दिनविशेष: आज भगवान महावीर जयंती

आवडल्यास ही बातमी शेअर करा


आज मंगळवार, मार्च ३१, २०२६ युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १०, शके १९४८
सूर्योदय : ०६:३३ सूर्यास्त : १८:५२
चंद्रोदय : १७:३३ चंद्रास्त : ०५:४८, एप्रिल ०१
शक : १९४८
संवत्सर :पराभव
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : चैत्र
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : त्रयोदशी – ०६:५५ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी – १५:२० पर्यंत
योग : गण्ड – १५:४१ पर्यंत
करण : तैतिल – ०६:५५ पर्यंत
द्वितीय करण : गर – १८:५७ पर्यंत
सूर्य राशि :मीन
चंद्र राशि :सिंह – २१:३२ पर्यंत
राहुकाल : १५:४७ ते १७:२०
गुलिक काल : १२:४३ ते १४:१५
यमगण्ड : ०९:३८ ते ११:१०
अभिजित मुहूर्त : १२:१८ ते १३:०७
दुर्मुहूर्त : ०९:०१ ते ०९:५०
दुर्मुहूर्त : २३:३२ ते ००:१९, एप्रिल ०१
अमृत काल : ०८:४८ ते १०:२६
वर्ज्य : २२:४९ ते ००:२९, एप्रिल ०१

भगवान महावीर जैन धर्मातील चोवीस तीर्थंकरांपैकी अखेरचे तीर्थंकर.

महावीरांच्या आधी जैन धर्माचे २३ तीर्थंकर होऊन गेले, असे जैन धर्माचे अनुयायी मानतात आणि त्यामुळे महावीर हे जैन धर्माचे संस्थापक ठरत नाहीत. परंतु जैन धर्माला प्रभावशाली बनविण्याचे फार मोठे श्रेय महावीरांकडे जात असल्यामुळे जगातील प्रमुख धर्मसंस्थापकांच्या मालिकेतील गौतम बुद्ध वगैरेंच्या बरोबरीने त्यांचे नाव घेतले जाते.

तत्कालीन राजपुत्रांना मिळणारे सर्व प्रकारचे शिक्षण महावीरांनाही मिळाले होते परंतु त्यांचे मन गृहस्थ धर्मामध्ये रमले नाही आणि त्यांनी गृहत्याग केला. नंतरची १२ वर्षे त्यांनी खडतर तप केले. प्रारंभीच्या एका वर्षानंतर त्यांनी वस्त्राचाही त्याग केला.

दंश करणाऱ्या कीटकांचीही त्यांनी हत्या केली नाही. अज्ञानी लोकांनी या काळात त्यांचा खूप छळ केला पण त्यांनी तो शांतपणे सोसला. अखेरीस वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर मृत्यूपर्यंत म्हणजेच पुढची तीस वर्षे ते धर्मोपदेश करीत राहिले.

महावीरांचे चरित्र म्हणजे साधुचरित्राचा प्रथम आदर्श, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटले आहे. तितिक्षा, क्षमा, अहिंसा, समता, त्याग इ. गुणांची परमावधी महावीरांच्या ठिकाणी झाली होती, असे ते म्हणतात. स्वाभाविकच, भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील मोजक्या महापुरुषांमध्ये महावीरांचा अंतर्भाव होतो.

आज भगवान महावीर वर्धमान जयंती आहे.

शिखांचे दुसरे गुरू अंगदसाहेब यांचा जन्म पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात मार्च १५०४ मध्ये झाला. गुरू अंगदसाहेब यांचे वडिल लहान मोठा व्यवसाय करायचे. आईचा कल अध्यात्माकडे असल्याने गुरू अंगदसाहेबही दुर्गा मातेची आराधना करायला लागले. नंतर त्यांचा विवाह माता खिवीजी यांच्याशी झाला.

त्यांना दोन पुत्र व दोन मुली होत्या. बाबराच्या आक्रमणामुळे त्यांच्या संपूर्ण कुटूंबाला स्थलांतरीत व्हावे लागले. यानंतर त्यांचा परिवार अमृतसरपासून काही अंतरावर असलेल्या गावात रहायला आला

गुरू अंगदसाहेबांनी एकदा गुरू नानक साहेबांचा उपदेश ऐकला. त्यानंतर गुरू नानक साहेबांची भेट घेण्याचा त्यांनी ध्यास घेतला. त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन झाले. त्यांनी गुरूची भक्ती व सेवेत स्वत:ला झोकून दिले.

त्यांच्या भक्ती व साधनेने प्रभावित होऊन गुरू नानक साहेबांनी १५३९ मध्ये गुरू नानक साहेबांनी गादी त्यांच्याकडे सोपवून त्यांना दूसरे गुरू म्हणून घोषित केले. यानंतर गुरू नानक साहेब यांनी आपल्या शिष्याची अनेक प्रसंगामध्ये परीक्षा पाहिली.

गुरू अंगद साहेब या सर्व परिक्षेत उत्तीर्ण झाले. गुरू अंगद साहेब यांनी आपले गुरू नानक साहेब यांची सात वर्षांपर्यंत सेवा केली. त्यांच्या मृत्यूनंतर गुरू नानक देव यांचे विचार व तत्वज्ञानाचा त्यांनी प्रसार केला. गुरू अंगद साहेबांनी शैक्षणिक क्षेत्रातही महत्वाचे योगदान दिले.

त्यांनी पंजाबी लेखन शैलीत सुधारणा करून नवीन गुरूमुखी लिपी वापरात आणली. त्यांनी शाळा उघडून शिक्षणाचा प्रसार केला. तरूण पिढी सशक्त व उमदी घडविण्यासाठी त्यांनी मल्ल आखाडे उघडले. शारीरीक व अध्यात्मिक शिक्षण देण्याची ती केंद्रे बनली.

त्यांनी गुरू नानक साहेबांचे चरित्रही लिहिले. याशिवाय त्यानी लिहिलेल्या पदांचा गुरू ग्रंथसाहिबमध्ये समावेश करण्यात आला आहे. गुरू अंगद साहेबांनी शीख धर्माच्या प्रसार प्रचारासाठी पीठांची स्थापना केली.

शीख धर्माचे तत्वज्ञान रूजवून त्यांनी धर्मास खर्या अर्थाने प्रस्थापित केले. त्यांच्यानंतर प्रथेप्रमाणे त्यांनी गुरू अमरदेव साहेबांना उत्तराधिकारी नेमले. मार्च १५५२ मध्ये गुरू साहेबांची प्राणज्योत मालवली.

१५०४: शिखांचे दुसरे गुरू – गुरू अंगद देव यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १५५२)

  • घटना :

१६६५: मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरूवात केली.
१८६७: डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.
१८८९: आयफेल टॉवरचे उद्घाटन झाले. हा बांधायला २ वर्षे, २ महिने व २ दिवस लागले.
१९०१: पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकार्यासाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.
१९६४: मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.
१९६६: रशियाने ल्यूना-१० हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला.
१९७०: १२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.
२००१: सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.

• मृत्यू :

• १९७२: अभिनेत्री महजबीन बानो ऊर्फ मीनाकुमारी यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९३२)
• २०००: भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १९०२)
• २००२: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी मोतुरू उदायम यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९२४)
• २००४: अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२४)
• २००४: कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)

  • जन्म :

१५०४: शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १५५२)
१८४३ : पहिले मराठी श्रेष्ठ भारतीय डॉक्टर, नाटककार, नट, दिग्दर्शक बळवंत पांडुरंग उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म ( ( मृत्यू : २ नोव्हेंबर १८८५ )१८७१: स्वातंत्र्यसैनिक कर्नाटकसिंह गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९६०)
१८६५: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १८८७)
१८७१ : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ‘कर्नाटक सिंह’ या नावाने प्रसिद्ध असणारे एक निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचा जन्म ( मृत्यू : ३० जुलै १९६०)
१९०२: भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २०००)
१९३४: भारतीय कवी आणि लेखक कमला सुरय्या ( कमला दास यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे २००९)
१९३८: दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ १५ वर्षे (१९९८ पासून ते २०१३ पर्यंत ) मुख्यमंत्री पद भुषवणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचा जन्म ( मृत्यू : २० जुलै, २०१९ )
१९५५ : मराठी नाट्य-चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक कुमार सोहोनी उर्फ नरेंद्रकुमार नरहर सोहनी यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »