गडहिंग्लज साखर कारखान्याला एमडी लाभेना!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक महावीर घोडके यांनी राजीनामा दिला आहे. तडकाफडकी राजीनामा देणारे ते वर्षभरातील तिसरे एम.डी. आहेत. त्यांनी टपाल विभागात राजीनामा देऊन शुक्रवारी कारखान्याचा निरोप घेतला.

१ नोव्हेंबर, २०२३ रोजी त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली होती. नंतर ४ महिन्यांतच त्यांनी राजीनामा दिला. राजीनाम्याचे कारण समजे नाही. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, संपर्क होऊ शकला नाही.

एम. डी. सुधीर पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर कारखान्याकडे पाठ फिरवली. त्यांचा ४ महिन्यांचा पगारही देय असल्याची चर्चा आहे. दरम्यान, काही विभागप्रमुखांनीही कारखाना सोडल्यामुळे एकहाती सत्ता असलेला गडहिंग्लज कारखाना सुरू पुन्हा चर्चेत आला आहे.

नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत माजी आमदार श्रीपतराव शिंदे व आमदार राजेश पाटील यांच्या आघाडीचा पराभव करून आमदार हसन मुश्रीफ व डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेवर आली. अध्यक्षपदी डॉ. शहापूरकर, तर उपाध्यक्षपदी प्रकाश चव्हाण यांची निवड झाली. आर्थिक अडचणीमुळे गेल्यावर्षी बंद राहिलेला कारखाना मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेतून केलेल्या ५५ कोटींच्या अर्थसाहाय्यामुळे यावर्षी झाला.


औटघटकेचा कार्यकाल !

  • औदुंबर तांबे (१२ डिसेंबर, २०२२ – २५ मे,२०२३)
  • सुधीर पाटील (१ जून, २०२३-४ ऑक्टोबर, २०२३)
  • महावीर घोडके (१ नोव्हेंबर, २०२३- १५ मार्च, २०२४)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »