ट्रॅक्टर ट्रॉली उलटून बीडमधील नऊ ऊसतोड मजूर जखमी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सांगली :  ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरचा ब्रेक निकामी झाल्याने तो एका मोटारीस धडकून उलटला. या अपघातात बीड जिल्ह्यातील नऊ ऊसतोड मजूर जखमी झाले आहेत. हा अपघात कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथील रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गवर मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास घडला. ट्रॅक्टर चालक महादेव वैजनाथ खंदारे (४०), बाबुराव आत्माराम खंदारे (२७), विश्रांती बाबुराव खंदारे (२५), केशव बाबुराव खंदारे (७), विलास मच्छिंद्र खंदारे (२५), शारदा विलास खंदारे (२१), स्वाती बाळू खंदारे (१०), उमेश आत्माराम खंदारे (२२) आणि सुरेश अभिमान खंदारे (२५, सर्व रा. कारेगव्हाण, ता. बीड, जि. बीड) अशी जखमी झालेल्यांची नावे आहे.

कारेगव्हाण (जि. बीड) येथील महादेव वैजनाथ खंदारे (४०) हे ट्रॅक्टरला (एमएच ४४ डी ४८६८) ट्रॉली जोडून ऊसतोड मजुरांना घेऊन बीडहून नागजमार्गे शिरोळकडे येत होते. दरम्यान, कुची गावच्या हद्दीत आल्यानंतर हॉटेल ए. पी. बारसमोर ट्रॅक्टरचा ब्रेक अचानक निकामी झाला. अनियंत्रित झालेल्या ट्रॅक्टरची मिरजच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीस (एमएच १० एन ५२१८) पाठीमागून जोरदार धडक बसली आणि काही क्षणातच ती ट्रॅक्टर ट्रॉली उलटली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »