इथेनॉल इकॉनॉमीद्वारे ८० हजार कोटी शेतकऱ्यांना दिले : मोदी

सोलापूर : शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आमच्या सरकारचे गेल्या दहा वर्षांत प्रयत्न सुरू आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा अधिक मोबदला मिळाव्या या उद्देशाने इथेनॉल इकॉनॉमीला चालना देऊन, शेतकऱ्यांना ८० हजार कोटी रुपयांचा लाभ मिळवून दिला, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत केले.
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रचारात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांची महायुती असलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मोदी बोलत होते.
“आमचे सरकार देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. इथेनॉल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कमाईचे नवे मार्ग उपलब्ध करून देत आहोत, असे सांगून ‘मोदी पंतप्रधान झाल्यानंतर इथेनॉल तंत्रज्ञान आले का?’, असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. ते म्हणाले, हे तंत्रज्ञान आधीही होते; पण आधीच्या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. आज पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण 15 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्याचे आहे. आम्ही नवे अभिनव धारणे राबवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतच राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
इतरही अनेक राजकीय मुद्यांवर ते बोलले. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली.