पं. मदनमोहन मालवीय

आज गुरुवार, डिसेंबर २५, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष ४, शके १९४७
सूर्योदय : ०७:०९ सूर्यास्त : १८:०८
चंद्रोदय : १०:५७ चंद्रास्त : २२:५०
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : हेमंत
चंद्र माह : पौष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पञ्चमी – १३:४२ पर्यंत
नक्षत्र : धनिष्ठा – ०८:१८ पर्यंत
योग : वज्र – १५:१४ पर्यंत
करण : बालव – १३:४२ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – ०१:४७, डिसेंबर २६ पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : कुंभ
राहुकाल : १४:०१ ते १५:२३
गुलिक काल : ०९:५४ ते ११:१६
यमगण्ड : ०७:०९ ते ०८:३१
अभिजितमुहूर्त : १२:१७ ते १३:०१
दुर्मुहूर्त : १०:४९ ते ११:३३
दुर्मुहूर्त : १५:१२ ते १५:५६
अमृत काल : ०१:३५, डिसेंबर २६ ते ०३:१४, डिसेंबर २६
वर्ज्य : १५:४३ ते १७:२२
१९२४ : भारताचे १० वे पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म ( मृत्यू : १६ ऑगस्ट, २०१८ )
१९९४ : भारताचे ७ वे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे निधन ( जन्म : ५ मे, १९१६ )
आज ख्रिश्चन धर्मियांचा नाताळ सण आहे.
पं. मदनमोहन मालवीय – मुळातच आणि बुद्धिमान अशा हुषार मदनमोहन इंग्रजी शिकविण्यासाठी-सरकारी शाळेतील फी भरण्यासाठी आईने–मोनादेवीने-आपले दागिने गहाण ठेवले. बी. ए. झाल्यावर (१८८४) स्वतःचे शिक्षण झाले त्याच सरकारी शाळेत त्यांनी इंग्रजी अतिरिक्त शिक्षकाची नोकरी धरली. मिर्झापूरचे पंडित नंदराम यांची मुलगी कुंदनदेवी हिच्याशी त्यांचा विवाह झाला (१८७८). कॉलेजात असतानाच हिंदू समाज एकसंध करण्यासाठी त्यांनी काही सहकाऱ्यांसह एक संस्था काढली (१८८०). तिचे पहिले सार्वजनिक अधिवेशन १८८५ साली भरले. पुढील वर्षी तत्कालीन संयुक्त प्रांताच्या प्रतिनिधिमंडळात स्थान मिळून ते कलकत्त्याच्या काँग्रेस अधिवेशनाला गेले. तेथल्या त्यांच्या भाषणाबद्दल सर ह्यूम यांनी त्यांना शाबासकी दिली आणि आयुष्याची दिशा बदलली.
१८८५ पासूनच नोकरी सांभाळून ते इंडियन युनियन या छोट्या स्थानिक पत्राचे संपादन करीत असत. कलकत्त्याहून परतल्यावर राजा राजपाल सिंग यांनी हिंदुस्तान पत्राचे संपादक म्हणून मालवीयांची नियुक्ती केली. वर्षभरात हिंदुस्तानची लोकप्रियता वाढली आणि त्याचे दैनिकीत रूपांतर झाले. १८८८ साली अलाहाबादच्या काँग्रेस अधिवेशन भरले. त्याच्या स्थायी समितीचे चिटणीसपद मालवीयांना देण्यात आले.
१९८९ च्या मुंबई अधिवेशनाहून परत आल्यावर मालवीयांनी हिंदुस्तान पत्राच्या संपादकत्वाचा राजीनामा देऊन वकिलीच्या अभ्यासास सुरूवात केली. वकिलीची पदवी मिळाल्यावर १८९२ पासून त्यांनी वकिली सुरू केली. सार्वजनिक कार्यात खंड पडू न देता त्यांनी १९०९ पर्यंत वकिली केली. पुढे खिलाफत व असहकार आंदोलन बंद होण्यास कारणीभूत झालेल्या चौरीचौरा प्रकरणी एकूण २२५ जणांना फाशीची शिक्षा फर्मावण्यात आली होता. त्यांचे वकीलपत्र मालवीय यांनी घेतले व त्यांतल्या १५३ लोकांचे प्राण वाचविले.
वकिलीबरोबरच ते काँग्रेसच्या कामात लक्ष घालीत. काँग्रेसमध्ये असले तरी त्यांनी काँग्रेसच्या अनेक धोरणांना जाहीररीत्या विरोध केला.
बनारस हिंदू विश्वविद्यालय हे पंडित मदनमोहन मालवीयांचे एक चिरंतन स्मारक ठरेल. आधुनिक पद्धतीने प्राचीन धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करण्याची सोय करावी, तसेच सर्व शास्त्रीय विषयांची अत्याधुनिक माहिती विद्यार्थांना मिळावी, यासाठी वेगळे विश्वविद्यालय काढण्याची स्वप्ने ते १९०४ पासून रंगवू लागले होते.
देशी उद्योगधंद्यांचा पुरस्कार हा तर त्यांचा नित्याचा व आवडीचा विषय. या विश्वविद्यालयातून उद्योगांच्या प्रगतीचाही मार्ग काढावा, ही एक त्यांची तळमळ होती. पूर्ण आराखडा केल्यावर १९११ पासून ते वर्गणी गोळा करू लागले. एका व्यक्तीने एवढा पैसा उभा केल्याची उदाहरणे तुरळकच आढळतील.
१९१५ साली बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या स्थापनेसंबंधी अधिकृत कायदा केंद्रीय असेंब्लीने पास केला. तोपर्यंत पंडीतजींच्या गंगाजळीत ३४ लाख रूपये जमले होते. १९१६ मध्ये विश्वविद्यालय सुरू झाले. १९१९ पासून पुढील १९ वर्षे मालवीयाजी उपकुलगुरू होते. त्यांची गंगाजळी भरतच राहिली. १९३६ पर्यंत एकूण १ कोटी ५५ लाख रूपये मिळाले. ज्ञात असलेल्या प्रत्येक शास्त्रीय शाखेचे परिपूर्ण शिक्षण देणारे विश्वविद्यालय म्हणून बनारसला मोठाच लौकिक मिळाला. जातपात आणि धर्म यांचा विचार न करता मालवीयजी प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला सर्वतोपरी साहाय्य करीत. १९३८ नंतर उपकुलगुरूपद सोडून मृत्यूपर्यंत मालवीयजींनी विश्वविद्यालयातच कुलमंत्री म्हणून काम केले.
पंडित मालवीय दीर्घायुषी होते तथापि प्रकृती अधिक निरोगी राहावी यास्तव त्यांनी प्राचीन वैद्यकात सांगितलेला कायाकल्पाचा दीर्घ प्रयोग स्वतःवर केला. त्याचा काही प्रमाणात फायदा झाला. १९४६ अखेरीस देशभर भीषण जातीय दंगली उसळत असतानाच बनारस येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी कुंदनदेवी या १९४२ सालीच निवर्तल्या होत्या.
१८६१ : बनारस हिंदू विद्यापीठाचे एक संस्थापक पं. मदन मोहन मालवीय यांचा जन्म ( मृत्यू : १२ नोव्हेंबर, १९४६ )
- घटना :
३३६ : रोम मध्ये प्रथमच नाताळ सण साजरा करण्यात आला
१९७६ : आय. एन. एस. विजयदुर्ग युध्द् नौका भारतीय नौदलात दाखल झाली
१९९० : वर्ल्ड वाइड वेब ( www ) पहिली यशस्वी चाचणी झाली
१९९१ : मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सोविएत संघराज्य – अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
• मृत्यू :
१९५४ : थोर भारतीय राजकीय नेते, तत्त्वचिंतक आणि नवमानवतावादाचे प्रवर्तक मानवेंद्रनाथ ( मूळ नाव – नरेन (नरेंद्र) भट्टाचार्य यांचे निधन ( जन्म : २१ मार्च १८८७ )
१९५७ : साहित्यिक, विचारवंत , समाजसुधारक प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री . म. माटे यांचे निधन ( जन्म : २ सप्टेंबर, १८८६ )
१९७२ : भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचारी यांचे निधन ( जन्म : १० डिसेंबर, १८७८ )
१९९८ : नाटककार व दिग्दर्शक दत्तात्रय गोविंद तथा दत्ता खेबुडकर यांचे निधन.
- जन्म :
१९१९ : संगीतकार नौशाद अली यांचा जन्म ( मृत्यू : ५ मे, २००६ )
१९२१ : भारतीय पाकिस्तानी पत्रकार व लेखक झैब – अन – नसिसा हमीदुल्ला यांचा जन्म ( मृत्यू : १० सप्टेंबर, २००० )
१९२६ : हिंदी कवी, लेखक, नाटककार, पत्रकार डॉ धर्मवीर भारतीं यांचा जन्म ( मृत्यू : ४ सप्टेंबर, १९९७ )
१९२६ : संसदपटू चित्त बसू यांचा जन्म ( मृत्यू : ५ ऑक्टोबर, १९९७ )
१९२७ : सुप्रसिधद सारंगीय पं. रामनारायण यांचा जन्म
१९३२ : संगीतसंयोजक, संगीतकार व व्हॉयोलिन वादक प्रभाकर जोग यांचा जन्म
१९३६ : भारतीय – इंग्रजी दिग्दर्शक व निर्माते इस्माईल मर्चंट यांचा जन्म ( मृत्यू : २५ मे, २००५ )
१९५९ : कवी व राजकारणी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा जन्म.






