पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला जिल्हाधिकारी मुंडेंची नोटीस

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बीड : माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी एफआरपी वसुलीसाठी नोटीस बजावली आहे. वसुलीसाठी त्यांनी तहसीलदारांना प्राधिकृत केले आहे. २८ जुलै रोजी ही नोटीस दिली आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी मुंडे यांनी परळीच्या तहसीलदारांना सविस्तर पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, उपरोक्त विषयांकीत प्रकरणी आपणास कळविण्यात येते की, संदर्भीय आदेशान्वये वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लि.पांगरी ता. परळी वै. या कारखान्याकडे सन २०२० – २१ च्या हंगामातील गाळप ऊसाचे थकित एफआरपी रक्कम रुपये १११.४१ लाख ( अक्षरी रुपये एक कोटी, अकरा लाख, एकेचाळीस हजार फक्त) तसेच कलम ३ (ए) नुसार सदर रक्कमेवर १५% दराने दये होणारे व्याज या रक्कमा कारखान्याकडुन जमीन महसूलाची थकवाकी समजून आदेशात नमूद केलेल्या बाबीतून वसुल करणेसाठी मा. साखर आयुक्त यांनी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केलेले आहे.

त्याअनुषंगाने प्रकरणात संदर्भानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २२१ प्रमाणे जमीन महसुलाची थकबाकी म्हणून आकारणी योग्य असलेल्या रकमांच्या वसुलीबाबत महाराष्ट्र जमीन महसूल (जमीन महसुलाची वसुलीबाबत) नियम १९६७ चे नियम १७ नुसार जिल्हाधिकारी बीड यांच्या वतीने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लि.पांगरी ता. परळी वै. या कारखान्याकडील मा. साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेशान्वये थकीत रक्कम रुपये ४६१५.७५ लाख १५% व्याजासह वसुल करण्यासाठी आपणांस प्राधिकृत करण्यात येत आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »