पहिले मराठी साखर कारखानदार बोरावके यांची जयंती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज गुरुवार, ऑक्टोबर १७, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन २५ शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:३३ सूर्यास्त : १८:१४
चंद्रोदय : १८:०८ चंद्रास्त : चंद्रास्त नहीं
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : शरद
चंद्र माह : आश्विन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पौर्णिमा – १६:५५ पर्यंत
नक्षत्र : रेवती – १६:२० पर्यंत
योग : हर्षण – ०१:४२, ऑक्टोबर १८ पर्यंत
करण : विष्टि – ०६:४८ पर्यंत
द्वितीय करण : बव – १६:५५ पर्यंत
क्षय करण : बालव – ०३:०४, ऑक्टोबर १८ पर्यंत
सूर्य राशि : कन्या – ०७:५२ पर्यंत
चंद्र राशि : मीन – १६:२० पर्यंत
राहुकाल : १३:५१ ते १५:१९
गुलिक काल : ०९:२८ ते १०:५६
यमगण्ड : ०६:३३ ते ०८:०१
अभिजितमुहूर्त : १२:०० ते १२:४७
दुर्मुहूर्त : १०:२७ ते ११:१४
दुर्मुहूर्त : १५:०७ ते १५:५४
अमृत काल : १४:१४ ते १५:३८

महर्षी वाल्मिकी रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले ऋषी होते. ते आदिकवि म्हणून प्रसिद्ध आहेत. रामायण एक महाकाव्य आहे जे श्रीराम यांच्या जीवनातुन आपणास जीवनातील सत्य,कर्तव्य,साह्स यांचा परिचय देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते.त्यांनी संस्कृत भाषेत रामायणाची रचना केली.त्यांनी लिहिलेले रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य मानले जाते.म्हणून वाल्मिकी यांना आद्यकवी असे सुद्धा संबोधले जाते.

मूलतः वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात २४,००० श्लोक आणि उत्तर खंड साहित एकूण ७ खंड आहेत.रामायणात भगवान श्रीरामांची गाथा सांगण्यात आली आहे.

आज महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती आहे.

आज आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन आहे.

नारायणराव सोपानराव बोरावके यांचा आज जन्मदिन

कृषितज्ज्ञ, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच वर्ष 1932 मध्ये सासवड माळीनगर साखर कारखान्याच्या स्थापनेत पुढाकार घेणारे रावबहादूर नारायणराव सोपानराव बोरावके यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 17 आक्‍टोबर 1892 रोजी सासवड येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सखुबाई होते तर पत्नीचे नाव लक्ष्मीबाई, त्या नारायणरावांच्या सतत फिरती व कामाच्या व्यापात त्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभ्या राहिल्या होत्या.

हिंदुस्थानावर जेव्हा ब्रिटिश राज्य करीत होते तेव्हा सन्माननीय व्यक्‍तींना सर, रावबहादूर, रावसाहेब अशा उपाध्या देत.या उपाध्या नावाआधी लावण्याची मुभा होती. 1933 मध्ये त्यांना “रावसाहेब’ तर 1946 मध्ये त्यांना “रावबहादूर’ हे किताब मिळाले. एक सामान्य शेतकरी असलेल्या नामदेवरावांना त्यांच्या असामान्य कर्तृत्वामुळे ही उपाधी मिळाली होती. रयत शिक्षण संस्थेचे ते काही काळ उपाध्यक्षही होते. पुण्यातील टिळकरोडवरील महाराष्ट्र मंडळाचे आश्रयदाते होते. बॅंक ऑफ कराडचेही ते संचालक होते. त्यांनी अनेक संस्थांना आर्थिक व नैतिक पाठबळ दिले होते.

पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यांत ग्रामीण भागांत अनेक संस्था व उद्योग यांचे जाळे त्यांनी उभे केले. बोरावके यांचे शिक्षण कमी असल्याची खंत त्यांना होती. त्यांनी शिक्षण प्रसारावर पण भर दिला होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात अनेक शाळा व महाविद्यालये स्थापन केली. काही काळ ते रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्षही होते. त्यांनी सासवड येथे लक्ष्मीबाई वसतिगृहाची स्थापना केली.

सासवड माळीनगर सहकारी साखर कारखान्याचे ते प्रवर्तक होते. गणपतराव गिरमे, शंकरराव कुडाळे, शंकरराव राऊत, गणपतराव रासकर यांच्या सहकार्याने 1932 मध्ये त्यांनी साखर कारखाना उभा करण्याचा संकल्प केला. त्यावेळी सहकार कायदा अस्तित्वात नसल्याने सर्व प्रवर्तकांनी भागीदारी फर्म काढून 1934/35 चा पहिला गळीत हंगाम पार पाडला. यावेळी त्यांचे सहकारी संचालकांनी उत्तर प्रदेश, तेलंगणामधील साखर उद्योगाची पाहणी केली. त्यांच्या नावाने सध्या अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये व इतर विषयातील विद्यालये सुरू आहेत. त्यांनी कोपरगाव जवळील कोळपेवाडी येथे सहकारी साखर कारखाना उभारणीत मोलाचे योगदान दिले होते.

शेतीच्या आधुनिकतेवर त्यांनी भर दिला. संशोधित फळांच्या उत्पादनास त्यांनी प्रोत्साहन दिले. पारंपरिक शेतीअवजारे वापरण्याऐवजी आधुनिक अवजारे वापरण्यावर भर दिला. शेती अवजारे बनविणाऱ्या किर्लोस्करवाडीच्या किर्लोस्कर कारखान्याचे ते संचालकही होते. शेतीला मोटे ऐवजी स्वयंचलित पंपाद्वारे पाणी देण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

1929 ते 1935 या कालावधीमध्ये ते अहमदनगर जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्यही होते. 1953 च्या दुष्काळ समितीवरही त्यांनी सदस्य म्हणून काम केले होते. महात्मा फुले संग्रहालय (आधीचे नाव लॉर्ड रे म्यूझियम) या पुणे शहरातील जुन्या संग्रहालयाचे विश्‍वस्त होते. राहता येथे जनावरांचा दवाखाना काढून तो ग्रामपंचायतीस सुपूर्त केला. या कर्तृत्ववान भूमीपुत्राचे 16 फेब्रुवारी 1968 रोजी निधन झाले.

*एक भारतीय तत्त्वज्ञ कन्नादासन – कवी, चित्रपट गीतकार, निर्माता, अभिनेता, पटकथा-लेखक, संपादक, परोपकारी आणि भारतातील एक महान आणि सर्वात महत्त्वाच्या गीतकार म्हणून ओळखले जाते. ५००० हून अधिक गीते, ६००० कविता आणि २३२ पुस्तकांसह, कवीरासू याला वारंवार म्हणतात, कन्नादासन हे सर्वश्रेष्ठ कविरासू (कवींचा राजा) द्वारे ओळखले जाते आणि ते सुब्रमण्य भारती नंतरचे महान आधुनिक तमिळ कवी देखील मानले जातात . कादंबरी, महाकाव्ये , नाटके, निबंध यांचा समावेश आहे, त्यांचे हिंदू धर्मावरील १० भागांचे धार्मिक पुस्तक, अर्थमुल्ला इंधु मथम ( अर्थपूर्ण हिंदू धर्म ) हे त्यांचे सर्वात लोकप्रिय आहे. त्याने जिंकले. १९८० मध्ये चेरामन कथली या त्यांच्या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार आणि १९६९ मध्ये कुझंथाइक्कागा या चित्रपटासाठी देण्यात आलेला सर्वोत्कृष्ट गीतांसाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त करणारा पहिला पुरस्कार होता . अनेक महान कवींप्रमाणे त्यालाही सायक्लोथिमियाचा त्रास झाला, जो द्विध्रुवीय विकार स्पेक्ट्रम अंतर्गत येतो.

कन्नादासनचा जन्म तामिळनाडूच्या कराईकुडीजवळील सिरुकूडलपट्टी येथील नट्टुकोट्टाई नगराथर कुटुंबात सतप्पन चेट्टियार आणि विसालाक्षी आची यांच्याकडे झाला आणि त्याला मुथिया हे नाव देण्यात आले. तो त्याच्या पालकांच्या दहा मुलांपैकी आठवा होता. चिगाप्पी आचीने त्याला लहान वयातच INR ७००० मध्ये दत्तक घेतले होते, ज्याने त्याला मोठे केले आणि त्याच्या शालेय शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यासाठी जबाबदार होते. त्यांनी 8वी पर्यंतचे शालेय शिक्षण सिरकुदलपट्टी आणि अमरावतीपुधुर येथे पूर्ण केले. एका तमिळ मासिकात संपादकीय पद स्वीकारण्यापूर्वी त्यांनी तिरुवोट्टियूर येथील एका खाजगी कंपनीत काम केले जेथे त्यांनी प्रथमच कन्नडसन हे टोपणनाव घेतले.

कादंबरी, महाकाव्ये , नाटके, निबंध यांचा समावेश आहे, त्यांचे हिंदू धर्मावरील १० भागांचे धार्मिक पुस्तक, अर्थमुल्ला इंधु मथम ( अर्थपूर्ण हिंदू धर्म ) हे त्यांचे सर्वात लोकप्रिय आहे. त्याने जिंकले. १९८० मध्ये चेरामन कथली या त्यांच्या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार आणि १९६९ मध्ये कुझंथाइक्कागा या चित्रपटासाठी देण्यात आलेला सर्वोत्कृष्ट गीतांसाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त करणारा पहिला पुरस्कार होता . अनेक महान कवींप्रमाणे त्यालाही सायक्लोथिमियाचा त्रास झाला, जो द्विध्रुवीय विकार स्पेक्ट्रम अंतर्गत येतो.

तमिळ संस्कृतीत कन्नादासन सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांचे गीतलेखन. कन्नडसनच्या आधी पापनासम सिवन , कंबदासन, विंधन, ए. मारुथकसी , आणि कु. मा. बालसुब्रमण्यम यांना तामिळ संगीत उद्योगात शोधण्यात आले, परंतु कन्नडसनच्या आगमनानंतर, दृश्य बदलले. तो त्वरीत इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मागणी असलेला गीतकार बनला आणि त्याच्या मृत्यूपर्यंत तो तसाच राहिला. कन्नडासन इतके लोकप्रिय होते की इतर समकालीन कवींनी लिहिलेली काही गाणी कन्नडासनने लिहिलेली मानली गेली. जरी, त्यांच्या मृत्यूनंतर चित्रपटातील गीते खूप पुढे गेली आहेत, तरीही बरेच लोक कन्नडसनला सर्वोत्कृष्ट गीतकार मानतात. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रणेते असलेल्या मरुधू पंडैयर्सची भूमिका करणाऱ्या शिवगंगाई सीमाई या ऐतिहासिक तमिळ चित्रपटाचे ते निर्माते होते . त्या चित्रपटातील “संतुपोट्टू” हे गाणे लोकप्रिय आहे.

• १९८१: भारतीय लेखक, कवी आणि गीतकार कन्नादासन यांचे निधन. (जन्म: २४ जून, १९२७)

संगीतभास्कर गायनाचार्य भास्करबुवा बखले- प्रत्येक कलाकाराचं कांहेतरी वैशिष्ठ असतं. स्वरांचा जीवंतपणा, रागाच्याच अंगाने त्याला सच्चेपणाने ऊठाव देणारी अप्रतिम गायकी, आणि तालाचे लालित्य हे तीनही गुण सारख्याच ऊत्कर्षाला पोहोचलेले भारतीय संगीतांतले अतिशय महत्वाचे गायक असं त्यांचं वर्णन केलं जातं ते “केवळ ह्या सम हा” अशाच विश्वासामुळे !

त्यांचा जन्म सुरतजवळील कठोर या गावी झाला. बडोद्यातील कीर्तनकार पिंगळेबुवा यांच्याकडे त्यांनी गायनकलेचा श्रीगणेशा केला. पुढे ख्यातनाम बीनकार बंदे अलीखॉं यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत बखलेबुवांचे नाटकातील गाणे ऐकून आनंदाने बुवांची स्वतः शिकवणी घेतली. फैजमहंमदखॉं, नथ्थनखॉं आग्रेवाले यांच्याकडे भास्करबुवांचे पुढचे शिक्षण झाले. या सगळ्या अथक मेहनतीनंतर भास्करबुवा बखले यांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या घराण्यांच्या गायकींवर प्रभुत्व मिळवले. नाट्यगीत, ठुमरी, भजन, टप्पा, पंजाबी लोकसंगीत, लावणी, गझल, ध्रुपद धमार, आणि ख्यालगायन या सगळ्यांवर भास्करबुवांची विलक्षण हुकमत होती. संगीतकलेवरील त्यांचे प्रभुत्व पाहून लोक त्यांना देवगंधर्व म्हणू लागले.
शास्त्रीय संगीतावर आधारित चिजांच्या चाली वापरून भास्करबुवांनी मराठी नाट्यगीते संगीतबद्ध केली.

किर्लोस्कर व गंधर्व नाटक कंपन्यांत त्यांनी संगीत विषयाचे प्रमुख गुरू म्हणून काम केले. बालगंधर्व, मास्टर कृष्णराव, ताराबाई शिरोडकर, गोविंदराव टेंबे आदींना भास्करबुवा बखले यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. जालंधर, सियालकोट, कराची, म्हैसूर येथील मैफिली भास्करबुवांनी गाजवल्या.
१९११ साली भास्करबुवांनी भारत गायन समाज ही संस्था हिंदुस्तानी संगीत पद्धतीच्या प्रसारार्थ स्थापली. त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीतर्फे ‘रामराज्यवियोग’ या नाटकात मंथरेची, संगीत सौभद्र या नाटकात नारदाची आणि संगीत शाकुंतलात शकुंतलेची भूमिकाही साकारल्या होत्या. त्यांनी व गोविंदराव टेंबे यांनी संगीत मानापमान व संगीत स्वयंवर नाटकांच्या पदांच्या चाली बांधल्या होत्या. याशिवाय भास्करबुवा बखले यांनी संगीत द्रौपदी व संगीत विद्याहरण या नाटकांचे संगीत दिग्दर्शनही केले होते.

• १८६९: भारत गायन समाज या संस्थेचे संस्थापक गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांचा जन्म. ( मृत्यू: ८ एप्रिल, १९२२ )

  • घटना :

  • १८३१: मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction) गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.
    १८८८: थॉमस एडिसन यांनी ऑप्टिकल फोनोग्राफ (प्रथम चित्रपट) साठी पेटंट दाखल केले.
    १९१७: पहिले महायुद्ध – इंग्लंडने जर्मनीवर पहिला बॉम्बहल्ला केला.
    १९३१: माफिया डॉन अल कपोन यांना आयकर बुडवल्याबद्दल शिक्षा झाली.
    १९३३: अल्बर्ट आइनस्टाइ हे नाझी जर्मनीतुन पळून अमेरिकेत आले.
    १९३४: प्रभात चा अमृतमंथन हा चित्रपट पुण्याच्या प्रभात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
    १९४३: बर्मा रेल्वे – रंगून ते बँकॉक हा रेल्वेमार्ग पूर्ण झाला.
    १९५६: पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र अधिकृतपणे ईंग्लंडमध्ये सुरु झाले.
    १९६६: बोटस्वाना आणि लेसोथो यांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
    १९७९: मदर तेरेसा यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला.
    १९९४: पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (NIV) विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ. टी. जेकब जॉन यांना डॉ. शारदादेवी पॉल पारितोषिक जाहीर.
    १९९६: अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.
    १९९८: आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणार्या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान.

• मृत्यू :

१८८२: इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे निधन. (जन्म: ९ मे. १८१४)
१९०६: जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ यांनी जलसमाधी घेतली. (जन्म: २२ ऑक्टोबर, १८७३)
• १९९३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचे निधन. (जन्म: १२ मे, १९०७ )
• २००८: ललित लेखक रविन्द्र पिंगे यांचे निधन. (जन्म: २३ मार्च , १९२६)

  • जन्म :
    • १८१७: भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचा जन्म. ( मृत्यू: २७ मार्च, १८९८ )
    १८९२: कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव सोपानराव बोरावके यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी, १९६८)
    १९१७: वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर, १९९४)
    १९४७: चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका सिम्मी गरेवाल यांचा जन्म.
    १९५५: अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्म. ( मृत्यू: १३ डिसेंबर, १९८६ )
    १९७०: भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »