‘माळेगाव’च्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा राजीनामा मंजूर

पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे आणि उपाध्यक्ष सागर जाधव यांचे राजीनामे संचालक मंडळाच्या बैठकीत शनिवारी मंजूर करण्यात आले, अशी माहिती कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी दिली. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबर रोजी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाटील म्हणाले की, दोन्ही राजीनामे प्रादेशिक सहसंचालकांकडे पाठवले जातील आणि त्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार पुढील प्रशासकीय कार्यवाही केली जाईल.
तावरे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिला होता, तर उपाध्यक्ष सागर जाधव यांनी कार्यकाल संपल्याने राजीनामा दिला होता.

दरम्यान, कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी नितीन पोपटराव जगताप यांची , तर कार्यलक्षी संचालक तथा कामगार प्रतिनिधी म्हणून सुरेश गुलाबराव देवकाते यांची निवड करण्यात आली आहे.