नाशिकमध्ये साखर कारखान्यांचा बंदला पाठिंबा
नाशिक : जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आंदोलन केले. कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वात ऊस बंद आंदोलन करण्यात आले होते.
नाशिक जिल्ह्यातील कादवा व वसाका या साखर कारखान्यांनी या आंदोलनाला अधिकृत पाठिंबा देऊन दोन दिवस ऊस तोडणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊस तोडी न घेतल्यामुळे नाशिकचे साखर कारखाने ठप्प झाले आहे. शेतकऱ्यांना ऊसाच्या मिळणाऱ्या पैशाचे तुकडे करण्याचा घाट केंद्र आणि राज्य सरकार यांनी संगनमताने घातला असल्याचा आरोप शेतकरी संघटना करीत आहे.