देवी स्कंदमाता

आज शुक्रवार, सप्टेंबर २६, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर अश्विन दिनांक ४ शके १९४७
सूर्योदय : ०६:२८ सूर्यास्त : १८:३१
चंद्रोदय : १०:०२ चंद्रास्त : २१:१४
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : शरद्
चंद्र माह : आश्विन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : चतुर्थी – ०९:३२ पर्यंत
नक्षत्र : विशाखा – २२:०९ पर्यंत
योग : विष्कम्भ – २२:५१ पर्यंत
करण : विष्टि – ०९:३२ पर्यंत
द्वितीय करण : बव – २२:४८ पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : तूळ – १५:२३ पर्यंत
राहुकाल : १०:५९ ते १२:३०
गुलिक काल : ०७:५८ ते ०९:२९
यमगण्ड : १५:३० ते १७:०१
अभिजितमुहूर्त: १२:०५ ते १२:५४
दुर्मुहूर्त : ०८:५३ ते ०९:४१
दुर्मुहूर्त : १२:५४ ते १३:४२
अमृत काल : १२:१५ ते १४:०३
वर्ज्य : ०२:३९, सप्टेंबर २७ ते ०४:२७, सप्टेंबर २७
नवरात्र ( पाचवी )
देवी स्कंदमाता : पंचमी किंवा मातृत्व आणि मुलांची देवी म्हणूनही ओळखली जाणारी, देवी स्कंदमातेची नवरात्रीच्या पाचव्या दिवशी तिच्या भक्तांद्वारे पूजा केली जाते. तिला चार हात आहेत. त्यापैकी दोन हातात कमळ धारण केले आहे. इतर दोन हातांमध्ये पवित्र कमंडलू आणि घंटा आहे. देवीने भगवान कार्तिकेय किंवा स्कंद आपल्या मांडीवर घेतले आहे. त्यामुळे तिला स्कंदमाता म्हणतात. तिचा आवडता रंग ‘हिरवा’ असून तिचे आवडते खाद्य केळी असल्याचं मानलं जातं.
१९३२: भारताचे माजी पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांचा जन्म. ( मृत्यू : २६ डिसेंबर, २०२४ )
ईश्वर चंद्र विद्यासागर यांचा जन्म बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यात २६ सप्टेंबर १८२० रोजी झाला होता. त्यांचे वडील ठाकूरदास बांडोपाध्याय आणि माता भगवत देवी हे अतिशय धार्मिक व्यक्ती होते.कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती म्हणून, मूलभूत संसाधनांच्या कमतरतेमध्ये ईश्वरचंद्र यांना आपले बालपण खर्च करावे लागले.
ईश्वर चंद्र विद्यासागर हे ब्रिटिश भारतीय बंगाल पुनर्जागरण या प्रमुख व्यक्तिमत्त्वाचे होते.
ईश्वरचंद्र विद्यासागर हे बंगाल पुनरुत्थानाचे एक आधारस्तंभ म्हणून होते. ज्याने १८०० च्या सुरुवातीला राजा राममोहन रॉय यांनी सुरू केलेल्या सामाजिक सुधारणांची चळवळ चालू ठेवली होती. विद्यासागर एक सुप्रसिद्ध लेखक, बौद्धिक आणि मानवतेच्या सर्व कट्टर समर्थकांपेक्षा श्रेष्ठ होते. त्यांचे एक भव्य व्यक्तीमत्व होते. ब्रिटीश अधिकाऱ्यांकडून त्यांचा आदर केला जात होता.त्यांचे पुस्तक ‘बोर्नो पोरीचॉय’ (अक्षर परिचय),अद्याप बंगाली वर्णमाला शिकण्यासाठी प्रारंभिक मजकूर म्हणून वापरला जातो. विद्यासागर (ज्ञानाचा महासागर) या विषयावर त्यांना अनेक विषयांचा प्रचंड ज्ञान असल्याने त्यांना देण्यात आले. त्यांचे महिलांच्या शिक्षणसाठी समर्थन असे. त्यामुळे त्यांनी बऱ्याच ठिकाणी बालिकांसाठी विद्यालयाची स्थापना केली.
बेतल पंचबिन्सती (१८४७) , बंगाला-आर इतिहास (१८४८), जीवनबंधिक (१८५०),बोधदायी (१८५१), उपारकमनिका (१८५१), बिधा बिभाहा बिष्यक प्रोस्ताब , बोर्नो पोरिचॉय (१८५४), कोठा माला (१८५६), सतार बोनोबास (१८६०) हि त्यांची लेखन संपदा आहे तर बंगाली वृत्तपत्र -शोम प्रकाश १८५८ मध्ये प्रकाशन करण्यास सुरुवात केली.
१८२०: पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा बंगाल मध्ये जन्म. (मृत्यू: २९ जुलै १८९१)
गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंतकुमार – हेमंतदांचा जन्म १६ जून १९२० ह्या दिवशी वाराणसी येथे झाला. त्यांचे बालपण बंगालमधील एका खेड्यात गेले. त्याकाळी खेड्यात होत असलेली नाटके पहात आणि लोकसंगीत ऐकत हेमंतदा मोठे झाले, पण संगीताचे औपचारिक शिक्षण हेमंतदांना मिळाले नाही. त्यांचा कुटुंबीयांचा संगीतक्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. कोलकाता येथील महाविद्यालयात शिकताना १९३५ साली त्यांनी आकाशवाणीवर गाण्याची चाचणी परिक्षा दिली आणि गायक म्हणून ते आकाशवाणीवर गायला पात्र झाले.
गायनात गती असणाऱ्या हेमंतदांना साहित्यक्षेत्रातदेखिल रस होता. १९३७ साली त्यांनी लिहिलेली एक लघुकथा आणि गायलेले एक गाणे ह्या दोन्ही गोष्टी प्रसिद्ध झाल्या आणि हेमंतदांमधील कलाकार जन्मास आला. वर्षभर विद्युत अभियांत्रिकी शिकल्यावर त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ संगीतकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
१९४० साली ‘निमोई संन्यासी’ ह्या बंगाली चित्रपटासाठी तर १९४४ साठी ‘ईरादा’ ह्या हिंदी चित्रपटांसाठी गाणी गाऊन हेमंतदांचा चित्रपटातील पार्श्वगायकाच्या कारकिर्दीस सुरुवात केली. पैकी बंगाली चित्रपटासाठी संगीतकार हरि प्रसन्नो दास ह्यांच्या हाताखाली सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणूनही हेमंतदांनी काम केले.
स्वतंत्र संगीतकार म्हणून त्यांनी १९४५ सालच्या पूर्बोरंग ह्या बंगाली तर १९५२ सालच्या आनंदमठ ह्या हिंदी चित्रपटाला संगीत दिले.
१९५४ सालच्या नागिन चित्रपटासाठी संगीतदिग्दर्शित केलेले त्यांची गाणी खूप गाजली. ह्याच चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून पुरस्कारदेखिल मिळाला. गायक म्हणून हेमंतदांनी हिंदी चित्रपटसंगीत क्षेत्रातील जवळपास सर्व आघाडीच्या संगीतकारांकडे गाणी गायली.
१९५९ साली हेमंतदांनी मृणाल सेन दिग्दर्शित नील आकाशेर नीचे ह्या चित्रपटाद्वारे चित्रपटनिर्मीती क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या गीतांजली प्रॉडक्शन्स ह्या चित्रपटकंपनीने निर्माण केलेले बीस साल बाद (१९६२), कोहरा (१९६४), खामोशी (१९६९) ह्यांसारखे हिंदी चित्रपट त्यांतील गाण्य़ांसकट लोकप्रिय झाले. ह्या सर्व चित्रपटांसाठी संगीतदिग्दर्शनाची जबाबदारीदेखिल हेमंतदांनी यशस्वीपणे संभाळली होती.
हेमंतदांनी गायलेली मोजकी मराठी गाणी लोकप्रिय झाली. ’हा खेळ सावल्यांचा’ ह्या चित्रपटातील ’गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, लता मंगेशकर ह्यांच्याबरोबरचे ’मी डोलकर, डोलकर दर्याचा राजा’ ही हेमंतदांच्या लोकप्रिय मराठी गाण्यांची काही उदाहरणे आहेत.
त्यांचा १९८५ साली रविंद्र भारती विश्वविद्यालयाने डि. लिट. ही पदवी देऊन सन्मान केला.
• १९८९: गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंतकुमार यांचे निधन. (जन्म: १६ जून १९२०)
- घटना :
इ.स.पू. ४६: ज्युलियस सीझर यांनी आपल्या पौराणिक पूर्वज व्हिनस गेनेटिक्स यांना एक मंदिर अर्पण केले.
१७७७: अमेरिकन क्रांती – ब्रिटिश सैनिक फिलाडेल्फिया शहरात घुसले.
१९०५: अल्बर्ट आइनस्टाइन यांनी सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांतावरील पहिला लेख प्रकाशित केला.
१९१०: त्रावणकोर सरकारवर केलेल्या टीकेमुळे भारतीय पत्रकार स्वदेशभीमानी रामकृष्ण पिल्लई यांना अटक करून हद्दपार करण्यात आले.
१९५०: इंडोनेशियाला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
१९५४: जपानमध्ये तोया मारू ही फेरी वादळात बुडाली. १,१७२ लोक मृत्युमुखी.
१९६०: फिडेल कॅस्ट्रोने यु. एस. एस. आर. ला पाठिंबा जाहीर केला.
१९७३: ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्या काँकॉर्ड या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.
१९८४: युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.
१९९०: रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९७: गरुडा इंडोनेशियाचे विमान मेदान शहराजवळ कोसळले, २३४ लोक ठार.
२००९: टायफून केत्साना या चक्रीवादळाच्या तडाख्यात फिलिपाईन्स, चीन, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस व थायलंडमध्ये ७०० लोक मृत्युमुखी.
• मृत्यू :
• १९५६: भारतीय, मराठी उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: २० जून १८६९)
• १९५८ : टीबी कुन्हा – या पोर्तुगीज नावात , पहिले किंवा मातृ आडनाव डे ब्रागांका आहे आणि दुसरे किंवा पितृ आडनाव कुन्हा आहे . ट्रिस्टाओ दे ब्रागांका कुन्हा टीबी कुन्हाम्हणून ओळखले जाणारे, हे एक पोर्तुगीज राष्ट्रवादी आणि वसाहतविरोधी कार्यकर्ते होते. “गोव्याच्या राष्ट्रवादाचे जनक” म्हणून ओळखले जाणारे, ते गोव्यात पोर्तुगीज राजवट संपवण्याच्या पहिल्या चळवळीचेसंयोजकहोते. ( जन्म : २ एप्रिल, १८९१ )
• १९७७: भारतीय नर्तक उदय शंकर यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १९००)
• १९८८: रूद्रवीणा वादक शिवरामबुवा दिवेकर यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १९१२)
• १९९६: मराठी नाटककार, पत्रकार विद्याधर गोखले यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९२४)
• २००२: मराठी संगीतकार, गायक राम फाटक यांचे निधन. (जन्म: २१ ऑक्टोबर १९१७)
- जन्म :
१८५८: लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर १८९८)
१८७६: भारतीय कवी, वकील, आणि राजकारणी गुलाम कबीर नैयरंग यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १९५२)
१८९४: प्रज्ञावंत भाष्यकार आणि तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा मलकापूर कोल्हापूर येथे जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९५५)
१९२३: भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक देव आनंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर २०११)
१९३१: भारतीय क्रिकेट खेळाडू विजय मांजरेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९८३)