‘माळेगाव’च्या अध्यक्षपदी जगताप, देवकाते उपाध्यक्ष

पुणे – माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव असलेले अॅड. केशवराव सर्जेराव जगताप यांची, तर उपाध्यक्षपदी तानाजी नामदेव देवकाते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच वादा..अजितदादा,
अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
बारामतीसह राज्यात राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतरही बारामतीमध्ये अजित पवार यांचेच राजकियदृष्ट्या वर्चस्व असल्याचे वरील निवडणूकीवरून स्पष्ट होते. दुसरीकडे, माळेगावच्या सत्तेच्या सारीपाटात केशवराव जगताप यांनी अध्यक्षपदी बाजी मारल्याने शेकडो कार्य़कर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण केली. फटाक्यांची अतषबाजी केली.
निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडेकर, कार्य़कारी संचालक अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी संचालक मंडळाची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार अध्यक्षपदासाठी अॅड. केशवराव जगताप, तर उपाध्यक्षपदी तानाजी देवकाते यांची नावे जाहिर केली. त्यानुसार उपस्थित संचालक मंडळाने वरील नावांना सहमती दर्शवित वरील निवडणूक बिनविरोध केली.
यावेळी संचालक तानाजी कोकरे, बन्शीलाल आटोळे, रंजन तावरे, संजय काटे, योगेश जगताप, सुरेश खालटे, अनिल तावरे, मदनराव देवकाते, प्रताप आटोळे, नितीन सातव, गुलाबराव गावडे, राजेंद्र ढवाण, स्वप्नील जगताप, संगिता कोकरे, अलका पोंदकुले, तानाजी नामदेव देवकाते, मंगेश जगताप, नितीन जगताप, सुरेश देवकाते, पंकज भोसले, कार्य़कारी संचालक अशोकराव पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री .तावरे म्हणाले,गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला माळेगावने राज्यात प्रथम क्रमांकाचा प्रतिटन ३४११ अंतिम दर शेतकऱ्यांना जाहिर केला आहे. सभासदांना अधिकचे दोन पैसे देणे आणि संस्थेची अर्थिक क्षमता भक्कम ठेवण्यात संचालक मंडळ यशस्वी झाले आहे. यापुढील काळात नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्षांना सर्वतोपरी माझे सहकार्य़ राहिले,
मावळते अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी आपला साडेतीन वर्षाचा कार्य़काळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिली होता, तसेच उपाध्यक्ष सागर जाधव यांनीही एक वर्षाचा ठरवून दिलेला कार्य़काळ पुर्ण झाल्यामुळे राजीनामा दिला होता.