संगीतकार खय्याम

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज मंगळवार, ऑगस्ट १९, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक २९, शके १९४७
सूर्योदय : ०६:२१ सूर्यास्त : १९:०३
चंद्रोदय : ०३:१३, ऑगस्ट २० चंद्रास्त : १६:१०
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : श्रावण
चंद्र माह : श्रावण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अजा एकादशी – १५:३२ पर्यंत
नक्षत्र : आर्द्रा – ०१:०७, ऑगस्ट २० पर्यंत
योग : वज्र – २०:३० पर्यंत
करण : बालव – १५:३२ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – ०२:४३, ऑगस्ट २० पर्यंत
सूर्य राशि : सिंह
चंद्र राशि : मिथुन
राहुकाल : १५:५३ ते १७:२८
गुलिक काल : १२:४२ ते १४:१७
यमगण्ड : ०९:३१ ते ११:०७
अभिजित मुहूर्त : १२:१६ ते १३:०७
दुर्मुहूर्त : ०८:५३ ते ०९:४४
दुर्मुहूर्त : २३:३४ ते ००:१९, ऑगस्ट २०
अमृत काल : १५:३२ ते १७:०४
वर्ज्य : १०:०९ ते ११:४१

आज जागतिक छायाचित्रण दिन आहे.

१९१८: भारताचे ९वे राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९९९)

डॉ. विनायक विश्वनाथ ऊर्फ अप्पा पेंडसे (जन्म : १७ ऑगस्ट, इ.स. १९१६; मृत्यू : १९ ऑगस्ट, इ.स. १९८३) हे एक दूरदृष्टी असलेले देशप्रेमी शिक्षणतज्ज्ञ होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असलेले अप्पा पेंडसे हे पीएच.डी पदवी धारण करणारे, संगीत आणि वेदान्त या दोघांतही रस असणारे तत्त्वज्ञ, लेखक, आणि मनात क्रांतिकारी विचार बाळगणारे आदर्शवादी कार्यकर्ते होते.
स्वामी श्रद्धानंदांची एका माथेफिरू माणसाने हत्या केल्यानंतर आपण श्रद्धानंदांची जागा घ्यायची असे अप्पा पेंडसे यांनी वयाच्या १०व्या वर्षी ठरवले.

ब्रिटिशांनी भारतात पाठविलेले सर्व ब्रिटिश सभासद असलेले सायमन कमिशन जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्याचे काळ्या झेंड्यांनी स्वागत करणाऱ्यांमध्ये १२ वर्षांचे अप्पा पेंडसे होते. त्यावेळी जुन्या आणि नव्या हजारो कार्यकर्त्यांनी भर उन्हात सायमन कमिशनचा धिक्कार करणारा लांबलचक मोर्चा काढला होता. भारताचे भवितव्य ठरवणाऱ्या या कमिशनमध्ये एकही भारतीय का नसावा हा त्यांचा सवाल होता. वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि सुराज्यासाठी स्वतःला वाहून घेण्याची प्रतिज्ञा केली.

अप्पा पेंडसे हे लाला लजपत राय यांच्या स्काउट दलात होते; भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुक्तेश्वर दलात इ.स. १९३०मधे ते सामील झाले. १९३२मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले. सदूभाऊ गोखले यांनी सुरू केलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या पुण्यातील पहिला सात सभासदांमधले ते एक होते. दलाच्या बॅँड पथकात ते बॅँंड वाजवीत. तरुण जवाहरलाल नेहरूंचे स्वागत करणार्या भारतीय काँग्रेस पक्षाच्या स्वयंसेवकांमध्ये त्यांचाही समावेश होता.

अनेक वैचारिक मतभेद असणाऱ्या समाजगटांमध्ये व संस्थांच्या माध्यमातून काम करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे या एकाच विचाराने ते भारले गेले होते.
भारताला स्वातंत्र्य मिळताक्षणीच त्यांनी स्वतःला स्वतंत्र भारताच्या पुनरुत्थानाला वाहून घेतले. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या अप्पा पेंडसे यांनी प्रभावी संघटन व प्रेरणादायी विचार मांडून बुद्धिवान स्वयंसेवी कार्यकर्त्यांची फौज जमवली आणि पुणे शहरात ज्ञान प्रबोधिनी नावाच्या शिक्षणसंस्थेची इ.स. १९६२ मध्ये स्थापना केली.

१९८३: शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक विश्वनाथ तथा अप्पासाहेब पेंडसे यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १९१६)

ज्येष्ठय संगीतकार मोहंमद जहूर खय्याम हाश्मी… ज्यांना सारे जग संगीतकार खय्याम या नावाने ओळख असे.
१९४७ मध्ये आपल्या करिअरला प्रारंभ केल्यानंतरच्या पहील्या पाच वर्षांच्या काळात त्यांनी ‘शर्माजी’ या टोपणनावाने चार चित्रपटांना संगीतही दिले. अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या खय्याम यांनी पुढे संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान चांगले बसवले. त्यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्नासच्या वर हिंदी चित्रपटांना संगीत दिले.
त्यांनी कविता क्षेत्रात समकालीन आणि दिग्दज मंडळींसोबत काम केले होते. त्यांच्या कामावर मिर्झा गालिब, दाग, वालीसाहेब, अली सरदार जाफरी, मजरूह सुलतानपुरी, साहिर सुधियानवी यांचा विलक्षणीय प्रभाव जाणवत असे.

एकाहून एक श्रेष्ठ अश्या गीतकारांबरोबर खय्याम यांनी संगीतकार म्हणून काम केलेले आहे. त्यामध्ये मजरुह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, जां निसार अख्तर, शहरयार, गुलजार, नक्श लायलपुरी, हसन कमाल आदींचा समावेश आहे. हे गीतकार व खय्याम यांनी एकत्रितरीत्या केलेल्या कामाला प्रचंड यशही लाभले व लोकप्रियताही मिळाली. खय्याम हे गेली ७० हून अधीक वर्षे संगीतकार म्हणून चित्रपटसृष्टीत कार्यरत होते.
खय्यार यांनी ७० आणि ८०च्या दशकातील अतिशय श्रवणीय संगीत दिले. संगीतकार खय्याम यांनी आपल्या अनेक गाण्यांनी कारकिर्दीत अक्षरश: सुवर्णकाळ निर्माण केला आणि हिंदी चित्रपट सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. चार दशकाहून आपल्या आपल्या नाविन्यपूर्ण संगीताने रसिकांना मोहून खय्याम टाकले होते. ’कभी कभी’,‘बाजार’,‘त्रिशूल’,‘ नुरी’,‘आखरी खत’अशा अनेक चित्रपटाना त्यांनी संगीत दिले होते.

संगीत क्षेत्रातील योगदानासाठी २००७ साली खय्याम यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. उत्तरप्रदेश सरकारने संगीतकार नौशाद अली स्मृति प्रथम पुरस्कार व भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार देऊन खय्याम यांचा गौरव केला होता. खय्याम यांना उमराव जान व कभी कभी या चित्रपटासाठी तीन फिल्मफेयर पुरस्कार मिळाली होती.

खय्याम यांच्या पत्नी जगजीत कौर या पण गायिका होत्या. जगजीत कौर यांनी नवोदित गायक, संगीतकार यांच्या मदतीसाठी ‘खय्याम प्रदीप जगजीत चॅरिटेबल ट्रस्ट’ नावाच्या एका ट्रस्टची स्थापना केली असून या ट्रस्टच्या कार्यासाठी खय्याम यांनी गेल्या वर्षी आपल्या वाढदिवसाला १२ कोटी रुपये देणगी दिली. या ट्रस्टच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातील गरजू कलाकार आणि तांत्रिक साहाय्य करणार्यांना आर्थिक मदत केली जाते. खय्याम यांच्या या दानशूरपणाचं कौतुक करू तेवढे कमी आहे.

खय्याम तर पुलवामा झाल्यावर त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करणार नसल्याचं जाहीर केले होते.

२०१९ : पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित ज्येष्ठय संगीतकार मोहंमद जहूर खय्याम हाश्मी… ज्यांना सारे जग संगीतकार खय्याम यांचे निधन ( जन्म. १८ फेब्रुवारी १९२७ )

  • घटना :
    १८५६: गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट.
    १९०९: इंडियानापॉलिस मोटर स्पीडवे येथे मोटारींची पहिली शर्यत.
    १९१९: अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
    १९४५: होची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.
    १९९१: सोविएत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुटीवर असताना नजरकैदेत घातले गेले.
    १९९९: बेल ग्रेड, युगोस्लाव्हियात हजारो सर्बियन लोकांचे राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन.

• मृत्यू :

• १९४७: अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मास्टर विनायक यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १९०६ )
• १९७६: ऊर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १९१४)
• १९९०: पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक रा. के. लेले यांचे निधन.
• १९९३: रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९२९)
• १९९३: निर्भिड पत्रकार य. द. लोकुरकर यांचे निधन.
• २०००: भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक बिनेंश्वर ब्रह्मा यांची बोडो अतिरेक्यांकडून हत्या. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४८)
• २०१५: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सनत मेहता यांचे निधन.

  • जन्म :
    १८८६: स्वातंत्र्यसैनिक मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी, १९३५)
    १८८७: भारतीय वकील आणि राजकारणी एस. सत्यमूर्ति यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च, १९४३)
    १९०३: लेखक चरित्रकार गंगाधरदेवराव खानोलकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर १९९२)
    १९०७: केंद्रीय मंत्री सरदारस्वर्ण सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९४)
    १९०७: भारतीय इतिहासकार, लेखक, आणि विद्वान हजारी प्रसाद द्विवेदी यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९७९)
    १९२२: मराठी गायक बबनराव नावडीकर (मूळ नाव: श्रीधर यशवंत कुलकर्णी) यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च, २००६)
    १९६७: भारतीय आध्यात्मिक नेते खांड्रो रिनपोछे यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »