स्व. विखे यांना साखर संकुलात आदरांजली

पुणे : आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साखर संकुलामध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाला साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, कृषी संचालक (विस्तार) विनयकुमार आवटे, कर्मचारी वृंद आदींची उपस्थिती होती.
डॉ. खेमनार यांनी पद्मश्री विखे यांच्या साखर क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरवोद्गार काढताना महान दृष्टे नेते, असा उल्लेख केला. आवटे यांनीही विखे यांच्या कृषी आणि सहकारी क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करताना अनेक आठवणी जागवल्या.