नवरात्र -सातवी माळ – कालरात्री
आज बुधवार, ऑक्टोबर ९, २०२४ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन १७ शके १९४५
सूर्योदय : ०६:३१ सूर्यास्त : १८:२०
चंद्रोदय : १२:०१ चंद्रास्त : २२:५९
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतू : शरद्
चंद्र माह : आश्विज
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : षष्ठी – १२:१४ पर्यंत
नक्षत्र : मूळ – ०५:१५, ऑक्टोबर १० पर्यंत
योग : सौभाग्य – ०६:३७ पर्यंत
क्षय योग : शोभन – ०५:५३, ऑक्टोबर १० पर्यंत
करण : तैतिल – १२:१४ पर्यंत
द्वितीय करण : गर – ००:२८, ऑक्टोबर १० पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : धनु
राहुकाल : १२:२५ ते १३:५४
गुलिक काल : १०:५७ ते १२:२५
यमगण्ड : ०८:०० ते ०९:२८
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:०२ ते १२:४९
अमृत काल : २२:३३ ते ००:१४, ऑक्टोबर १०
वर्ज्य : १२:३० ते १४:११
वर्ज्य : ०३:३५, ऑक्टोबर १० ते ०५:१५, ऑक्टोबर १०
नवरात्र (सातवी माळ)
दिवस ७ – कालरात्री
देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप मानले जाणारी कालरात्री सप्तमीला पूजनीय आहे. असे मानले जाते की पार्वतीने सुंभ आणि निसुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची फिकट त्वचा काढली होती. दिवसाचा रंग शाही निळा आहे. देवी लाल रंगाच्या पोशाखात किंवा वाघाच्या कातडीत दिसते आणि तिच्या अग्निमय डोळ्यांमध्ये खूप क्रोध आहे आणि तिची त्वचा काळी पडते. लाल रंग प्रार्थनेचे चित्रण करतो आणि भक्तांना आश्वासन देतो की देवी त्यांना हानीपासून वाचवेल. ती सप्तमीला (सातव्या दिवशी) पूजली जाते.
पूर्व भारतात या दिवशी महासप्तमी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजेचे बोधोन देखील सुरू होते.
पत्रास कारण की, स. न. वि. वि.
काळाच्या ओघात मागे पडलेले पत्र- व टपाल सेवा आठवा – जुने संवाद माध्यम
आज जागतिक पोस्ट दिन आहे.
गोपबंधु दास– १९०४ मध्ये ते कटक येथील रेव्हेन्शॉ महाविद्यालयातून पदवी घेऊन एम्. ए. आणि कायद्याच्या अभ्यासासाठी कलकत्त्यास गेले; परंतु एम्. ए. न करता कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी कायद्याची बी. एल्. पदवी घेतली (१९०६). नंतर ते पुरी येथे वकिली करू लागले. मध्यंतरी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांना एक मुलगा व दोन मुली होत्या पुन्हा विवाह न करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी स्वतःस, सामाजिक व राजकीय कार्यास वाहून घेतले. त्यांनी १९०९ मध्ये पुरीजवळील सखीगोपाल येथे माध्यमिक इंग्रजी शाळेची स्थापना केली. ही एक आदर्श शाळा होती व ती ‘सत्यवादी’ वा ‘सखीगोपाल’ वनविद्यालय या नावाने ओळखली जाई. स्वमतप्रचारार्थ त्यांनी सत्यवादी (मासिक) व समाज (साप्ताहिक) ही पत्रे सुरू केली. तत्कालीन उत्कृष्ट असा अध्यापक वर्ग शाळेवर होता. त्यांत स्वतः गोपबंधू, पंडित नीलकंठ दास, पंडित गोदावरीश मिश्र, पंडित कृपासिंधू मिश्र व आचार्य हरिहर दास ह्या प्रसिद्ध विद्वान व साहित्यिक व्यक्तींचा समावेश होता. हे पाचजण ‘पंचसखा’ नावाने त्या कालखंडात प्रसिद्ध होते. यांच्या लेखनामुळे ओडिया साहित्यात नव्या सत्यवादी युगाचे प्रवर्तन झाले. हे विद्यालय त्या काळी शिक्षणाचे, राजकीय विचारांचे, साहित्याचे, समाजसेवेचे व राष्ट्रीय कार्याचे एक प्रसिद्ध केंद्र बनले होते. १९२१ मध्ये ह्या पाचजणांनी जेव्हा असहकारिता चळवळीत उडी घेतली, तेव्हा हे विद्यालय राष्ट्रीय विद्यालय बनले व शेवटी १९२६ मध्ये इंग्रज सरकारच्या रोषास पात्र ठरून बंद पडले.
असहकारितेची चळवळ सुरू झाल्यावर ते ओरिसा प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांनी उत्कल संमिलनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन केली. भारतीय राष्ट्रवादाचे ओरिसातील अध्वर्यू म्हणून त्यांचेच नाव घेतले जाते. त्यांनी गांधीजीप्रणीत असहकारितेच्या चळवळीस ओरिसात चालना दिली व काँग्रेस संघटना बळकट केली. १९२१ मध्ये त्यांना समाज ह्या साप्ताहिक पत्रातील लेखाबद्दल अटक झाली. पुन्हा १९२२ मध्ये त्यांना असहकारिता चळवळीत भाग घेतल्याबाबत दोन वर्षांची शिक्षा झाली. हजारीबाग कारागृहात असताना त्यांनी दोन काव्यग्रंथ लिहिले. त्यांच्या समाजसेवेमुळे लाला लजपतराय यांनी त्यांना ‘सर्व्हंट्स ऑफ द पीपल सोसायटी’ चे सदस्यत्व बहाल केले. १९२६ मध्ये ते सोसायटीचे उपाध्यक्ष झाले. समाज नावाचे साप्ताहिक पत्र १९१९ मध्ये सुरू केले होते. ते प्रथम सखीगोपाल येथून, नंतर १९२५ मध्ये पुरी येथून व १९२७ मध्ये कटकवरून निघत असे. १९३० मध्ये ते दैनिक झाले. उत्कृष्ट वक्ते, थोर देशभक्त, समाजसेवक, दूरदृष्टीचे शिक्षणतज्ञ, कवी, आधुनिक ओडिया गद्याचे शिल्पकार व मानवतावादी म्हणून गोपबंधूंचे स्थान ओरिसाच्या इतिहासात व साहित्यात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
१८७७: ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक पण्डित गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १९२८)
एम. भक्तवत्सलम– हे भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यसेनानी भक्तवत्सलम मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन इत्यादी चळवळींदरम्यान तुरुंगात गेले होते. १९६३ ते १९६७ दरम्यान तमिळनाडूच्या मुख्यमत्रीपदावर आलेले भक्तवत्सलम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तमिळनाडूमधील अखेरचे मुख्यमंत्री होते. १९६७ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघमकडून काँग्रेस पराभूत झाल्यानंतर भक्तवत्सलम यांनी राजकारण-संन्यास घेतला.
१९६३ साली रा.स्व. संघाचे सरसंघचालक माधव गोळवलकर ह्यांनी कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंदांचे स्मारक स्थापन करण्याची मागणी उचलून धरली व त्यासाठी एकनाथ रानडे ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. भक्तवत्सलम व केंद्रीय मंत्री हुमायून कबीर ह्यांचा ह्या स्मारकाला तीव्र विरोध होता. परंतु रानड्यांनी ३२३ खासदारांचे समर्थन असलेले पत्र सादर केल्यामुळे भक्तवत्सलमांना माघार घेऊन ह्या स्मारकाच्या बांधकामास परवानगी द्यावी लागली.
१८९७: मद्रास राज्यचे ६वे मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९८७)
घटना:
१४१०: प्राग खगोलशास्त्रीय घडामोडींचा प्रथम उल्लेख करण्यात आला.
१४४६: हंगुल वर्णमाला कोरिया मध्ये प्रकाशित झाली.
१८०६: पर्शिया ने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले.
१९६०: विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९६२: युगांडा देशाला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९८१: फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.
मृत्यू :
- १८९२: पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी, १८२३)
- १९१४: बालवाङ्मयकार विनायक कोंडदेव ओक यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १८४०)
- १९५५: हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचे निधन. (जन्म: ५ जून १८८१)
- १९८७: कथकली नर्तक गुरू गोपीनाथ यांचे निधन. (जन्म: २४ जून १९०८)
- १९९८: छायालेखक (Cinematographer) जयवंत पाठारे यांचे निधन.
- १९९९: नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी मा. अनंत दामले तथा नूतन पेंढारकर यांचे निधन.
- २००६: भारतीय वकील आणि राजकारणी कांशी राम यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९३४)
- २०१५: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक रवींद्र जैन यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४४)
जन्म :
१८७६: बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्म. (मृत्यू: ४ जून १९४७)
१९२४: भारतीय सैनिक इमानुवेल देवेन्द्रर यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९५७)