आज नागपंचमी

आज मंगळवार, जुलै २९, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक ७, शके १९४७
सूर्योदय : ०६:१४ सूर्यास्त : १९:१५
चंद्रोदय : १०:०७ चंद्रास्त : २२:२२
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : श्रावण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पञ्चमी – ००:४६, जुलै ३० पर्यंत
नक्षत्र : उत्तराफाल्गुनी – १९:२७ पर्यंत
योग : शिव – ०३:०५, जुलै ३० पर्यंत
करण : बव – १२:०० पर्यंत
द्वितीय करण : बालव – ००:४६, जुलै ३० पर्यंत
सूर्य राशि : कर्क
चंद्र राशि : कन्या
राहुकाल : १६:०० ते १७:३८
गुलिक काल : १२:४५ ते १४:२३
यमगण्ड : ०९:३० ते ११:०७
अभिजित मुहूर्त : १२:१९ ते १३:११
दुर्मुहूर्त : ०८:५१ ते ०९:४३
दुर्मुहूर्त : २३:३९ ते ००:२३, जुलै ३०
अमृत काल : ११:४२ ते १३:२५
वर्ज्य : ०४:४२, जुलै ३० ते ०६:२८, जुलै ३०
अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं
शन्खपालं ध्रूतराष्ट्रं च तक्षकं कालियं तथा
एतानि नव नामानि नागानाम च महात्मनं
सायमकाले पठेन्नीत्यं प्रातक्काले विशेषतः
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत
ll इति श्री नवनागस्त्रोत्रं सम्पूर्णं ll
फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे, पंचमिचा सण आला डोळे माझे ओले – कवी – ग.दि. माडगूळकर
आज नागपंचमी आहे.
चरक : चरक (जन्म इ.स.पू. ३००) हे एक आयुर्वेदावरील प्रमुख योगदानकर्ते होते. भारतात पूर्वी त्यांचे नाव गाजत होते. त्यांचा उल्लेख कधी कधी शरीरशास्त्राचे पितामह म्हणून होतो.
या शब्दाचे अनेक अर्थ आहेत आणि या नावाच्या अनेक व्यक्तीही आहेत. त्यांतील एक अत्यंत प्रसिद्ध व्यक्ती आयुर्वेदातील चरकसंहिता या नावाने प्रसिद्ध असलेल्या महान ग्रंथाचे कर्ते. त्यांच्या या ग्रंथात उत्तर भारताच्या पश्चिमोत्तर प्रदेशाची वर्णने आढळतात. यावरून ते त्या भागातील रहिवासी असावेत.
ज्या कनिष्क राजाच्या पदरी ते राजवैद्य होते त्याची राजधानी याच भागात होती. इ.स.पू. पहिल्या शतकाच्या सुमारास हा राजा होऊन गेला असावा, असे एक मत आहे. राजा कनिष्क व आर्य नागार्जुन समकालीन व्यक्ती असाव्यात. कनिष्काचा काळ अनिश्चित असल्यामुळे चरकांचा काळही अनिश्चित आहे. याविषयी तीन भिन्न काळ पुढे केले जातात ते असे : इ.स.पू. ५८, इ.स. ७८ किंवा इ.स. १२३. यांपैकी शेवटच्यास जास्त पाठिंबा मिळतो. त्रिपिटक या बौद्ध ग्रंथाच्या चिनी भाषांतरात (इ.स. ४७७) कनिष्काच्या राजवैद्यांचे नाव चरक असल्याचा उल्लेख आहे. याच चरकांनी मूळच्या अग्निवेश- तंत्र या ग्रंथाचे पुनःसंपादन केले असावे, असे मानले जाते.
चरक हे नाव फार प्राचीन वेदकालीन आहे. ‘चरक’ शब्दाचा भ्रमणशील असा व्युत्पत्त्यर्थ आहे. कृष्ण यजुर्वेदाच्या एका शाखेच्या प्रवर्तक ऋषीचे नाव चरक आहे. ललित विस्तार ग्रंथात हिंडणाऱ्या संन्याशांना चरक संबोधिले आहे. चक्र धारण करणारे तसेच योगाभ्यास करणारे यांनाही चरक संज्ञा दिली जाते. बृहदारण्यक उपनिषदात ‘मद्रेषु चरकाः पर्यव्रजाम’ (म्हणजे ‘आम्ही फिरत फिरत मद्र देशाला गेलो’ ) असा उल्लेख आहे. वैशंपायनाच्या शिष्यांना चरक म्हणत.‘चरक’ म्हणजे ‘प्रायश्चित्त करणारे’ असाही एक अर्थ आहे.
वैशंपायनाकरिता प्रायश्चित्त करणारे ते चरक.
वैशंपायन शिष्य याज्ञवल्क्यांनी मात्र वैशंपायनाकरिता प्रायश्चित केले नव्हते. जे विद्यार्थी एका गुरूजवळ शिक्षण संपवून दुसऱ्याकडे ज्ञान संपादनाकरिता हिंडत जात त्यांनाही चरक म्हणत.
अशा प्रकारे चरक शब्दाचा उपयोग अनेक अर्थांनी केलेला आढळतो. ‘चरक’ मानवाचे हित करण्याकरिता हिंडत आणि जनतेची मानसिक व शारीरिक दुःखे दूर करीत. म्हणून पुढे चरक या शब्दास वैद्य हा अर्थ प्राप्त झाला असावा.
आज आचार्य चरक जयंती आहे
आज आतंरराष्ट्रीय ‘व्याघ्र’ दिन आहे.
आज विषमता विरोध दिन आहे.
जे. आर. डी. टाटा यांनी १९२९ साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. इ.स. १९३२ साली त्यांनी टाटा एरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे इ.स. १९४६ साली तिचे नाव बदलून एर इंडिया ठेवले गेले.
वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी म्हणजे इ.स. १९३८ साली ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे चेअरमन बनले. ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या. टाटांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेले आणि तंत्रज्ञान अश्या नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला. टाटांच्या पुढाकाराने इ.स. १९५६ साली कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये ‘दिवसातून आठ तास काम’, ‘मोफत आरोग्यसेवा’, ‘भविष्य निर्वाह निधी’ आणि ‘अपघात विमा योजना’ अश्या पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या.
टाटांच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या.
भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी इ.स. १९३६ साली टाटा समाजविज्ञान संस्था आणि इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्था या संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय इ.स. १९४१ साली मुंबईत सुरू केले.
टाटांना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाली. भारतीय केंद्रशासनातर्फे त्यांना इ.स. १९५७ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले, तर इ.स. १९९२ साली त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषवण्यात आले.
१९० ४ : ज्येष्ठ भारतीय उद्योजक, भारतातील पहिले वैमानिक तसेच भारतीय हवाई वाहतुकीचे जनक जे. आर. डी. टाटा उर्फ जहांगीर रतनजी दादाभॊय यांचा जन्म ( मृत्यू : २९ नोव्हेंबर, १९९३ )
- व्यंगचित्रकार शि.द. फडणीस – जे.जे.मधील शिक्षण पूर्ण झाल्यावर आणि व्यंगचित्रकलेची अतिशय आवड असल्याने शि.द. फडणीस हे अनंत अंतरकर यांच्या मदतीने पुण्याला गेले. तेंव्हापासून त्यांची चित्रे ’हंस’, ’मोहिनी’, ’नवल’, या मासिकांतून आणि अनेक पुस्तके व नियतकालिकांतून प्रसिद्ध होत राहिली. पुढे १९५२ सालापासून सलग साठ वर्षं अंतरकरांच्या ‘मोहिनी’च्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ रेखाटण्याचा विक्रमही शिदेंनी केला.
त्यांची अनेक चित्रे इंटरनॅशन सलून ऑफ कार्टून्स, माँत्रियाल, कॅनडा येथेही प्रदर्शित करण्यात आली आहेत. त्यांचे हसरी गॅलरी , ‘चित्रहास’, ‘चिमुकली गॅलरी’ ही चित्रांची प्रदर्शनेही ४० वर्षांत जवळजवळ २० वेगवेगळ्या शहरात मांडण्यात आली आहेत..
आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीने फडणीस यांनी पाच दशकांहून अधिक वर्षे वाचकांना हसवले आहे. व्यंग्यचित्रे ही नेहमी वेडीवाकडी असतात, त्यांत नेहमी बोचरी टीका असते, असे समज फडणिसांच्या चित्रांनी खोटे ठरवले.
विसंगती टिपणारे अनेक प्रसंग त्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांतून रेखाटले, आणि विसंगतीतून किती निर्विष, सुखावणारा विनोद निर्माण करता येतो, याचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांच्या शब्दविरहित चित्रांनी अनेक नियतकालिकांची, पुस्तकांची मुखपृष्ठे सजली. पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी यांच्यासारख्या दिग्गज लेखकांच्या पुस्तकांची लज्जतही त्यांच्या चित्रांनी वाढवली.
चित्रकारांची चित्रे त्यांच्या परवानगीशिवाय वापरली जाऊ नयेत यासाठी, शि.द. फडणीस यांनी कायद्याच्या मदतीने प्रताधिकाराचे, म्हणजे कॉपीराइटचे हक्क चित्रकारांना मिळवून दिले.
१९२५ : विसंगती टिपणारे अनेक प्रसंग त्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांतून रेखाटणारे ज्येष्ठ व्यंग चित्रकार शी. द. फडणीस ( यांचा जन्म) त्यांना जन्मदिनाच्या” हार्दिक शुभेच्छा ”
- घटना :
१८५२ : पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कॅंडी यांच्या हस्ते स्त्री शिक्षणाचे उद्गाते म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांचा सन्मान करण्यात आला
१८७६ : फादर आयगेन, डॉ . महेंद्र सरकार यांनी इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स ची स्थापना केली.
१९२० : जगातील पहिली टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रन्सिस्को या शहरा दरम्यान सुरु झाली.
१९४६ : टाटा एअर लाईन्स चे एअर इंडिया असे नामकरण झाले
१९५७ : इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी ची एजन्सी ची स्थापना झाले.
१९८७ : भारत श्रीलंका ह्या देशांमध्ये शांतता करारावर सह्या करण्यात आल्या
२०१९ : तत्काळ तिहेरी तलाक’ किंवा ‘तलाक-उल-बिद्दत’ची इस्लामिक प्रथा नवऱ्याला तीन वेळा तलाक म्हणून लग्न संपवण्याची सवलत देते.
हा तलाक कोणत्याही प्रकारे कळवला जाऊ शकतो; तोंडी, टेक्स्ट मेसेजवर किंवा अगदी ई-मेल करूनही.
या प्रथेवर बंदी घालण्यासाठी अनेक महिलांनी सुप्रीम कोर्टाला अर्ज, विनंत्या पाठवल्यानंतर, ऑगस्ट महिन्यात कोर्टाने ही प्रथा घटनाबाह्य ठरवली.
प्रदीर्घ चर्चेनंतर लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही ऐतिहासिक तीन तलाक विधेयक अखेर मंजूर करण्यात आलं आहे. ९९ विरुद्ध ८४ मताने हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.
• मृत्यू :
•१८९१ : पं. ईश्वरचन्द्र विद्या सागर यांचे निधन ( जन्म : २६ सप्टेंबर, १८२० )
•१९८७ : लेखक, कवी, नाटककार बिभूतिभूषण मुखोपाध्याय यांचे निधन ( जन्म : २४ ऑक्टोबर, १८९४ )
•१९९६ : भारतरत्न पुरस्कार सन्मानित (मरणोत्तर)स्वातंत्र्य सेनानी, अरुणा असिफ अली यांचे निधन ( जन्म : १६ जुलै, १९०९ )
•२००२ : गायक, संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे निधन ( जन्म : २५ जुलै, १९१९ )
२००३ : दारूच्या थेंबालाही स्पर्श न करता अनेक चित्रपटात दारुड्याची भूमिका जिंवंत करणारे, हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांचे निधन ( जन्म : ११ नोव्हेंबर, १९२६ )
•२००६ : मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ . निर्मल कुमार फडकुले यांचे निधन ( जन्म : १६ नोव्हेंबर, १९२८ )
•२००९ : जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्री माता यांचे निधन ( जन्म : २७ मे, १९१९ )
- जन्म :
• १९२२ : लेखक , शिवशाहीर ब. मो. उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म . ( मृत्यू : १५ नोव्हेंबर, २०२१ )
१९५३ : भजन गायक अनुप जलोटा यांचा जन्म