उदगिरी शुगरचे मिल रोलर पूजन
सांगली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे संस्थापक, द्रष्टे व्यक्तिमत्त्व डॉ. शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कारखान्याचे चेअरमन (सीएमडी) डॉ. राहुलदादा कदम यांच्या नेतृत्वाखालील विविध विक्रम प्रस्थापित करणाऱ्या या शेतकरीभिमुख साखर कारखान्याचे मिल रोलर पूजन नुकतेच झाले.
विटा बामणी- पारे (ता. खानापूर) येथील उदगिरी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ च्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली असून सर्व कामे वेळेत पूर्ण करून येणारा गळीत हंगाम वेळेत व पूर्ण क्षमतेने सुरू होत आहे. या गळीत हंगामात ७ लाख टन ऊस गाळप करण्यात होणार असल्याची माहिती कारखान्याचे पूर्ण वेळ संचालक उत्तम पाटील यांनी दिली.
मशिनरी ओव्हर हॉलिंग, मेंटेनन्सची कामे प्रगतिपथावर आहेत. गळीत हंगाम वेळेत व पूर्ण क्षमतेने सुरू होईल. ऊस तोडणी-वाहतुकीचे करार सुरू असून १५ ट्रक, ३३५ ट्रॅक्टर, ४०० ट्रॅक्टर गाडी (अंगद) व १५ हार्वेस्टर चालकांसमवेत करार झाले असून त्यांना अॅडव्हान्स वाटपही सुरू केले आहे. आजअखेर ९ हजार ५०० हेक्टर उसाची नोंद झाली आहे. या हंगामामध्ये ७ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस कारखान्याकडे नोंद करावा, असे आवाहन उत्तम पाटील यांनी केले.
यावेळी चीफ इंजिनिअर जितेंद्र मेटकरी, प्रॉडक्शन मॅनेजर निवास पवार, जनरल मॅनेजर (फायनान्स) आर. आर. चव्हाण, डिस्टिलरी मॅनेजर कुलदीप पांढरे, केन मॅनेजर जितेंद्र जाधव, प्रशासकीय अधिकारी बशीर संदे, एचआर मॅनेजर रणजित चव्हाण, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.