मंगेश तिटकारे यांच्यावर ‘एमसीडीसी’ची जबाबदारी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : साखर सहसंचालक (प्रशासन) मंगेश तिटकारे यांना महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या (एमसीडीसी) व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी २४ जुलै रोजी नवा पदभार स्वीकारला.

श्री. तिटकारे यांनी साखर आयुक्तालयात सहसंचालक (प्रशासन) या पदावर कार्यरत असताना, आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या बदलीचा आदेश २४ जुलै रोजी निघाला. ‘एमसीडीसी’चे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांची ते जागा घेतील. आकरे यांची पुण्यात रिक्त असलेल्या अपर निबंधक (सहकारी संस्था : तपासणी व निवडणुका) या पदावर बदली करण्यात आली आहे.

श्री. तिटकारे यांचा कार्यकाल त्यांनी बजावलेल्या कामगिरीमुळे गाजला. या काळात आपल्या पदाची जबाबदारी उत्तमपणे सांभाळतानाच त्यांनी साखर उद्योगावर लिहिलेली पुस्तकेही गाजली. त्यात समग्र साखर उद्योगाचा आढावा घेणारे ‘इक्षुदंड ते इथेनॉल’ या पुस्तकाचेही ते सहलेखक आहेत. साखर उद्योगावर त्यांचे लिखाण सुरूच आहे. साखर उद्योग आणि सहकार क्षेत्राला समर्पित मराठीतील पहिले प्रकाशन ‘शुगरटुडे’ मॅगेझीनचेही ते स्तंभलेखक आहेत. त्यांचा ‘शर्करायन’ हा स्तंभ ‘शुगरटुडे’मध्ये दर महिन्याला नियमित प्रसिद्ध होत असतो.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »