कर्जबुडव्या कारखान्यांची नावे द्या; कारवाई करण्याचा इशारा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कराड ः राज्यातील काही सहकारी साखर कारखाने कर्जे घेतात. त्या कर्जाची रक्कमही मोठी असते. मात्र, त्यांच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे कारखाने डबघाईला येऊन कर्ज बुडवतात, यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अशा कारखान्यांवर आम्ही कारवाई करतच आहोत. आणखी काही कर्जबुडव्या कारखान्यांची नावे असतील तर ती द्यावीत, त्यांच्यावर नक्कीच कारवाई करणार असल्याचा इशारा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिला. येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी ते संवाद साधत होते. यावेळी आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील (उंडाळकर), राजेश पाटील (वाठारकर), प्रा. शरद काटकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सहकारमंत्री पाटील म्हणाले की, राज्यातील कर्जबुडव्या सहकारी साखर कारखान्यांवर सरकारने कारवाईची गती वाढवली असून, मोठ्या प्रमाणातील अनुत्पादक कर्जे घेतलेल्या आणि एफआरपी न दिलेल्या अनेक कारखान्यांवर आरआरसी (जमाक्रिया प्रक्रिया) काढण्यात आली आहे.  दरम्यान, कर्जमाफी संदर्भात विधानसभेत कोणीही भाष्य करू नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे त्यावर टिप्पणी करणे उचित नाही. मात्र कर्जमाफीसाठी ३० जूनची अंतिम मुदत देण्यात आली असून, सरकार त्या कालावधीत निर्णय घेईल, असे सहकारमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »