आज महाशिवरात्र

आज बुधवार, फेब्रुवारी २६, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन ७ , शके १९४६
सूर्योदय : ०७:०० सूर्यास्त : १८:४३
चंद्रोदय : ०६:२७, फेब्रुवारी २७ चंद्रास्त : १७:०९
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : त्रयोदशी – ११:०८ पर्यंत
नक्षत्र : श्रवण – १७:२३ पर्यंत
योग : परिघ – ०२:५८, फेब्रुवारी २७ पर्यंत
करण : वणिज – ११:०८ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – २२:०५ पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशि : मकर – ०४:३७, फेब्रुवारी २७ पर्यंत
राहुकाल : १२:५१ ते १४:१९
गुलिक काल : ११:२४ ते १२:५१
यमगण्ड : ०८:२८ ते ०९:५६
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:२८ ते १३:१५
अमृत काल : ०७:२८ ते ०९:००
अमृत काल : ०६:०३, फेब्रुवारी २७ ते ०७:३२, फेब्रुवारी २७
वर्ज्य : २१:०६ ते २२:३६
|| नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय|
| नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मे न काराय नम: शिवाय: ||
दक्षिण भारतात आदल्या दिवशी एकभुक्त व्रत केले जाते. म्हणजे आदल्या दिवशी एक भोजन केले जाते. रात्री पवित्र जागी झोप घेतली जाते. नदीत स्नान करून शंकराचे दर्शन घेतले जाते. शिवाला कमल अर्पण करून तांदुळाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. ऋग्वेदातील सूक्ते म्हटली जातात. तुळशीची पाने आणि पायसाचा (खिरीचा) नैवेद्य आणि यजुर्वेदाचे पठण, बेलाची पाने आणि तीळ घातलेला भाताचा नैवेद्य आणि सामवेदाचे पठण, निळी कमळे वाहून साध्या अन्नाचा नैवेद्य आणि अथर्ववेदाचे पठण केले जाते.
काश्मीर- काश्मीरमध्ये महाशिवरात्री दरम्यान होणारी बर्फवृष्टी ही पवित्र मानली जाते. शंकराचार्य टेकडी येथील मंदिरात भक्त दिवसभर दर्शनासाठी जातात.विशेष यात्रेचे आयोजन केले जाते. पूजेचे पदार्थ, अक्रोड, कमळाची फुले यांची विक्री करणारी दुकाने मंदिर परिसरात थाटली जातात.
ईशान्य भारत- आसाम राज्यातील शुक्रेश्वर मंदिर, उमानंद मंदिर या ठिकाणी महाशिवरात्रीला भाविक दर्शनासाठी भेट देतात. यात्रेचे आयोजन करण्यात येते.
ओरिसा- ओरिसा राज्यात भाविक शिवरात्रीचा उपवास करतात आणि शिव मंदिरात जाऊन दर्शन घेतात. उत्तर प्रदेश- उत्तर प्रदेशातील वटेश्वर मंदिरात शिवरात्री निमित्त भाविक राजस्थान, मध्य प्रदेश येथून पाण्याची कावड घेऊन पोहोचतात आणि शिवाला अभिषेक करतात
आज महाशिवरात्र आहे.
समाधिसी क्षेत्र घातली मनोहर ।
बसविले वर चांगदेवा।।
आनंदाने टाळ्या पिटती वैष्णव भाट ।
लावीती पदर डोळीयांशी ।
टाळ-मृदंगाचा झाला झणकार ।
केले योगेश्वर समाधीशी।।
सांडीली भूषणे आकारणस ।
झाले वितग्न परब्रrासी।।
झालीयेते क्षेत्र उन्मनीच्या संगे ।
निवृत्ती, पांडुरंग ओसंडली।।
नामा म्हणे समाधिस्त योगेश्वर ।
निघाले बाहेर देव भक्ता।।
चांगदेव महाराजांनी ज्ञानदेवांची धाकटी बहीण मुक्ताईला गुरू केले. त्यांनी चौदाशे वर्षें घोर तपःश्चर्या केल्यानंतर माघ वद्य १३ शके १२९८ रोजी पुणतांबा येथे संजीवन समाधी घेतली.
१२९७: योगी चांगदेव यांनी समाधी घेतली. ( माघ वद्य ३ शके १२९८ तिथि पण मानली जाते )
आज सिंचन दिन आहे.
|| हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते श्री स्वतन्त्रते ||
||तुजसाठि मरण तें जनन ||
|| तुजवीण जनन तें मरण ||
|| तुज सकल-चराचर-शरण चराचर-शरण ||
- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.
सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक व पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिलेली आहे.
सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला.१ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचत्त्वात विलीन झाले.
सावरकर या देशासाठी झटले असतील पण त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही, अशा प्रकारे सरकारी पातळीवर ते कायम उपेक्षित राहिले. त्याचा परिणाम समाजावरही आपसूक पडला. कारण ते काही ‘सरकार प्रायोजित’ स्वातंत्र्यवीर ठऱले नाहीत. देशपातळीवर उंची गाठलेला एक नेता आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादीत ठरवला गेला. त्यातही ‘स्वातंत्र्यवीर’ या ‘कोंदणात’ आणि ‘मार्सेलिस’च्या उडीत त्यांचे कर्तृत्व आटोपले. त्यापलीकडेही सावरकर आहेत, हे फारसे कधी पुढे येतच नाही. त्यांचे काही विचार कदाचित न पटणारेही असतील. मग याच न्यायाने गांधी तरी कुठे पूर्णपणे पटणारे होते?
• १९६६: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन. (जन्म: २८ मे१८८३)
- घटना :
१९०९: सिनेमाकलर या पहिल्या रंगीत चित्रपट प्रथम पॅलेस थिएटर, लंडन मध्ये प्रदर्शित झाला.
१९२८: बाटून ख्रिश्चन बनलेल्या पिढीजात ख्रिश्चनांना परत हिंदु धर्मात घेण्याची सुरुवात झाली.
१९७६: वि. स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
१९८४: इन्सॅट-१-ई हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित केला.
१९९५: बारिंग्ज बँक ही इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक दिवाळखोरीत निघाली.
१९९८: परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.
१९९९: आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे तलावातील अभिरुची हॉटेल आगीत भस्मसात झाले.
२०१९ : १४ फेब्रुवारी २०१९ पुलवामा हल्ला चोख प्रत्युत्तर – २०१९चा बालाकोट हवाई हल्ला भारतीय वायुसेनेने पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधील बालाकोट शहरावर केलेला हल्ला होता. हा हल्ला २६ फेब्रुवारी, २०१९ रोजी करण्यात आला. भारतीय वायुसेनेच्या १२ मिराज २००० जेट विमानांनी नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाउन बालाकोटजवळील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला चढवला. भारतीय सैन्यावर पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून हा हवाई हल्ला करण्यात आलेला आहे असे भारतीय सैन्याने सांगितले.भारताच्या शासकीय संस्थाद्वारे असे सांगितले जात आहे की, भारतीय हवाई दलाने जैश-ए-महोम्मद या आतंकवादी गटाच्या बालाकोट येथील प्रशिक्षण शिबीरावर हल्ला केला आणि त्यात जवळपास ३५० प्रशिक्षणार्थींना ठार केले आहे. या हवाई हल्ल्यानंतर भारतीय विमाने कोणत्याही अडथळ्याशिवाय भारताच्या भूमीवर परत आलेली आहेत. त्यात भारतीय हवाई दलाला कोणतीही क्षती झालेली नाही .
परकीय आक्रमणला शुर जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर शुल्लक स्वार्थी कारणासाठी काही मातब्बर विरोधी पक्ष नेत्यांनी त्याचे पुरावे मागितले हे ह्या देशाचे दुर्दैव !
- मृत्यू :
• १८८६: गुजराथी लेखक व समाजसुधारक नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट, १८३३)
• १८८७: भारतीय डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांचा जन्म. (जन्म: ३१ मार्च , १८६५)
• १९३७: मानववंशशास्त्रज्ञ एल. के. अनंतकृष्ण अय्यर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै , १८६२)
• २०००: बेळगाव येथील उद्योगपती बा. म. तथा रावसाहेब गोगटे यांचे निधन.
• २००३: व्यंगचित्रकार राम वाईरकर यांचे निधन.
• २००४: केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे निधन. (जन्म: १४ जुलै, १९२०)
• २०१०: भारतरत्न पुरस्कार सन्मानित समाजसुधारक व संघप्रचारक चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६ – कडोळी, परभणी, महाराष्ट्र) - जन्म :
१८७४: प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ कलापि यांचा जन्म.
१९०८: भारतीय लेखिका लीला मुजुमदार यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल, २००७)
१९२२: चरित्र अभिनेता मनमोहन कृष्ण यांचा जन्म.(मृत्यू: ३ नोव्हेंबर, १९९०)
१९३७: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च, १९९४)