‘मारुती महाराज’ च्या चेअरमनपदी श्याम भोसले

आवडल्यास ही बातमी शेअर करा

लातूर : येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी श्याम भोसले यांची, तर व्हा. चेअरमनपदी सचिन पाटील यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली.

कारखाना कार्यालयात चेअरमन व व्हा. चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी संगमेश्वर बदनाळे यांच्याकडे चेअरमन पदासाठी श्याम भोसले, तर व्हा. चेअरमन पदासाठी सचिन पाटील यांचे अर्ज आले होते. अन्य अर्ज न आल्याने बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे यांनी सहकार्य केले.

बैठकीला साखर कारखान्याचे नूतन संचालक माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, गणपतराव बाजुळगे, बाबासाहेब गायकवाड, श्यामराव साळुंखे, सुभाष जाधव, भरत माळी, गोविंद सोनटक्के, विलास काळे, संतोष भोसले, रमेश वळके, अनिल पाटील, निवेदिता पाटील, शुभांगी बिराजदार उपस्थित होते. यावेळी साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, सचिन दाताळ, बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र भोसले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नबी शेख, कारखान्याचे कर्मचारी सूर्यकांत सावंत, गोपाळ चव्हाण, सुनील पवार, आण्णासाहेब मोरे, भुराज बदने यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »