‘मांजरा समूहा’च्या सात कारखान्यांचे ५.४९ लाख टन ऊस गाळप

आवडल्यास ही बातमी शेअर करा

लातूर- विलासराव देशमुख मांजरा साखर समूहातील लातूर जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांनी २०२३-२४ चालू हंगामात २७ नोव्हेंबर अखेर ५ लाख ४८ हजार ८६९ मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप केले असून त्यात परिवारातील मांजरा, रेणा, जागृति, विलास १, विलास २, मारुती महाराज, द्वेण्टी वन शुगर साखर कारखान्याचा समावेश आहे.

मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आ. अमित देशमुख, आ. धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सात साखर कारखाने यशस्वीपणे गाळप करीत असून त्यात विकासरत्न विलासराव देशमुख मांजर साखर कारखाना १ लाख ९ हजार ४३०, रेणा साखर ८८ हजार ५००, जागृती शुगर ९५,०२०, विलास साखर युनिट १ निवळी १,१३,९८०, विलास युनिट२ ९१,१७०, द्वेण्टी शुगर मळवटी १,१०,३००, मारुती महाराज बेलकुंड या साखर कारखान्याचा समावेश असून अतिशय काटेकोरपणे पारदर्शकता ठेवून परिवारातील साखर कारखाने यशस्वीपणे गाळप करत असून त्यासाठी प्रत्येक साखर कारखाना स्थळी आपापल्या प्रशासनाच्या निर्देशानुसार ऊसतोडणी संगणक सिस्टीम असल्याने व्यवस्थित तोडणी सुरू आहे.
दरम्यान आपल्या कार्यक्षेत्रात परिवारातील सदस्य असलेल्या आपल्या साखर कारखान्यास ऊस द्यावा, असे आवाहन दिलीपराव देशमुख यांनी केले आहे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »