आज हरितालिका पूजन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शुक्रवार,

सप्टेंबर ६, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर भाद्रपद दिनांक १५, शके १९४६

आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:२४ सूर्यास्त : १८:४९
चंद्रोदय : ०८:४८ चंद्रास्त : २०:४२
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : भाद्रपद
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : तृतीया – १५:०१ पर्यंत
नक्षत्र : हस्त – ०९:२५ पर्यंत
योग : शुक्ल – २२:१५ पर्यंत
करण : गर – १५:०१ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – ०४:२०, सप्टेंबर ०७ पर्यंत
सूर्य राशि : सिंह
चंद्र राशि : कन्या – २३:०० पर्यंत
राहुकाल : ११:०४ ते १२:३७
गुलिक काल०७:५७ ते ०९:३०
यमगण्ड : १५:४३ ते १७:१६
अभिजितमुहूर्त : १२:१२ ते १३:०१
दुर्मुहूर्त : ०८:५३ ते ०९:४३
दुर्मुहूर्त : १३:०१ ते १३:५१
अमृत काल : ०५:२०, सप्टेंबर ०७ ते ०७:०८, सप्टेंबर ०७
वर्ज्य : १८:२८ ते २०:१७

वराह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार मानला जातो. या अवतारात श्रीविष्णूने वराहाचे म्हणजेच डुकराचे रूप धारण केले होते. ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीया होती, म्हणूत त्या दिवशी वराहजयंती असते.

ह्या अवतारात श्रीविष्णूने हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला.वराह अवताराशी संबंधित अनेक गोष्टी वराह पुराणाात आहेत.मुळात हे तीन वराह होते. नील वराह, श्वेत वराह आणि आदि वराह. तिघांच्या एकत्रित काळाला वराहकाळ म्हणतात.

आज वराह जयंती आहे.

हरतालिका व्रत सर्व पाप व कौटुंबिक चिंतांना दूर करणारे आहे. शास्त्रात या व्रताबाबत ‘हरित पापान सांसारिकान क्लेशाञ्च’, अर्थात हे व्रत सर्वप्रकारचे दु:ख, कलह, व पापांपासून मुक्ती देते, असे म्हटले आहे. शिव-पार्वतीच्या आराधनेचे हे सौभाग्य व्रत फक्त महिलांसाठी आहे.

निर्जला एकादशीप्रमाणेच हरतालिका व्रताच्या दिवशीही उपवास पाळण्यात येतो. पार्वतीने भगवान शंकराशी लग्न करण्यासाठी हे व्रत केले होते. पार्वतीच्या इच्छेची पूर्तीही याच दिवशी झाली होती.

आज हरितालिका पूजन आहे .

श्री स्वामी केशवानंद भारती –
हिंदूंवर व त्यांच्या मठांवर/देवस्थानांवर काँग्रेसी, कम्युनिस्ट, लेफ्ट-लिबरल मीडिया, लाल-बिंदी ब्रिगेड, अर्बन नक्षली, सेक्युलर, क्रिसलामिस्ट्स वगैरे लोकांचा डोळा आधीपासूनच होता. त्यांचं कारस्थान ओळखून त्यावेळी एक साधू याविरुद्ध उभे राहिले! आणि, जो कायदेशीर लढा त्यांनी दिला आणि विजयी झाले, त्या केसला आजही एक ‘लँडमार्क जजमेंट’ म्हणून ओळखली जाते..

केरळमध्ये इडनीर नावाचे १२०० वर्ष जुने हिंदू मठ होते. केरळ आणि कर्नाटकमध्ये या मठाला मानणारे अनेक श्रद्धाळू आहेत. या मठाच्या प्रमुखांना केरळच्या शंकराचार्यांचा दर्जा दिला जातो.

स्वामी केशवानंद हे केरळचे तत्कालीन शंकराचार्य होते. १९ वर्षाच्या वयामध्ये त्यांनी संन्यास घेतला आणि ते गुरुंना शरण गेले. मात्र त्यांच्या (गुरूंच्या) मत्यूनंतर ते मठाचे प्रमुख झाले. त्याच काळात केरळमध्ये दोन जमीन सुधारणा कायदे अस्तित्वात आले होते. एका कायद्यानुसार मठ व्यवस्थापनावर अनेक नियम लागू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. केशवानंद यांनी न्यायलयामध्ये याच नियमांना आव्हान दिले. राज्यघटनेतील कलम २६ चा संदर्भ देत त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला धर्म आणि कर्मासाठी संस्था बनवण्याचा, त्याचे व्यवस्थापन करण्याचा आणि याचसंदर्भात स्थावर अथवा जंगम मालमत्ता गोळा करण्याचा अधिकार आहे, असं म्हटलं होतं. केरळ सरकारचा कायदा हा मला राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांच्या विरोधात असल्याचे केशवानंद म्हणाले होते.

सर्वोच्चन्यायलयाने या खटल्याच्या सुनावणीसाठी १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले होते. या खंडपीठाचे नेतृत्व सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश एस एम सीक्री करत होते. खटल्याच्या शेवटच्या सुनावणीच्या वेळेस खंडपीठातील न्यायाधीशांचे वेगवेगळे मत पडले. सात न्यायाधीशांनी एका बाजूने निकाल दिला तर सहा न्यायाधीशांनी दुसऱ्या. त्यामुळेच सात न्यायाधीशांचे म्हणणे ग्राह्य धरत खटल्याचा निर्णय लावण्यात आला.

“केशवानंद भारती खटला” नावाने पुढे हा खटला प्रसिद्ध झाला. या खटल्यामध्ये कायदेमंडळाचा घटनादुरुस्तीचा अधिकार मान्य करत असताना सर्वोच्च न्यायालयाने ‘राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेला कायदेमंडळ अथवा कार्यकारी मंडळ बदलू शकत नाही ,’ असे मत व्यक्त केले होते. ‘संविधान हे देशातील सर्वोच्च घटना आहे’ याचा त्यावेळी पायाभूत संरचना असं म्हटलं होतं. त्यामुळेच २४ एप्रिल १९७३ रोजी लागलेल्या या खटल्याच्या निकालाने ‘राज्यघटनेचा मूळ साचा कोणत्याही घटनादुरुस्तीद्वारे बदलता येणार नाही’ असे तत्त्व न्यायलायाने घालून दिले. स्वामी केशवानंद जिंकले!

या प्रकरणाची सुनावणी ६८ दिवस चालली. सरन्यायाधीश एस एम सीक्री, न्या. एस. हेगडे, न्या. ए. के मुखरेजा, न्या. जे एम शेलात, न्या. ए एन ग्रोवर, न्या. पी जगनमोहन रेड्डी आणि न्या. एच आर खन्ना या सात न्यायाधीशांच्या मतानुसार निर्णय देण्यात आला. तर देण्यात आलेल्या निर्णयाच्या विरोधी मत असणाऱ्या न्यायाधीशांमध्ये न्या. ए. एन रे, न्या. डी जी पालेकर, न्या. के के मॅथ्यू, न्या. एम एच बेग, न्या. एस एन द्विवेदी, न्या. चंद्रचूड यांचा समावेश होता.

पण काँग्रेसी गप्प बसणार नव्हते. हिंदुंची मंदिरं, त्यातील दागिने व इतर संपत्ती घश्यात घालायच्या दृष्टीने मग इंदिरा गांधी यांनी १९७६ साली ४२वी घटनादुरुस्ती करून सरकारने जर घटना बद्दलली तर कोर्ट ती बेकायदेशीर ठरवू शकणार नाही अशी कलम ३६८ मध्ये २ उपकलमं घुसवली! आनंद जास्त वेळ टिकला नाही. १९८० मध्ये मिनर्व्हा मिल्स vs भारत सरकार केसमध्ये इंदिरा गांधी यांनी घुसवलेली ही कलमच कोर्टाने घटनाबाह्य ठरवली आणि स्वामी केशवानंद यांच्या विजयी लढ्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं!

आज वयाच्या ७९ व्या वर्षी पूज्य श्री स्वामी केशवानंद भारती यांना त्यांनी जिकडून हा लढा दिला, त्याच कासरगोड जवळ इडनीर येथील (त्याच) मठात देवाज्ञा झाली.

२०२० : पूज्य श्री स्वामी केशवानंद भारती यांचे निधन ( जन्म : ९ डिसेंबर, १९४०)

  • घटना :
    १५२२: फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.
    १९३९: दुसरे महायुद्ध – दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
    १९५२: कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र माँट्रिअल येथे सुरू झाले.
    १९६५: पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली.
    १९६६: दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.
    १९६८: स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.
    १९९३: ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड.
    १९९७: अमेरिकेच्या नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस संस्थेची सरोदवादक अमजद अली खाँ यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली.

• मृत्यू :

• १९६३: कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १८८३)
• १९७२: जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार में सन पद्म भूषण उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांचे निधन. (जन्म : ८ ऑक्टोबर, १८६२)

  • जन्म :
    १८८९: स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी १९५०)
    १९०१: भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १९९७)
    १९२९: हिंदी चित्रपट निर्माते यश जोहर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००४)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »