राष्ट्रीय साखर महासंघाचा पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने दिल्लीत आयोजित कार्यक्रमात २०२२-२३ हंगामासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे दिमाखात वितरण झाले. प्रमुख तीन पुरस्कार केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते, तर उर्वरित १८ पुरस्कारांचे वितरण सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल यांच्या हस्ते झाले.

या पुरस्कारांची झलक

सर्व छायाचित्रे पाहण्यासाठी ▶ अशा चिन्हावर क्लिक करा

  • Bhimashankar Sugar Pune
  • Vighnahar Sugar Pune
  • Pandurang Sugar, Pandharpur
  • Vighnahar Sutar
  • Shahu Sugar Kolhapur
  • DS Subramaniya Sugar Tamilnadu
  • Vighnahar Sugar
  • Pandurang Sugar
  • Pandurang Sugar

उत्कृष्ट ऊस उत्पादकता/उच्च उतारा विभाग
प्रथम : क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड शेतकरी सहकार कारकखाना लि. पो, कुंडल, ता. पलूस, जि.सांगली (महाराष्ट्र)
द्वितीय : लोकनेते सुंदररावजी सोळुंके सहकारी साखर कारखाना लि. सुंदरनगर. ता. माजलगाव, जि. बीड (महाराष्ट्र)


तांत्रिक कार्यक्षमता/उच्च उतारा विभाग

प्रथम : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि. पो. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर (महाराष्ट्र)
द्वितीय : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि. जुन्नर आंबेगाव, निवृत्तीनगर पो. शिरोली. ता. जुन्नर, जि. पुणे (महाराष्ट्र)


उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन / उच्च उतारा विभाग

प्रथम : श्री खेडूत सहकारी खांड उद्योग मंडली लि. सरदार बाग, बाबेन-बार्डोली, जि. सुरत (गुजरात)
द्वितीय : श्री नर्मदा खांड उद्योग सहकारी मंडली लि. धरीखेडा, पोस्ट तिंबी, ता. राजपिपला (नांदोड), जि. नर्मदा (गुजरात)


विक्रमी ऊस गाळप / उच्च उतारा विभाग

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. गंगामाईनगर-पिंपळनेर, ता. माढा, जि. सोलापूर (महाराष्ट्र)
विक्रमी ऊस उतारा / उच्च उतारा विभाग

डॉ पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि. मोहनराव कदम नगर, पो. वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली (महाराष्ट्र)


सर्वोत्कृष्ट साखर कारखाना / उच्च उतारा विभाग

श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना ली. कागल, ता. कागल, जि. कोल्हापूर (महाराष्ट्र)
विक्रमी साखर निर्यात

प्रथम : जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. श्री कल्लप्पाअण्णा आवाडेनगर, पो. हुपरी-यळगुड, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर (महाराष्ट्र)
द्वितीय : सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर, ता.कराड, जि. सातारा (महाराष्ट्र)


उर्वरित विभाग – उत्कृष्ट ऊस उत्पादकता

प्रथम : दि किसान सहकारी चिनी मिल्स लि. अनुपशहर (बुलंदशहर) पो. चिनी मिल, जहांगिराबाद (उत्तर प्रदेश)
द्वितीय : दि नाकाडोर कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि. पो. मेहातपुर ता. नाकाडोर जि. जालंदर (पंजाब)


तांत्रिक कार्यक्षमता

प्रथम : दि कर्नाल कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि. मेरुत रोड, जि. कर्नाल (हरियाणा)
द्वितीय : दि किसान सहकारी चिनी मिल्स लि. नजीबाबाद, जि. बिजनोर (उत्तर प्रदेश)


उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन

प्रथम : कल्लाकुरिची II कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि. काचीरायापलयम. ता. कल्लाकुरिची. जि. विल्लूपुरम (तामिळनाडू)
द्वितीय : दि किसान सहकारी चिनी मिल्स लि. गजरौला हसनपूर. ता. हसनपूर जि. अमरोहा (उत्तर प्रदेश)


विक्रमी ऊस गाळप

रामाला सहकारी चिनी मिल्स लि. रामाला बरूत, दिल्ली सहारनपूर रोड, जि. बागपत (उत्तर प्रदेश)


विक्रमी ऊस उतारा

नवलसिंग सहकारी शक्कर कारखाना मर्यादित. नवलनगर. पो. निंबोला, जि. बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश)
अत्युत्कृष्ट साखर कारखाना

उर्वरित विभाग- डी. एस. ८ सुब्रमनिया शिवा कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि. गोपालापूरम, अलापूरम पोस्ट, ता. पप्पीरेड्डीपट्टी. जि. धर्मापुरी (तामिळनाडू)


एकूण २१ पारितोषिकात महाराष्ट्राने एकूण १० पारितोषिके मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला असून दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशाला चार पारितोषिके प्राप्त झाली. गुजरात, तामिळनाडूने प्रत्येकी दोन पारितोषिके मिळविली तर पंजाब, हरियाणा व मध्य प्रदेशाला प्रत्येकी एक पारितोषिक मिळाले.

यंदाच्या वर्षाचे संपूर्ण देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठीचे मानाचे वसंतदादा पाटील पारितोषिक भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि, दत्तात्रयनगर, ता. आंबेगाव, जि. पुणे (महाराष्ट्र) या कारखान्याला मिळाले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »