एमडी पॅनल मुलाखतींसाठी अखेर मुहूर्त

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : सहकारी साखर कारखान्यांसाठी पात्र इच्छुकांचा कार्यकारी संचालक पॅनलमध्ये समावेश करण्याला अखेर मुहूर्त मिळाला आहे. पात्र उमेदवारांची यादी वैकुंठ मेहता संस्थेने जाहीर केली असून, १८ जुलैपासून मुलाखत प्रक्रिया सुरू होणार आहे.

‘एमडी एम्पॅनलमेंट’ प्रक्रिया अनेक वर्षांपासून रखडली होती. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था, पुणेकडे याबाबत जबाबदारी सोपवण्यात आली होती. संस्थेमध्ये गेल्या वर्षी त्यासाठी लेखी परीक्षा झाल्या आणि उत्तीर्ण उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र काही उमेदवारांनी कोर्टात धाव घेतल्याने प्रक्रिया रखडली होती.

या संस्थेने अखेर मुलाखतींसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात ७४ उमेदवारांचा समावेश आहे. त्यांच्या मुलाखतींचे वेळापत्रकही जाहीर केले असून, १८, १९ आणि २२ जुलै २०२४ रोजी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्या दोन सत्रांमध्ये होतील. प्रत्येक सत्रात १२ जणांच्या मुलाखती होणार आहेत. शेवटच्या दिवशी, दुसऱ्या सत्रात १४ जणांच्या मुलाखती होतील.
१८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मुलाखतींना प्रारंभ होईल. दुपारच्या सत्रातील मुलाखतींची वेळ १२.३० वाजताची आहे, असे वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेने कळवले आहे.

पात्र उमेदवारांची यादी आणि मुलाखतींचे वेळापत्रक खालीलप्रमाणे…

आवडल्यास ही बातमी शेअर करा

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »