‘नॅचरल’कडून २५ टक्के लाभांश

आवडल्यास ही बातमी शेअर करा

धाराशिव : ग्रामीण भागातील सुमारे 40 हजार कुटुंबांच्या जीवनात समृद्धी आणणाऱ्या नॅचरल उद्योग समूह म्हणजेच नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजने २३-२४ साठी तब्बल २५ टक्के लाभांश जाहीर केला आणि त्याचे वितरण राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या निमित्ताने बागडे नानांचा भव्य हृद्य सत्कार नॅचरल समूहाच्या वतीने रांजणी येथील याच कार्यक्रमात हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीने चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आला. ‘नॅचरल’च्या प्रगतीबद्दल आणि ठोंबरे यांच्या सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या अथक प्रयत्नांबद्दल बागडे नाना यांनी गौरवोद्‌गार काढले.

ठोंबरे यांनी आपल्या भाषणात २५ वर्षांच्या कालखंडाचा थोडक्यात आढावा घेतला. एन साई पतसंस्था सारख्या वित्तीय संस्थामध्ये नॅचरलने कसे पाय रोवले आणि त्याचा सभासदांना कसा लाभ झाला इ. माहितीही त्यांनी दिली. नॅचरलच्या सामाजिक कार्याचाही त्यांनी उल्लेख करत, त्यासाठी आपली वचनबद्धता अधोरेखित केली.

आपल्या सभासदांना २५ टक्के एवढा घसघशीत लाभांश देणारा नॅचरल समूह हा देशातील पहिला साखर उद्योग ठरला आहे. ‘शुगरटुडे’च्या वतीने नॅचरल आणि ठोंबरे यांचे खूप खूप अभिनंदन…

NATURAL SUGAR, RANJANI

नॅचरल शुगरचे यंदाचे रौप्यमहोत्सवी म्हणजे २५ वे वर्ष आहे, त्याचे औचित्य साधून, २५ टक्के लाभांश देण्याची घटना उद्योग क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरणारी आहे.

नॅचरल उद्योग समूह साखर उत्पादनाबरोबरच, स्टील, सहवीज, इथेनॉल, पोटॅश, सीबीजी, ऑक्सिजन, ग्रीन हायड्रोजन, डेअरी उत्पादन क्षेत्रात सन २००० पासून सक्रिय आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »