मंडलिक कारखान्याच्या अध्यक्षपदी खा. संजय मंडलिक
कोल्हापूर : लोकनेते सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी खासदार संजय सदाशिवराव मंडलिक यांची, तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक शिवाजीराव दौलतराव इंगळे यांची निवड झाली आहे.
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनानंतर ही सलग दुसऱ्यांदा कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी ११ नवीन चेहऱ्यांना संचालक मंडळात संधी मिळाली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी नूतन संचालक मंडळाची बैठक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांनी काम पाहिले.
कारखान्याच्या अध्यक्षपदी खा. संजय मंडलिक खा.संजय मंडलिक शिवाजीराव इंगळे यांची फेरनिवड झाली आहे. त्यांचे नाव विश्वासराव कुराडे यांनी सुचवले व त्यास प्रकाश पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदी शिवाजीराव इंगळे यांचे नाव वीरेंद्र मंडलिक यांनी सुचविले व त्यास कैलास जाधव यांनी अनुमोदन दिले.
यावेळी संचालक संभाजी मोरे, तुकाराम ढोले, आनंदराव फराकटे, कृष्णा शिंदे, सत्यजित पाटील, धनाजी बाचणकर, महेश घाटगे, सौ. मंगल तुकान, पुंडलिक पाटील, प्रदीप चव्हाण, सौ. नंदिनीदेवी घोरपडे, सौ. प्रतिभा पाटील अन्य माजी संचालक व विविध मान्यवर उपस्थित होते.