नानासाहेब धर्माधिकारी

आज मंगळवार, जुलै ८, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक १७, शके १९४७
सूर्योदय : ०६:०७ सूर्यास्त : १९:२०
चंद्रोदय : १७:२५ चंद्रास्त : ०४:२३, जुलै ०९
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : आषाढ़
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : त्रयोदशी – ००:३८, जुलै ०९ पर्यंत
नक्षत्र : ज्येष्ठा – ०३:१५, जुलै ०९ पर्यंत
योग : शुक्ल – २२:१७ पर्यंत
करण : कौलव – ११:५७ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – ००:३८, जुलै ०९ पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : वृश्चिक – ०३:१५, जुलै ०९ पर्यंत
राहुकाल : १६:०२ ते १७:४१
गुलिक काल : १२:४४ ते १४:२३
यमगण्ड : ०९:२५ ते ११:०४
अभिजित मुहूर्त : १२:१७ ते १३:१०
दुर्मुहूर्त : ०८:४६ ते ०९:३८
दुर्मुहूर्त : २३:३९ ते ००:२२, जुलै ०९
अमृत काल : १७:४२ ते १९:२६
वर्ज्य : ०७:१६ ते ०९:०१
श्रीरामदास स्वामी शिष्य – कल्याण स्वामी हे ‘योगभ्रष्ट’ तपस्वी होते असा उल्लेख ‘दासविश्रमधाम’ सारख्या जुन्या शास्त्रात आढळतो.
प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वती: सम:। शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजयते ॥४१॥
अर्थ: जो योगापासून पतित झाला आहे, त्याला उच्च लोक (स्वर्ग इ.) प्राप्त होतात जिथे केवळ पुण्यकर्मे करणारे लोकच पात्र आहेत आणि तिथे असंख्य वर्षे राहिल्यानंतर, तो धार्मिक आणि श्रीमंत लोकांच्या घरात जन्म घेतो. (४१) (श्रीमत भगवद्गीता अध्याय ६ श्लोक ४१)
ते योगी म्हणूनही प्रसिद्ध होते जे दररोज असंख्य योगाभ्यास करायचे. रामदासी पंथ आणि भक्त श्री कल्याण स्वामींना ‘योगीराज’ म्हणत. त्यांचे रेखाटन ‘गर्भासनाची योगमुद्रा’ मध्ये आहे. ते दररोज १२०० सूर्यनमस्कार करत असत. दररोज श्री कल्याण स्वामी उर्मोदी नदीतून मोठ्या तांब्याच्या भांड्यांमध्ये श्री समर्थ रामदास स्वामींना स्नान घालण्यासाठी पाणी आणत असत. हे तांब्याचे भांडे आता सज्जनगड येथे आहेत. त्यांचे शरीर खूप मजबूत असल्याचे सांगितले जाते. ते कुंडल, भस्म आणि मुद्रिका असे कपडे घालत असत.
श्री कल्याण स्वामींची आपल्या शिष्यांना वेगळे घेऊन जाण्याची आणि त्यांना श्री समर्थ रामदास स्वामींच्या जीवनाची कहाणी सांगण्याची प्रथा होती, ही कहाणी ते इतर बहुतेक शिष्यांपेक्षा चांगल्या प्रकारे उलगडू शकत होते. म्हणूनच, चार प्रकाशित खंडांच्या या मोठ्या ग्रंथात एक असा आभास आहे जो इतर काही वृत्तांतांमध्ये कमी आहे, कारण त्यातून आपल्याला समर्थ रामदास स्वामींची त्यांच्या प्रमुख शिष्याने लक्षात ठेवलेली कथा मिळते.
कल्याण स्वामींचे १७१४ मध्ये आषाढ शुद्ध त्रयोदशी रोजी परांडा जिल्हा धाराशिव (उस्मानाबाद) येथे निधन झाले. त्याला योग-अंत (स्वतःच्या योगिक शक्तीने/स्वतःच्या इच्छेने समाधी) असे म्हणतात. त्यांचे अंत्यसंस्कार परांडा जवळील डोमगाव येथे झाले . त्यांच्या मृत्युनंतर समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी यांच्या अस्थी केशव स्वामींनी मिसळल्या.
आज कल्याण स्वामी पुण्यतिथी आहे.
|| दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती ||
| गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती |
जलदांपरी येउनिया जाती
जग ज्यांची न करी गणती |
| यज्ञी ज्यांनी देउनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर |
|परी जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाही पणती |
| जिथे विपत्ती जाळी, उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती |
| मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवऱ्या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांती डोळे भरती..
__ कविवर्य बा. भ. बोरकर
• १९८४: पद्मश्री पुरस्कार सन्मानित गोमंतकीय कवी बाकीबाब उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १९१० )
डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी – धर्माधिकाऱ्यांच्या घराण्यात चारशे वर्षांपासून समाजप्रबोधनाच्या कार्याची परंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव “शांडिल्य” असे होते.
त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शांडिल्य हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने ‘धर्माधिकारी’ अशी पदवी दिली. तेव्हापासून आजतागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनांव लावत आले आणि त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आले.
डॉ.नानासाहेबांनी आपल्या पित्याकडून प्रेरणा घेऊन, प्रसिद्धीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत घेतले आणि ते अव्याहतपणे चालवले. त्यांचे चिरंजीव डॉ. दत्तात्रेय तथा अप्पासाहेब व नातू डॉ. सचिनदादा यांनीही नानांच्याच कार्याला वाहून घेतले आहे.
त्यांचे पुत्र आदरणीय पद्मश्री डॉ.श्री.अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी या समाजप्रबोधनाच्या कार्याची धुरा वडिलांच्याच निष्ठेने आणि तळमळीने स्वतः करीत आहेत.
या कामासाठी त्यांनी १९४३ साली रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे श्रीसमर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती स्थापन केली. या माध्यमातून सोमवार दिनांक ८ ऑक्टोबर १९४३ ( विजयादशमी ) रोजी मुंबई येथील गोरेगांव येथे प्रथम श्रीबैठक सुरू करण्यात आली. या संस्थेद्वारे त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार केला. त्याच्या शाखा आज भारताबाहेरील अनेक देशांपर्यंत पसरल्या आहेत.
त्या संस्थेमध्ये आजघडीला मराठी बरोबरच हिंदी, उडिया, तामिळ, बंगाली, कन्नड व इंग्रजीतून निरूपण केले जाते.
सुरुवातीला महिला व पुरुषांचीच बैठक होत असे. मात्र, बालवयापासूनच संस्कार व्हावेत म्हणून बालोपासना सुरू करण्यात आली.
अध्यात्माचे धडे देतानाच नानांनी शेकडो खेडी, आदिवासी पाड्यांची भ्रमंती करून लोकांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले होते. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अज्ञान, स्त्रियांवरील अत्याचार, जातिभेद अशा कुप्रवृत्तींवर जोरदार प्रहार करत नानांनी सद्गुणांची पेरणी केली. त्यामुळे लाखो लोक व्यसनमुक्त होऊन परमार्थाकडे वळले. धर्माचरणाविषयी बोलतांना, त्या अनुषंगाने समाजाला सन्मार्गाला लावण्याची शिकवण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी देत गेले. आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले.
धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या असा सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख त्यांनी स्वतःची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली व आजही हे कार्य निष्काम त्यांचे सुपुत्र आदरणीय पद्मश्री डॉ.श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी व नातू आदरणीय रायगड भूषण डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यशस्वीरीत्या करत आहेत .
इ.स २००८ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
• २००८: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन. (जन्म : मार्च १, १९२२)
भारताचे आठवे पंतप्रधान चंद्रशेखर : शालेय जीवनापासूनच चंद्रशेखर राजकारणाकडे आकर्षित झाले होते.
एक आदर्शवादी, जहाल मतवादी, क्रांतिकारी उत्साह असणारी व्यक्ती म्हणून ते सर्वपरिचित होते. १९५०-५१ दरम्यान अलाहाबाद विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण संपादन केल्यानंतर त्यांनी समाजवादी चळवळीत भाग घेतला. आचार्य नरेंद्र देव यांच्या निकट सहवासाचे सौभाग्य त्यांना लाभले. बलिया जिल्हा प्रजा समाजवादी पक्षाचे सचिव म्हणून ते निवडून आले होते. त्यानंतर एका वर्षात ते उत्तरप्रदेश राज्य प्रजा समाजवादी पक्षाचे सहसचिव म्हणून निवडून आले. १९५५-५६ साली त्यांनी उत्तरप्रदेश राज्य प्रजा समाजवादी पक्षाचे सरचिटणीस म्हणून कार्यभार स्विकारला.
१९६२ मध्ये उत्तर प्रदेशातून ते राज्यसभेवर निवडून आले. जानेवारी १९६५ मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यानंतर 1967 साली ते काँग्रेस संसदीय पक्षाचे सरचिटणीस म्हणून निवडले गेले. उपेक्षित व मागास समाजाच्या वेगवान विकासामध्ये व त्यांच्यासाठी धोरण आखण्यामध्ये श्री. चंद्रशेखर यांनी संसद सदस्य या नात्याने उल्लेखनीय सहभाग नोंदवला. याचाच एक भाग म्हणून, त्यांनी जेव्हा मक्तेदारी असलेल्या संस्थांमधील असमान विस्तारावर हल्ला चढवला तेव्हा सत्ताधाऱ्यांशी त्यांचा संघर्ष झाला.
ते एका ‘युवा तुर्क’ नेत्याच्या रूपाने समाजासमोर आले. त्यांनी दृढविश्वास, ध्यैर्य व सचोटीने स्वार्थाविरुद्ध लढा दिला. १९६९ साली त्यांनी ‘यंग इंडिअन’ नावाचे साप्ताहिक सुरु केले व त्याचे संपादनही केले. त्या काळातील सर्वात जास्त उल्लेखनीय संपादकीयांपैकी एक म्हणून हे साप्ताहिक नावाजलेले होते. आणीबाणीच्या काळात (जून १९७५ ते मार्च १९७७) ‘यंग इंडिअन’ बंद पाडले होते. फ़ेब्रुवारी 1989 मध्ये हे साप्ताहिक नव्याने सुरु करण्यात आले. या साप्ताहिकाच्या संपादकीय सल्लागार मंडळाचे चंद्रशेखर अध्यक्ष होते.
श्री. चंद्रशेखर नेहमी व्यक्तिगत राजकारणाविरोधात उभे राहिले. वैचारिक व सामाजिक बदलाच्या राजकारणाला त्यांनी पाठींबा दिला.
हे विचारच त्यांना १९७३-७५ च्या अशांत व अस्थिर दिवसांदरम्यान श्री. जयप्रकाश नारायण आणि त्यांच्या आदर्शवादी जीवनाच्या अधिक जवळ घेऊन गेले. यामुळे ते लवकरच कॉंग्रेस पक्षांतर्गत असंतोषाचे कारण बनले.
२५ जून १९७५ ला आणीबाणी जाहीर झाल्यावर अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली त्यांना अटक करण्यात आली, तेव्हा ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या उच्च मंडळांपैकी, केंद्रीय निवडणूक समिती व कार्यकारी समितीचे सदस्य होते.
श्री. चंद्रशेखर सत्ताधारी पक्षाच्या त्या सदस्यांपैकी होते, ज्यांना आणीबाणीच्या काळात अटक करून कारावासात पाठविले होते.
सत्तेच्या राजकारणाला त्यांनी कायम विरोध केला. लोकशाही मुल्ये तसेच सामाजिक परिवर्तानाप्रती कटिबद्धतेच्या राजकारणाला ते महत्त्व देत असत. आणीबाणीच्या काळात तुरुंगवासादरम्यान त्यांनी हिंदी भाषेत एक रोजनिशी लिहिली होती. जी नंतरच्या काळात ‘मेरी जेल डायरी’ या नावाने प्रकाशित झाली होती. ‘सामाजिक परिवर्तनाची गतिशीलता’ हे त्यांच्या लेखांचे एक प्रसिद्ध संकलन आहे.
श्री. चंद्रशेखर यांनी ६ जानेवारी १९८३ ते २५ जून १९८३ पर्यंत दक्षिणेकडील कन्याकुमारीपासून नवी दिल्ली स्थित राजघाट (महात्मा गांधींची समाधी) दरम्यान जवळपास 4260 किलोमीटर अंतर पदयात्रा केली होती. देशातील जनतेला भेटणे व त्यांच्या समस्या जाणून घेणे, हे त्यांच्या या पदयात्रेचे एकमेव उद्दिष्ट होते.
देशातील मागास भागातील लोकांना शिक्षण देण्यासाठी तसेच तळागाळापर्यंत काम करण्यासाठी त्यांनी सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश आणि हरियाणा सहित देशातील विविध भागात जवळपास पंधरा भारत यात्रा केंद्रांची स्थापना केली.
१९८४ ते १९८९ चा छोटा कालावधी सोडला तर १९६२ पासून ते संसद सदस्य होते. १९८९ मध्ये आपल्या बलिया मतदासंघातून आणि बिहारमधील महाराजगंज मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि दोन्ही जागी ते जिंकूनही आले. नंतर त्यांनी महाराजगंजची जागा सोडून दिली.
१० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१ दरम्यान देशाचे आठवे पंतप्रधान म्हणून काम पाहिले. जनता दलाच्या तुटलेल्या अल्पसंख्यांक सरकारचे त्यांनी नेतृत्व केले, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकडून मिळालेल्या बाहेरील पाठिंब्याने. सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी ही व्यवस्था होती.
ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत ज्यांनी कधीही कोणतेही सरकारी कार्यालय सांभाळलेले नाही. त्यांचे सरकार मोठ्या प्रमाणात निव्वळ एक “कठपुतळी” म्हणून पाहिले जात होते आणि लोकसभेतील थोड्याच खासदारांसह सरकार स्थापन केले गेले होते. मूडीज, अमेरिकी आर्थिक सेवा कंपनी, यांनी भारताची ढासळलेली परिस्थिती भाकित केली होती तेव्हा त्यांचे सरकार अर्थसंकल्प पास करू शकले नाही. या स्थिती मुळे जागतिक बॅंकेने भारतास आर्थीक मदत बंद केली. कर्जाची परतफेड चुकूनये म्हणुन चंद्रशेखर यांनी सोने गहाण करण्यास परवानगी दिली. ही परवानगी निवडणुकीच्या काळातच गुप्तपणे केली गेली म्हणुन विशेष टीका झाली.
१९९१चे भारतीय आर्थिक संकट आणि राजीव गांधी यांच्या हत्येमुळे त्यांचे सरकार संकटात सापडले होते .
• २००७: भारताचे आठवे पंतप्रधान चंद्रशेखर यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९२७)
- घटना :
१४९७: वास्को द गामा भारताच्या पहिल्या सफरीवर निघाले.
१८५६: चार्ल्स बर्न यांना मशीनगन चे अमेरिकेतील पेटंट मिळाले.
१८८९: द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मोरिया या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.
१९३०: किंग जॉर्ज ५वे यांच्या हस्ते लंडनमध्ये इंडिया हाऊसचे उद्घाटन झाले.
१९५८: बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात दो आँखे बारह हाथ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.
१९९७: बीजिंग येथील आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.
२००६: मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
२०११: रुपयाचे नवीन चिन्ह असलेली नाणी चलनात आली.
• मृत्यू :
• १९९४: गोवा पुराभिलेखचे संचालक डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे यांचे निधन.
• २००१: प्रसिद्ध तबला वादक उस्ताद बाबासाहेब मिरजकर याचे निधन. ( जन्म : २१ जून , १९२५ )
• २००३: संत साहित्याचे अभ्यासक ह. श्री. शेणोलीकर यांचे निधन.
• २००६: पद्म भूषणपुरस्कार पुरस्कार सन्मानित तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक लेखक प्रा. राजा राव यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर, १९०८)
• २०१३: भारतीय लेखिका सुन्द्री उत्तमचंदानी यांचे निधन. (जन्म: २८ सप्टेंबर१९२४)
• २०२० : विनोदाची उत्तम जाण असलेले ४०० पेक्षा अधिक चित्रपटात काम केलेले बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर जगदीप यांचे ( सय्यद इश्ताक अहमद जाफरी ) यांचं निधन ( जन्म : २९ मार्च , १९३९ )
- जन्म :
१९१४: पश्चिम बंगालचे ६वे मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी२०१०)
१९१६: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार गो. नी. दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून , १९९८)
१९२२: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल, २००९)
१९४९: आंध्र प्रदेशचे १४वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा जन्म. ( मृत्यू : २ सप्टेंबर, २००९ )
१९७२: पद्म श्री पुरस्कार पुरस्कार सन्मानित भारताचे क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांचा जन्म.