खासदार विशाल पाटील पुन्हा साखर कारखान्याच्या निवडणूक रिंगणात

आवडल्यास ही बातमी शेअर करा

वसंतदादा कारखाना : २१ जागांसाठी १४४ अर्ज दाखल

सांगली : राज्यातील जुन्या साखर कारखान्यांपैकी असलेल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २१ संचालक पदांसाठी १४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्जाची छाननी १० फेब्रुवारीला आहे. तर २५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. आवश्यकता भासल्यास ९ मार्चला मतदान होणार आहे.
अर्ज दाखल केलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये व्यक्ती उत्पादक गटातून विद्यमान अध्यक्ष खासदार विशाल पाटील, हर्षवर्धन पाटील, उदयसिंह कदम, दिनकर साळुंखे, राजेश एडके, प्रदीप मगदूम, प्रवीण पाटील, बजरंग पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत.
वसंतदादा साखर कारखाना सध्या १० वर्षे मुदतीसाठी दत्त इंडिया कंपनीस चालविण्यास दिला आहे. सध्याचा आठवा हंगाम ते घेत आहेत. तेव्हा, कारखाना निवडणूक लागणार की बिनविरोध होणार, यावर २५ तारखेला शिक्कामोर्तब होणार आहे.

वसंतदादा कारखान्याच्या २१ संचालक पदांसाठी निवडणूक होत आहे. कारखान्याचे ३६ हजार मतदार आहेत, यामध्ये सांगली, मिरज, आष्टा, भिलवडी, तासगाव या पाच गटांमधून प्रत्येकी ३ असे १५, उत्पादक सह‌कारी संस्था, विगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था सभासद मतदारसंघ क्रमांक २, तसेच अनुसूचित जाती किंवा जमाती मागासवर्गीय १, भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गामधून १ असे २१ संचालक निवडून द्यायचे आहेत. सध्या हा कारखाना ‘दत्त इंडिया कडे चालविण्यासाठी दिलेला आहे.
गटनिहाय दाखल झालेले प्रमुख अर्ज असे: मिरज गटातून तानाजी पाटील, दौलतराव शिंदे, शिवाजी कदम, संभाजी मेंढे, विजयकुमार जगताप, भाऊसाहेब भोसले, विठ्ठल पाटील. आष्टा गटातून सुनील आवटी, अशोक पाटील, कौशिक वग्याणी, रघुनाथ फटील, विशाल चौगुले, मोहन देशमुख, संदीप आडमुठे, सुरेश पाटील, ऋतुराज पाटील, मीनाक्षी पाटील, विजय सूर्यवंशी. भिलवडी गट- रवींद्र पाटील, सुनील सावंत, अमित पाटील, दादासाहेब पाटील, नानासाहेब गोंदिल, तासगाव गट शिवाजी पाटील, रावसाहेब लंगडे, भरत साळुंखे, अंकुश पाटील, विजयकुमार मोहिते, गजानन खुजट,
उत्पादक सहकारी संस्था गट: स्वप्नील पाटील, विशाल पाटील. अनुसूचित जाती-जमाती मतदार गट विशाल चंदूरकर, प्रकाश कांबळे. महिला मतदार गट सुमित्रा खोत, अनिता वण्याणी, अलौकिका घोरपडे, शोभा पाटील, कमल पाटील. इतर मागासवर्गीय गट अंकुश पाटील, संभाजी मेढे, प्रकाश फल्ले. भटक्या विमुक्त जाती व मागास प्रवर्ग गट- सुरेश पाटील, भीमराव हुलवान, गजानन शेंडगे, गंगाराम शेंडगे, विश्वास पाटील, प्रल्हाद गडदे

निवडणूक प्रक्रिया
अर्जाची छाननी –
१० फेब्रुवारी
वैध अर्ज प्रसिद्धी-
११ फेब्रुवारी
अर्ज माघार-
११ ते २५ फेब्रुवारी
■ उमेदवारांची अंतिम यादी -२७ फेब्रुवारी
मतदान- ९ मार्च

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »