एमसीडीसीचा राळेगणसिद्धी येथे प्रशिक्षण कार्यक्रम

अहिल्यानगर : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या (एमसीडीसी) वतीने पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच झाले.
एडीबी अर्थसहाय्य मॅग्नेट प्रकल्पांतर्गत हिंद स्वराज्य ट्रस्ट, राळेगणसिद्धी येथे फुल पिके- उत्तम कृषी पद्धतीबाबत हे एक दिवसाच्या प्रशिक्षण होते. त्याच्या आयोजनाची माहिती अण्णा हजारे यांना श्री. तिटकारे यांनी दिली. अण्णांनी याबाबत आस्थेने माहिती घेतली. यावेळी महामंडळाचे अन्य अधिकारीही उपस्थित होते.






