नेताजी सुभाषचंद्र बोस

आज शुक्रवार, जानेवारी २३, २०२६ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ ३, शके १९४७
सूर्योदय : ०७:१५ सूर्यास्त : १८:२६
चंद्रोदय : १०:०९ चंद्रास्त : २२:३४
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पञ्चमी – ०१:४६, जानेवारी २४ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा – १४:३३ पर्यंत
योग : परिघ – १५:५९ पर्यंत
करण : बव – १४:१० पर्यंत
द्वितीय करण : बालव – ०१:४६, जानेवारी २४ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : कुंभ – ०८:३३ पर्यंत
राहुकाल : ११:२६ ते १२:५०
गुलिक काल : ०८:३९ ते १०:०२
यमगण्ड : १५:३८ ते १७:०२
अभिजितमुहूर्त : १२:२८ ते १३:१३
दुर्मुहूर्त : ०९:२९ ते १०:१४
दुर्मुहूर्त : १३:१३ ते १३:५८
वर्ज्य : ००:०२, जानेवारी २४ ते ०१:३७, जानेवारी २४
वसंत पंचमी म्हणजे माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी, जी वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे आणि ज्ञान, कला व संगीताची देवी सरस्वतीचा जन्मदिन म्हणून साजरी केली जाते . ( या दिवशी माता सरस्वती पृथ्वीवर अवतरल्याची श्रद्धा आहे ) म्हणून याला ज्ञानपंचमी किंवा श्रीपंचमी म्हणतात.
या दिवशी पिवळे कपडे घालून, गोड पदार्थ खाऊन आणि सरस्वतीची पूजा करून हा सण साजरा करतात, तसेच हा दिवस नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी शुभ मानला जातो.
आज वसंत पंचमी आहे.
- नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.
१९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता.
नेताजींचे योगदान व प्रभाव इतका मोठा होता की काही जाणकार असे मानतात की जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते तर कदाचित भारताची फाळणी न होता भारत एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता. स्वतः गांधींजी देखील असेच मानत होते.
१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त भारतरत्न प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला.
त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. इतिहासातली ही दिलेला भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची एकमेव घटना आहे.
१८९७: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ – फोर्मोसा, तैवान)
ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर – धुंडा महाराजांनी ज्ञानेश्वरांच्या हरिपाठावर असंख्य प्रवचने दिली. त्यांनी हरिपाठाच्या सातत्यपूर्ण चिंतनातून सहाशे पानांचा प्रदीर्घ स्वरूपाचा ‘हरिपाठविवरण अथवा भक्तिशास्त्र’ हा ग्रंथ लिहिला. मामा दांडेकरांनी त्यांच्या प्रस्तावनेतून त्या ग्रंथातून महाराजांच्या अथांग व्यासंगाचे दर्शन घडत असल्याचे सांगितले आहे. हरिपाठातील नाममहात्म्य आणि तत्त्वज्ञान विस्ताराने सांगितले आहे.
संत एकनाथांच्या हरिपाठावरही सुमारे दोनशे पानांचे भाष्य पुढे, 1974 च्या सुमारास लिहून हरिपाठाचा वस्तुक्रियापाठच भाविकांच्या हाती दिला. धुंडा महाराज देगलूरकरांनी महर्षी नारदांच्या ‘भक्तिसूत्रा’वर चारशे पानांचे विस्तृत भाष्य लिहिले. भक्तिशास्त्रावरील मौलिक ग्रंथ म्हणून ‘नारदभक्तिसूत्र’ या ग्रंथाची ख्याती सर्वदूर पसरली. त्यानंतर त्यांनी दीडशे पानांचा ‘संतवचनामृत’ हा ग्रंथ लिहिला. त्यात संत ज्ञानेश्वरांच्या दहा अभंगांवरील संकीर्तन आहे. ‘तो ग्रंथ म्हणजे भक्तिप्रेमानंद चाखणाऱ्या विद्वान पंडितांना मेजवानीच आहे’ असा अभिप्राय मामा दांडेकरांनी व्यक्त केला. त्याबरोबर महाराजांचे तुकारामांच्या अभंगावरील निरूपणाचे दोन भाग प्रसिद्ध झाले आहेत.
त्यांनी १९७६ साली सोलापूर येथील ज्ञानेश्वर महाराज जन्मशताब्दीनिमित्त ‘पदायदान – संत ज्ञानेश्वरांचे मागणे’ या ग्रंथाचे लेखन केले. पसायदानातील केवळ नऊ ओव्यांवर त्या ग्रंथात धुंडा महाराजांनी अडीचशे पानांचे विस्तृत भाष्य लिहिले. त्यातून महाराजांच्या चिंतनाची सखोलता लक्षात येते. ग्रंथाचे प्रकाशन तत्कालीन उपराष्ट्रपती बी.डी. जत्ती यांच्या हस्ते झाले. त्यांनी त्या ग्रंथाचे तोंड भरून कौतुक केले.
पुढे, आंध्रप्रदेशातील मच्छलीपट्टण येथे आंध्र भाषातज्ज्ञांच्या मदतीने तेलुगू भाषेत ज्ञानेश्वरीचे प्रकाशन केले. त्या ग्रंथलेखनाबरोबरच मुमुक्षू, प्रतिष्ठान, पुरुषार्थ, प्रसाद, तत्त्वज्ञान, माऊली, यज्ञवाक्य, जीवनविकास, श्रीज्ञानेश्वरदर्शन ग्रंथ, सांगाति, कल्याण, पंढरी संदेश, पंचधारा इत्यादी मासिक-पाक्षिक-नियतकालिकांतून महाराजांनी प्रसंगानुरूप संत साहित्यावर लेखन केले. महाराजांनी शेकडो ग्रंथांना अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिलेल्या आहेत.
• १९९२: भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर यांचे निधन.
- घटना :
१५६५: विजयनगर साम्राज्याची अखेर.
१७०८: छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.
१८४९: डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर बनल्या.
१९३२: प्रभात च्या अयोध्येचा राजा ची हिन्दी आवृत्ती अयोध्याका राजा मुंबईत प्रदर्शित झाली.
१९४३: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने लिबीयाची राजधानी त्रिपोली शहर जिंकले.
• मृत्यू :
• १६६४: शहाजी राजे भोसले यांचे कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना घोडा अडखळून पडल्याने अपघाती निधन. (जन्म: १८ मार्च, १५९४)
• १९१९: नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचे निधन. (जन्म: २६ मे, १८८५)
• १९५९: शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित विठ्ठल नारायण चंदावरकर यांचे निधन.
• २०१०: शास्त्रीय गायक पं. दिनकर कैकिणी यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९२७)
- जन्म :
१८९८: गायक व संगीतशिक्षक पं. शंकरराव व्यास यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर, १९५६)
१९१५: उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांचा जन्म. (मृत्यू: १ मे, १९७२)
१९२०: व्यासंगी लेखक श्रीपाद रघुनाथ जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २४ सप्टेंबर, २००२ )
१९२६: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर, २०१२)






