. याचा प्रत्यय दुसर्या महायुद्धाच्या रणधुमाळीतही आला. कोहीमाला जपानी सैन्याने घातलेल्या वेढ्यात तीन भारतीय पलटणी अडकलेल्या होत्या. जपान्यांचा वेढा मोडून आपल्या पलटणींची सुटका करण्यासाठी हिंदी सैनिकांनी मोठ्या चकमकींना तोंड दिले. त्यात थोरात यांच्या पलटणीने मोठे कर्तृत्व दाखविले. इंफाळ तर भारतापासून जवळजवळ तुटल्यातच जमा होते. तेथेही थोरात यांनी अतुलनीय कामगिरी बजावून इंफाळ वाचविले.
दुसर्या महायुद्धात ब्रह्मदेशाच्या आघाडीवर केलेला रणसंग्राम हा युद्धशास्त्रातील एक अजोड इतिहासच मानला जातो. थोरातांनी तेथे अतिशय जिद्दीने विजयश्री खेचून आणली. नेतृत्व, चिकाटी, कणखरपणा आणि उत्कृष्ट डावपेच वापरल्याबद्दल थोरातांना त्या काळी ‘डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस ऑर्डर’ हे सध्याच्या ‘महावीरचक्रा’च्या दर्जाचे शौर्यपदक बहाल करण्यात आले.
भारताची 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' असावी असा निर्णय १९४५मध्ये घेण्यात आला. ही योजना तयार करून कार्यवाही करण्यासाठी थोरात यांना ब्रिगेडियरपदी पदोन्नती देण्यात आली. केवळ थोरात यांच्या प्रयत्नामुळेच ही प्रबोधिनी महाराष्ट्रात पुण्यातील खडकवासला येथे उभी राहिली.
देशाची फाळणी झाल्यानंतर थोरात यांनी सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याचे मोठे कार्य केले. प्रक्षोभक आणि स्फोटक वातावरणाच्या राजधानीत दिल्ली एरिया कमांडरच्या पदावर असताना तेथील परिस्थिती कोणाची भीडभाड न राखता थोरातांनी कणखरपणे हाताळली.
याच काळात शेकडो संस्थाने भारतात विलीन झाली. तेव्हाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ही नाजूक समस्या कणखरपणे व कुशलतेने सोडविली. त्या वेळी विविध संस्थानांच्या सैन्यांतील आवश्यक त्या अधिकारी व सैनिकांना भारतीय सैन्यात सामावून घेण्याचे काम थोरात यांच्यावर सोपविण्यात आले. ते त्यांनी समर्थपणे पार पाडले.
१९५३मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने भारत सरकारला कोरियामध्ये ‘कस्टोडियन फोर्स’ पाठविण्याची विनंती केली. या जबाबदारीच्या कामावर कमांडर म्हणून थोरातांची नियुक्ती झाली. त्यांच्या आधिपत्याखाली पाच हजार जणांची सेना होती. अमेरिका, चीन, दक्षिण व उत्तर कोरिया यांच्यातील धुमश्चक्रीत कोरियाचा सत्यानाश झाला होता. उत्तर कोरियाचे पंचावन्न हजार कैदी काबूत ठेवून त्यांच्या पुनर्वसनाच्या व्यवस्थेची अतिशय जोखमीची जबाबदारी थोरात यांच्या शिरावर येऊन पडली.
एका स्फोटक प्रसंगी उत्तर कोरियन कैद्यांच्या चिडलेल्या तुकडीने एका भारतीय अधिकार्याला ओलीस धरून हाताला मिळेल त्या साधनांनी थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला केला.
थोरात यांनी ही कठीण परिस्थिती अशा कौशल्याने हाताळली, की जीवावर उठलेल्या कैद्यांचा जथा थोरात यांचा जयघोष करीत माघारी गेला. सर्व जगात थोरात यांच्याबरोबरच देशाचीही मान उंचावली गेली. या असामान्य धैर्यासाठी त्यांना ‘अशोकचक्र’ (वर्ग २) हा वीरसन्मान देण्यात आला. त्यानंतर त्यांची पूर्व पंजाबच्या एरिया कमांडरपदी नियुक्ती झाली. फाळणीमध्ये मुख्यत्वे सिंध व पंजाब प्रांताचे तुकडे पडले होते. तेव्हा राजस्थानपासून ते पूर्व व पश्चिम पंजाबमधील पठाणकोटपर्यंत संरक्षण रेषा आखण्याचे व या नव्या सरहद्दीवर संरक्षक ठाणी बांधण्याचे जोखमीचे व दूरगामी परिणाम करणारे काम थोरात यांनी तडीस नेले.
थोरातांचे युद्धातील कर्तृत्व, फाळणीच्या काळात केलेले विविध प्रकारचे कार्य आणि अजोड बुद्धिमत्ता लक्षात घेऊन, सर्वांत ज्युनियर मेजर जनरल असूनही जनरल करिअप्पा यांनी त्यांना ‘चीफ ऑफ जनरल स्टाफ’ या अतिमहत्त्वाच्या पदावर नियुक्त केले. या पदावर असताना त्यांना प्रामुख्याने परराष्ट्रातून भारतावर हल्ले झाल्यास त्याला तोंड कसे द्यायचे यावर संभाव्य लढाईचे आराखडे तयार करण्याची जबाबदारी होती.
१९५७ ते ५९ या काळात त्यांनी ईशान्य सरहद्द प्रांत (नेफा- सध्याचा अरूणाचल प्रदेश) या प्रदेशातील पहाड, दऱ्या, खिंडी अक्षरश: पायाखाली तुडवून या सीमेवरचे गांभीर्य जाणले.
भारतावर कोणत्या देशाकडून आणि कुठल्या सरहद्दीवरून हल्ला होण्याची शक्यता आहे व तो परतवून लावण्यासाठी कशी योजना आखावयास हवी, याचा आराखडा व आकडेवारीसह तपशीलवार समग्र अहवाल स्पष्ट व परखड शब्दांत, पदाची तमा न बाळगता, दि.८ ऑक्टोबर १९५९ रोजी तेव्हाचे सरसेनापती जनरल थिमय्यांच्या शिफारशीसह संरक्षणमंत्री व्ही.कृष्ण मेनन यांना सादर केला. मेनन यांनी त्याची दखल घेतली नाहीच; पण त्याउलट भारत-चीन संबंध मैत्रीचे असून थिमय्या-थोरात यांच्यासारखे ज्येष्ठ सैनिकी अधिकारी अकारण या गोष्टीचा बाऊ करीत असल्याचा शेरा मारला व त्यांची हेटाळणी केली. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचाही तसाच समज करून दिला. त्यांच्या या अहवालाचा परिणाम त्यांना सरसेनापतीपद न मिळण्यात झाला. ते १९६१मध्ये प्रदीर्घ सैनिकी सेवेतून निवृत्त झाले.
( आणि त्यानंतर काय परिणाम देशाला भोगावे लागले ते सर्वांना ज्ञातच आहे.. … )
१९९२ : कीर्ती चक्र, पद्मश्री पुरस्कार सन्मानित लेफ्टनंट शंकर पांडुरंग ( पाटिल ) तथा एस . पी. पी. थोरात यांचे निधन. कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. ( जन्म : १२ ऑगस्ट, १९०६ )
संगीत शास्त्रकार विष्णू नारायण भातखंडे – यांचा जन्म ऑगस्ट १०, १८६० रोजी (जन्माष्टमी) च्या दिवशी मुंबई येथील वाळकेश्वरात झाला.
लहानपणापासूनच त्यांचे संगीतकलेवर विशेष प्रेम होते.वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षी ते उत्तम बासरी वाजवायचे. मराठी शाळेतील व हायस्कूलचे शिक्षण झाल्यानंतर भातखंडे यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये बी.ए. चे शिक्षण घेतले. याच काळात त्यांनी गोपाल्गिरी यांच्याकडून सतारीचे धडे आत्मसात केले.
इ.स. १८८५ साली ते कायद्याचे पदवीधर झाले व इ.स. १८८७ सालापासून वकिली करू लागले. पुढे काही काळ कराचीच्या न्यायालयात त्यांनी वकिली केली. भातखंडे यांनी त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांत वल्लभदास नावाच्या सतारवादकाकडून सतार शिकायला आरंभ केला. पुढे रावजीबा नावाच्या ध्रुपदगायकाकडून ते गायकी शिकू लागले. गायकी व हिंदुस्तानी संगीताच्या इतर पैलूंबाबत त्यांना बेलबागकर, अली हुसेन खाँ, विलायत हुसेन खाँ यांचेही मार्गदर्शन लाभले.
पत्नी व मुलीच्या निधनानंतर भातखंडे यांनी वकिली सोडून पूर्णपणे संगीताभ्यासाला वाहून घेतले. त्यांनी भरताच्या नाट्यशास्त्राचा आणि संगीत रत्नाकर या प्राचीन भारतीय संगीतविषयक ग्रंथाचा अभ्यास चालवला होताच; पण आता त्यांनी हिंदुस्तानी संगीतातील विस्कळीत वैविध्याला पद्धतशीर सैद्धांतिक चौकटीत बसवण्याकरता प्रयत्न केले. त्यातूनच त्यांनी राग, रागिण्या आणि पुत्ररागांमध्ये वर्गीकरण करण्याच्या जुन्या पद्धतीऐवजी ‘थाट पद्धत’ नावाची नवी वर्गीकरण पद्धत हिंदुस्तानी संगीतामध्ये विकसीत केली.
उतारवयात भातखंडे पक्षाघात व मांडीच्या अस्थिभंगामुळे अंथरूणास खिळून होते. सप्टेंबर १९, १९३६ रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांचे निधन झाले.
१८६० : संगीत शास्त्रकार, हिंदुस्थान संगीताचे प्रसारक व संशोधक, गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पं. विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म ( मृत्यू : १९ सप्टेंबर, १९३६ )
१९८२ : ‘पद्मभूषण’ पुरस्कार सन्मानित भारतीय खगोल शास्त्रज्ञ मनाली कल्लट तथा एम. के. वेणु बाप्पु यांचे निधन ( जन्म : १० एप्रिल, १९२७ )
- घटना :
१६७५ : चार्ल्स ( दुसरा ) याने ग्रिनिच येथील जगप्रसिद्ध वेधशाळेचा ( Royal Observatory ) शिलान्यास केला.
१९९० : मॅगेलान हे अंतराळ यान शुक्रावर पोहोचले.
• मृत्यू :
१९५० : संगीतकार खेमचंद प्रकाश यांचे निधन ( जन्म : १२ डिसेंबर, १९०७ )
१९८२ : ‘पद्मभूषण’ पुरस्कार सन्मानित भारतीय खगोल शास्त्रज्ञ मनाली कल्लट तथा एम. के. वेणु बाप्पु यांचे निधन ( जन्म : १० एप्रिल, १९२७ )
१९८६ : जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुणे येथे अतिरेक्यांनी हत्या केली. ( जन्म : २७ जानेवारी, १९२६ )
१९९७ : कवी व नाट्य समीक्षक आचार्य बलदेव उपाध्याय यांचे निधन ( जन्म : १० ऑक्टोबर, १८९९ )
२०१२ : साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित , गुजराथी कवी, लेखक, संपादक, सुरेश दलाल यांचे निधन ( जन्म : ११ ऑक्टोबर, १९३२ )
२०२४ : भारतीय परराष्ट्र सेवेतीलभारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी, पद्मभूषण पुरस्कार सन्मानित माजी परराष्ट्र मंत्री कुंवर नटवर सिंग ( के नटवर सिंग ) यांचे निधन . (जन्म : १६ मे १९२९)
- जन्म :
१७५५ : ५ वे पेशवे – नारायणराव पेशवे यांचा जन्म ( मृत्यू : ३० ऑगस्ट, १७७३ )
१८५५ : हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या जयपूर-अत्रौली घराणे या गायकीचा आविष्कार करणारे गुलाम अहमद तथा उस्ताद अल्लादिया खान यांचा जन्म ( मृत्यू : १६ मार्च, १९४६ )
१९१३ : संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे यांचा जन्म ( मृत्यू : ८ मे, २००३ )
१९५६ : भारतीय – इंग्रजी उद्योगपती पेरीन वॊरसी यांचा जन्म
१९६० : भारताच्या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी NASCOM चे अध्यक्ष देवांग मेहता यांचा जन्म ( मृत्यू : १२ जुलै, २००१ )
१९६३: भारतीय राजकारणी फुलन देवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै, २००१)
आपला दिवस मंगलमय जावो