‘ओंकार’चा ५० लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण

आवडल्यास ही बातमी शेअर करा

१२७० कोटींची बिले शेतकरी खात्यात जमा

श्रीगोंदा: ओंकार शुगर ग्रुपने चालू गाळप हंगामात ५० लाख मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप पूर्ण केले असून, आतापर्यंत १२७० कोटी रुपयांची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहेत. ग्रुपचे संस्थापक बाबुराव बोत्रे पाटील यांनी ही माहिती दिली. शेतकरी जगला पाहिजे आणि त्‍याच्या घामाला योग्य दाम मिळाला पाहिजे, याच भावनेतून ओंकार ग्रुप काम करत आहे. वेळेत बिल आणि योग्य वजन हीच आमची ओळख असल्‍याचे ओंकार शुगर ग्रुपचे संस्‍थापक बाबुराव बोत्रे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

गौरी शुगर कारखान्याची कामगिरी (हिरडगावयुनिट):

  • गाळप: ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ४ लाख २३ हजार १८६ मेट्रिक टन.
  • बिल वाटप: १३१ कोटी १८ लाख रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत.

व्यवस्थापनाची महत्त्वाची वैशिष्ट्ये

  • पारदर्शक वजन: “कुठेही वजन करा आणि ऊस घेऊन या” असे आवाहन करत कारखान्याने वजनकाट्यातील पारदर्शकता जपली आहे.
  • सर्वोच्च दर: शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोल मिळावे यासाठी राज्यामध्ये सर्वाधिक ऊस दर देण्याचे धोरण ग्रुपने राबवले आहे.

आधुनिक तंत्रज्ञान: कारखान्यातील अद्ययावत यंत्रसामग्री आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे गाळप हंगाम विनाव्यत्यय सुरू आहे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »