महात्मा गांधी स्मृतिदिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शुक्रवार, जानेवारी ३०, २०२६ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ १०, शके १९४७
सूर्योदय : ०७:१३ सूर्यास्त : १८:३०
चंद्रोदय : १५:५० चंद्रास्त : ०५:४८, जानेवारी ३१
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्वादशी – ११:०९ पर्यंत
नक्षत्र : आर्द्रा – ०३:२७, जानेवारी ३१ पर्यंत
योग : वैधृति – १६:५८ पर्यंत
करण : बालव – ११:०९ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – २१:४६ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : मिथुन
राहुकाल : ११:२७ ते १२:५२
गुलिक काल : ०८:३८ ते १०:०३
यमगण्ड : १५:४१ ते १७:०६
अभिजित मुहूर्त : १२:२९ ते १३:१४
दुर्मुहूर्त : ०९:२९ ते १०:१४
दुर्मुहूर्त : १३:१४ ते १४:००
अमृत काल : १८:१८ ते १९:४६
वर्ज्य : १३:१० ते १४:३८

“ रामनाम हे ओंकाराचेच स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे. ”
“ नामस्मरण ‘समजून’ करावे. समजून म्हणजे ‘राम कर्ता’ या भावनेत राहून. ”
“ परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की, “तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना ? मग तू प्रपंच अतिदक्षतेने कर. प्रयत्‍नाला कधी मागे पाहू नकोस, पण फळ देणारा मी आहे ही शुध्द्व भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस आणि मी जे सांगतो ते औषध घे. ते तुला सर्व रोगांतून मुक्त करील; आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे ‘नाम’ हे होय.” – श्री गोंदवलेकर महाराज

रामनाम स्मरण हेच भक्तिसाधन – नाम परमेश्वरप्राप्तीचे कर्म-योग-ज्ञान या मार्गांपेक्षा श्रेष्ठ आहे. भगवंताची अनेक रूपे नाहीशी झाली, तरी त्याचे नाम देशकालातीत असते. जगभरातील सर्व वस्तूंचे मूलद्रव्य एकच आहे. अनेक रूपे आली तरी मूलद्रव्य कायमच राहते. म्हणून नाम श्रेष्ठ आहे, असे ते म्हणायचे. श्रीमहाराजांनी संतांच्या उपदेशाप्रमाणेच भक्ती हे परमार्थाचे साधन असून रामनाम स्मरण हे भक्तिसाधन आहे, असे सांगितले. नाम हेच सर्वोत्तम मोक्षसाधन आहे, हा उपदेश प्रसृत करण्यात आपले जीवन समर्पित केले. आपले विचार, उपदेश, तत्त्वज्ञान, बैठक या सर्वांची तर्कनिष्ठ मांडणीही त्यांनी केली. त्यांचे संवाद, त्यांची प्रवचने यांचे सार म्हणजे नामसाधनाचे श्रेष्ठत्व होय. श्रीमहाराजांचा नामोपदेश हीच त्यांच्या जीवनाची, तत्त्वज्ञानाची ओळख होय.

आज गोंदवलेकर महाराज जयंती आहे (माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ (इ.स. १८४५)

कुष्ठरोग हा सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे. याचा परिणाम त्वचा, हातातील आणि पायातील परिघवर्ती चेता , नाकाची अंतत्वचा, घसा आणि डोळ्यावर होतो. चेतांच्या टोकावर परिणाम झाल्याने परिणाम झालेल्या भागाची संवेदना नष्ट होते. संवेदना नाहिशी झाल्याने हाता पायाची बोटे वाकडी होतात किंवा गळून पडतात. हात पाय विद्रूप होणे हे या रोगात प्रामुख़्याने आढळते.

भारतात श्री मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. बाबा आमटे यांना हे आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते.

आज जागतिक कृष्ठरोग निर्मूलन दिन आहे.

आज हुतात्मा दिन, (महात्मा गांधी स्मृति दिन) आहे.

गांधीजीनी एकादश (अकरा) व्रतांचा स्वीकार केला होता. ती पुढीलप्रमाणे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह, शरीरश्रम, आस्वाद, सर्वत्र भयवर्जन (निर्भयता), सर्वधर्म सामान्ताव्य (सर्वधर्म समभाव), स्वदेशी, स्पर्शभावना (अस्पृश्यतेचा त्याग). निर्भयता या तत्वाला गांधीजी आधारभूत मानत. त्यांच्यामते निर्भयतेमुळेच इतर तत्वांचे पालन करता येऊ शकते.

३० जानेवारी १९४८ ला, दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली. त्याच्या मते देशाची फाळणी आणि पाकिस्तानला पैसे देऊन भारताला दुबळे पाडण्यासाठी गांधीजी जबाबदार होते. गोडसे आणि त्यांचा सहकारी नारायण आपटे यांच्यावर खटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना १५ नोव्हेंबर १९४९ ला फाशी देण्यात आली. गांधीजींच्या राजघाट येथील समाधीवर ’हे राम’ असे लिहिले आहे. हे त्यांचे शेवटचे शब्द होते असे अनेक जण मानतात, पण त्याची सत्यासत्यता वादग्रस्त आहे.

• १९४८: महात्मा गांधी यांची हत्या. (जन्म: २ ऑक्टोबर १८६९)

काशीबाई कानिटकर या आधुनिक मराठी साहित्यातील आद्यलेखिका होत्या.* आधुनिक मराठी साहित्यातील कादंबरी, चरित्र आणि कथा या साहित्य प्रकाराचे महिला म्हणून प्रथमत: लेखन केले. त्यांचा जन्म २० जानेवारी १८६१ रोजी सातार्‍यातील अष्टे या गावी झाला. त्यांच्या दोन भावांना शिकवायला पंतोजी येत, ते ऐकून, बघून त्या माहेरीच लिहायला शिकल्या.
त्याकाळात स्त्रीशिक्षणाला विरोध होत असे, पण वडिलांच्या प्रोत्साहनामुळे त्या अशा पद्धतीने शिकल्या. पुढे स्वप्रयत्नाने मराठी, इंग्रजी, संस्कृत नाटके वाचून त्यांनी आपली आवड जोपासली. तत्पूर्वी वयाच्या ९ व्या वर्षी काशीबाईंचे लग्न वकील गोविंदराव कानिटकरांशी झाले.ते सुधारणावादी होते.

हरिभाऊ आपटे, न्या. रानडे यांच्या सहवासामुळे स्त्रियांनी शिकावे अशा विचारांचे ते होते.
गोविंदराव कानिटकर आणि काशीबाईंनी मिळून मनोरंजन आणि निबंधचंद्रिका नावाचे नियतकालिक सुरू केले. या नियतकालिकात काशीबाईंचे लेखन सुरू झाले. ‘शेवट तर गोड झाला’ (१८८९) हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. ‘रंगराव’ (१९०३) व ‘पालखीचा गोंडा’ (१९२८) या कादंबर्‍या आणि ‘चांदण्यातील गप्पा’ (१९२१), ‘शिळोप्याच्या गोष्टी’ (१९२३) हे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित झाले.

‘डॉ.आनंदीबाई जोशी : चरित्र व पत्रे’ या चरित्रात्मक पुस्तकाने साहित्यात त्यांना बरीच ख्याती मिळाली. काशीबाईंचे लेखन हे अनुभवावर आधारित असल्याने प्रत्ययकारी आहे. वर्णने लांबलचक, तपशीलवार असतात, पण त्यातही त्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्तीच प्रत्ययाला येते. १९०६ मध्ये पुणे येथील ग्रंथकार संमेलनात त्या एकट्या स्त्री लेखिका उपस्थित होत्या. अशा या प्रख्यात लेखिकेचे ३० जानेवारी १९४८ रोजी निधन झाले.

१९४८ : मराठीमधील पहिल्या स्त्री कथा-कादंबतीकार, निबंधकार आणि सुधारक काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचे निधन . ( जन्म : २० जानेवारी , १८६१ )

  • घटना :
    १६४९: इंग्लंडचे राजा पहिले चार्ल्स यांचा शिरच्छेद करण्यात आला.
    १९३३: अॅडॉल्फ हिटलर यांना जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी झाला.
    १९९४: पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.
    १९९७: महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.

• मृत्यू :

१९९६: हार्मोनियम व ऑर्गन वादक गोविंदराव पटवर्धन यांचे निधन.
२०००: मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर यांचे निधन.
२००४: गीतकार रमेश अणावकर यांचे निधन.
२०२० : विद्या बाळ – या मराठी लेखिका व संपादक होत्या. त्यांनी १९५८ साली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली. महाराष्ट्रामधील व भारतामधील स्त्रियांच्या पुरुषांबरोबरच्या समान हक्कांविषयीच्या सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता (जन्म : १२ जानेवारी, १९३७)

जन्म :
१४८२: मेवाडचे महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग यांचा जन्म. (मृत्यू: ३० जानेवारी १५२८)
१९१०: गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल सी. सुब्रम्हण्यम यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर २०००)
१९११: शास्त्रीय गायक पं. गजाननबुवा जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून १९८७)
१९१७: स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै २००७)
१९२९: हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक रमेश देव यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी, २०२२)
१९४९: नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते, थिएटर अॅकॅडमी चे एक संस्थापक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा चे संचालक, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते डॉ. सतीश आळेकर
यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »