मंगेश पाडगावकर

आज सोमवार, मार्च १०, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन १८ , शके १९४६
सूर्योदय : ०६:५१ सूर्यास्त : १८:४७
चंद्रोदय : १५:२९ चंद्रास्त : ०४:५९, मार्च ११
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : फाल्गुन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : आमलकी एकादशी – ०७:४४ पर्यंत
नक्षत्र : पुष्य – ००:५१, मार्च ११ पर्यंत
योग : शोभन – १३:५७ पर्यंत
करण : विष्टि – ०७:४४ पर्यंत
द्वितीय करण : बव – १९:५५ पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशि : कर्क
राहुकाल : ०८:२० ते ०९:५०
गुलिक काल : १४:१८ ते १५:४८
यमगण्ड : ११:१९ ते १२:४९
अभिजित मुहूर्त : १२:२५ ते १३:१३
दुर्मुहूर्त : १३:१३ ते १४:००
दुर्मुहूर्त : १५:३६ ते १६:२४
अमृत काल : १८:१२ ते १९:५२
वर्ज्य : ०८:१४ ते ०९:५३
शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातूनी
चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातूनी
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा ॥ १ ॥ कवी मंगेश पाडगावकर
मराठी कवी मंगेश पाडगावकर – जन्म वेंगुर्ल्याचा आणि प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. उच्च शिक्षण मुंबईत झाले. मराठी आणि संस्कृत हे विषय घेऊन ते बी. ए. आणि एम्.ए. ह्या परीक्षा पहिल्या वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले . ह्या दोन परीक्षांतील यशाबद्दल त्यांना अनुक्रमे ‘तर्खडकर सुवर्णपदक’ आणि ‘न. चिं केळकर सुवर्णपदक’ देण्यात आले. एम्.ए. होण्यापूर्वीच मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक (१९५१-५२), साधना साप्ताहिकात सहसंपादक (१९५३–५५) असा नोकऱ्या त्यांनी केल्या होल्या.
१९५७ मध्ये आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर ‘असिस्टंट प्रोड्यूसर’ म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९६० ते ६२ ह्या काळात मुंबईच्या ‘सोमैया कॉलेज’ आणि ‘मिठीबाई कॉलेज’ मध्ये मराठीचे प्रमुख प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर ‘प्रोड्यूसर’ म्हणून ते काही काळ होते (१९६४–७०). १९७० पासून ‘युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिस’, मुंबई येथे मराठी विभागाचे प्रमुख संपादक म्हणून ते काम करू लागले. १९७६–७९ ह्या वर्षांसाठी मुंबई विद्यापीठात मराठीचे मानसेवी प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. १९५० मध्ये रेव्हरंड भास्कर कृष्ण उजगरे ह्यांची कन्या यशोदा हिच्याशी त्यांचा आंतरधर्मीय विवाह झाला.
धारानृत्य (१९५०) हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. त्यातील कवितेवर बोरकरांच्या कवितेचे संस्कार स्पष्टपणे जाणवतात. त्यानंतरच्या काव्यसंग्रहात जिप्सी (१९५२), छोरी (१९५४), उत्सव (१९६२), विदूषक (१९६६) व सलाम (१९७८) ह्यांचा समावेश होतो. त्यांच्या कवितेचे स्वतंत्र पृथगात्म रूप त्यांतून व्यक्त होत गेले. मीरा बाईच्या काही हिंदी गीतांचा त्यांनी केलेला मराठी पद्यानुवाद मीरा ह्या नावाने प्रसिद्ध झाला आहे (१९६५). इंग्रजीतील लिम्रिकच्या धर्तीवर मराठीत त्यांनी काही वात्रटिकाही (१९६४) लिहिल्या आहेत. भोलानाथ (१९६३) आणि बबलगम (१९६७) हे त्यांच्या बालगीतांचे संग्रह. जिप्सी, छोरी व भोलानाथ ह्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळालेली आहेत.
पाडगावकरांच्या रम्यत्वाने वेडावून जाणाऱ्या वृत्तीला सौंदर्याचा प्रथम आणि सर्वंकष प्रत्यय येतो, तो विविधरूपधारी निसर्गातून. निसर्गाची लसलसती, गूढरम्य विलसिते त्यांच्या सौंदर्यवृत्तीबरोबरच अध्यात्मवृत्तीचेही संतर्पण करतात त्यांना अंतर्मुख बनवितात त्यांच्या सर्जनशीलतेला आवाहन करतात. निसर्गाच्या जोडीने पाडगावकरांच्या कवितेत प्रेमभावनेच्याही अनेक गहिऱ्या छटा आविष्कृत झाल्या आहेत. प्रेमभावनेच्या उत्कट आविष्काराच्या दृष्टीने पाडगावकरांचे शर्मिष्ठा (१९५५) हे नाट्यकाव्य महत्त्वाचे.
पाडगावकरांच्या ठिकाणच्या व्यापक सामाजिक जाणिवांमुळे भोगाइतकेच त्यागाचे, जीवनातील सुरूपतेप्रमाणेच कुरूपतेचेही दर्शन त्यांची कविता घडविते. पाडगावकरांची अलीकडील कविता उपहासउपरोधाने भरलेली दिसते. सलाम हा काव्यसंग्रह त्या दृष्टिने उल्लेखनीय आहे.
१९२९: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म. ( मृत्यू: ३० डिसेंबर, २०१५ )
कोकण गांधी सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन – अप्पांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी तत्त्वज्ञान हा विषय निवडला. ते एम.ए. ची परीक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. ते साबरमतीला गांधीजींकडे पत्रव्यवहार लिहीत असत. मात्र अप्पा गांधीजींच्या विचारांनी एवढे प्रभावित झाले, की त्यांनी १९१७-१८ मध्ये एक वर्ष ‘न्यू पूना कॉलेज’मध्ये (आताचे एस.पी.) तत्त्वज्ञानाची प्राध्यापकी करून लगेच राजीनामा दिला आणि त्यांनी समाजकार्य करण्याचे ठरवले. ते गांधीजींच्या आश्रमात दाखल झाले.
गांधीजींनी त्यांना चार कामे दिली – १. मीठाच्या कायद्याचा अभ्यास करणे. तो पुढे १९३० च्या मीठ सत्याग्रहाची बैठक ठरला. २. गांधीजींचा पत्रव्यवहार सांभाळणे. ३. ‘यंग इंडिया’चे संपादन करणे. ४. साबरमती आश्रमातील राष्ट्रीय शाळेत शिकवणे व मुख्य म्हणून काम करणे.
त्यांनी कणकवली गावात आल्यापासून हातात झाडू घेऊन गाव साफ करण्यास घेतले. इतर लोकपण त्यांच्याप्रमाणे काम करू लागले.
अप्पासाहेबांना स्वच्छतेची आवड होती. लोक नदीवर शौचाला जात किंवा कोठे आडोशाला बसत. संडास कोणाकडे फार नसत. म्हणून अप्पांनी भंगी कष्टमुक्तीसाठी चराचे संडास, गोपुरी संडास, सोपा संडास असे अनेक संडास लोकप्रिय केले. मानवी विष्ठेचा खतासाठी उपयोग करताना त्यांनी शौचघरे शास्त्रीय पद्धतीने बांधली. त्यांनी 3 फूट x 3 फूट x 3 फूट आकाराच्या दोन टाक्या बांधल्या. या टाक्या एकमेकांना लागून होत्या. टाक्यांच्या वरच्या बाजूस मधोमध शौचविधी करण्यास दीड फूट लांब व नऊ इंच रुंद अशी पोकळ जागा ठेवण्यात आली. शौचविधी झाल्यानंतर त्यावर माती टाकण्यात येई. असे केल्यानंतर सहा महिन्यांत त्यातून सेंद्रिय खत तयार होई. असे सहा महिने वापरले म्हणजे सहा महिन्यांत त्याचे सोनखत तयार होते. ते झाडांना घातले तर झाडे तरारून येतात. एक टाकी भरली, की दुसऱ्या टाकीचा उपयोग केला जाई. अप्पासाहेबांनी त्याला ‘गोपुरी शौचघर’ असे नाव दिले. अप्पांनी त्याकाळात कुकर, पवनचक्की, गोबरगॅस प्लँट असे अपारंपरिक ऊर्जास्रोताचे यशस्वी प्रयोगही केले. त्यावर पुस्तके लिहिली.
त्यांच्या आश्रमातील फळे, फुले विक्रीला येत. भाजीपाला पण विक्रीला येई. दुधदुभते पण विक्रीला येई. चामड्याच्या पर्स, चप्पल, बॅगा यांची पण विक्री होई. उन्हाळ्यात मुंबईकरांना गोपुरीमध्ये जांभळे, करवंदे, चिकू, आंबे, फणस, सरबते, आंब्यांची साले, फणसाची साले खाण्यास व नेण्यास मिळत. प्रवासी लोकांची गर्दी वाढली. गोपुरीत मोठी प्रदर्शने होत. मोठमोठे लोक येत. सुतकताई, गोबर गॅस, पवनचक्की पण चालू होती. त्यांनी तरुणांची लग्ने लावून दिली. त्यांचे संसार थाटले गेले. गोपुरी पाहण्यास लांबहून लोक येत. सर्व झाडे हिरवीगार होती. लोक सुट्टीच्या दिवशी अगर संध्याकाळी मुद्दाम तेथे फिरण्यास येत.
आचार्य स.ज. भागवतांनी अप्पांच्या जीवनाचे रहस्य पुढील शब्दांत लिहिले आहे –
“मातृभक्ती, ब्रह्मचर्य, दलितसेवा ही त्यांची जीवनप्रेरणा होती. सत्य, प्रेम, सेवा या तीन त्यांच्या शक्ती होत्या आणि वीरवृत्ती होती.”
• १९७१: कोकण गांधी सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर, १८९४)
- घटना :
१८६२: अमेरिकेत कागदी चलन नोटांची सुरवात झाली.
१८७६: अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी त्यांचा सहकारी थॉमस वॅटसन यांच्याशी दुरध्वनी वरून पहिल्यांदा संवाद साधला.
१९२२: प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधींना ६ वर्षांची शिक्षा झाली.
१९५२: केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अॅंटिबायोटिक्स या पेनिसिलीन कारखान्याचा पायाभरणी समारंभ झाला.
१९७२: वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाईंडर या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.
१९७७: युरेनस ग्रहाला शनी ग्रहासारखी कडी असल्याचा शोध लागला.
१९८५: भारताने पाकिस्तानला पराभूत करून मेलबोर्न येथे बेन्सन अॅण्ड हेजेस चॅम्पियनशिप हि क्रिकेट स्पर्धा जिकली.
१९८५: भारतीय क्रिकेट संघाने रवि शास्त्री यांना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताब मिळाला.
१९९८: भारतीय बुध्दीबळपटू विश्वनाथन आनंद यांनी लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुध्दिबळ स्पर्धा जिंकली.
• मृत्यू :
१८९७: पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १८३१)
• १९५९: पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद जयकर यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १८७३)
• १९९९: प्रसिद्ध कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी , १९१२)
- जन्म :
१९१८: गायक आणि अभिनेता सौदागर नागनाथ गोरे उर्फ छोटा गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर, १९९७)
१९४५: केंद्रीय रेल्वे मंत्री माधवराव शिवाजीराव शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर, २००१ – मैनपुरी, उत्तर प्रदेश)