साखर कारखान्यांसाठी ‘नारायण मेघाजी लोखंडे’ पुरस्कार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सुधारित निकषांसह अर्ज प्रक्रिया सुरू

मुंबई: महाराष्ट्र शासनाने औद्योगिक सुरक्षा, आरोग्य आणि कामगार कल्याण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी नारायण मेघाजी लोखंडे व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य पुरस्काराचे निकष सुधारित केले आहेत. या पुरस्कारासाठी इच्छुक कारखान्यांना २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करता येणार असल्याची माहिती कामगार विभागाने दिली आहे.

८ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानंतर औद्योगिक क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या असून, धोकादायक कारखान्यांच्या वर्गवारीत अधिक स्पष्टता आणली आहे. पुरस्कारासाठी स्वतंत्र निधीचे लेखाशीर्ष निश्चित केले आहे.

सहभागासाठी महत्त्वाचे निकष

१. नोंदणी: कारखाना नोंदणीकृत असावा आणि त्याच्याकडे कायमस्वरूपी परवाना असणे अनिवार्य आहे.
२. कालावधी: कारखान्याची उत्पादन प्रक्रिया किमान तीन वर्षांपासून सुरू असणे आवश्यक आहे.
३. प्रवेश शुल्क: कामगार संख्येनुसार अर्जासोबत प्रवेश शुल्क भरावे लागेल.
४. निवड प्रक्रिया: सादरीकरणाच्या आधारे १० पैकी गुण दिले जातील. राज्यस्तरीय समितीद्वारे सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पाच कारखान्यांची निवड केली जाईल.

कुठे अर्ज करायचा?

पात्र कारखाने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय (DISH), महाराष्ट्र यांच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन सुधारित नियमावली पाहू शकतात आणि विहित नमुन्यात अर्ज सादर करू शकतात.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »