पं. जितेंद्र अभिषेकी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज रविवार, सप्टेंबर २१, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक ३० शके १९४७
सूर्योदय : ०६:२७ सूर्यास्त : १८:३६
चंद्रोदय : चंद्रोदय नहींचंद्रास्त : १८:२०
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : भाद्रपद
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अमावस्या – ०१:२३, सप्टेंबर २२ पर्यंत
नक्षत्र: पूर्वाफाल्गुनी – ०९:३२ पर्यंत
योग : शुभ – १९:५३ पर्यंत
करण : चतुष्पाद – १२:४६ पर्यंत
द्वितीय करण : नाग – ०१:२३, सप्टेंबर २२ पर्यंत
सूर्य राशि: कन्या
चंद्र राशि : सिंह – १५:५७ पर्यंत
राहुकाल : १७:०५ ते १८:३६
गुलिक काल : १५:३३ ते १७:०५
यमगण्ड : १२:३१ ते १४:०२
अभिजित मुहूर्त : १२:०७ ते १२:५६
दुर्मुहूर्त: १६:५८ ते १७:४७
अमृत काल : ०३:३८, सप्टेंबर २२ ते ०५:२२, सप्टेंबर २२
वर्ज्य : १७:१७ ते १९:०१

मी आपल्या पूर्वजांचा ऋणी आहे, ज्यांनी अनेक शतके परकीयांची आक्रमणे झेलत आपला हिंदू धर्म टिकवत धर्माची ध्वजा फडकती ठेवली.

वर्षभरात तसेच पितृपक्षात जे कुणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकले नाहीत, ज्या मृतांची नक्की तिथी माहीत नाही किंवा आजारपण, बदली, दौरे अशा अनेक कारणांमुळे जे कुणी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करू शकलेले नाहीत. ते सर्वजण सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध कार्य करू शकतात. तसेच पौर्णिमा, अमावास्या आणि चतुर्दशी या तिथींनी निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्ध कार्यही सर्वपित्री अमावास्येला करावे, असे सांगितले जाते.

पूर्वजांच्या ऋणातून उतराई होऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करण्यात येतो. यावेळी कावळा, गाय, श्वान यांना काकबळी काढून ठेवावा, असे सांगितले जाते.

आज सर्वपित्री अमावस्या आहे.

२१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर दिन म्हणून ओळखला जातो. साजरा केला जातो असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण आनंद देणारे क्षण किंवा विषय साजरे केले जातात. अल्झायमर विकारात खूप यातना दडल्या आहेत.

आज आंतरराष्ट्रीय अल्झायमर दिन आहे.

जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून साजरा केला जातो. शांतता दिवस देशांमध्ये आणि लोकांमध्ये स्वातंत्र्य, शांतता आणि आनंदाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो. संपूर्ण पृथ्वीवर शांतता आणि अहिंसा प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा केला जातो.

।। जे खळांची व्यंकटी सांडो | तयां सत्कर्मीं रती वाढो || भूतां परस्परें जडो | मैत्र जीवांचें ||
।।दुरिताचें तिमिर जावो | विश्व स्वधर्म सूर्यें पाहो || जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात ||

आज आंतरराष्ट्रीय शांतता दिन आहे.

         "राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय इदं न मम"

भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या आयुष्याला आकार, दिशा व अस्तित्व देणा-या व्यक्तीच नाव आहे , स्व. लक्ष्मणराव इनामदार. लक्ष्मणरावांचा जन्म २१ सप्टेंबर १९१७ रोजी खटाव – सातारा येथे झाला. एलएलबी. करीत असताना हैद्राबादच्या निजामाविरुद्धच्या आंदोलनात 1939 साली त्यांनी उडी घेतली. १९४३ मध्ये वकील झाल्यावर संघाचा प्रचारक म्हणून नवसारीतून केलेली सुरुवात अखेरच्या श्वासानतंर थांबली . गुजरातमध्ये त्यांना आता वकील साहेब म्हणून ओळखू लागले होते .

१९५२ मध्ये लक्ष्मणराव संघाचे प्रांतप्रचारक झाले. सारा गुजरात त्यांनी पालथा घातला. जन्माने महाराष्ट्रयीन असले तरी वेष, भाषा यादृष्टीने ते सर्वार्थाने गुजराथी होते. नरेंद्र मोदी रामकृष्ण – मठ बेल्लूर मधून परत वडनगरला आले .

वडनगरला स्वयंसेवकांना लक्ष्मणराव संबोधित करीत असता मोदी प्रभावित झाले. लक्ष्मणरावांच्या प्रेरणेने १९७२ मध्ये मोदींनी संघाचे प्रचारक म्हणून सुरवात केली. कठोर शिस्त, प्रचंड मेहनत आणि लोकांशी संवाद करण्याच व प्रेरीत करण्याचे कौशल्य मोदींनी लक्ष्मणरावांकडून आत्मसात केले . मोदींना ते मुलांसारखे मानत. मोदींच्या आयुष्यावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. राजनितीबरोबर आसने, योगा, प्राणायाम याचेही धडे मोदींनी त्यांच्याकडून घेतले.

“वाजविली तर बासरी नाहीतर काठी”, हा दृष्टीकोन लक्ष्मणरावांनी मोदींना शिकविला. लक्ष्मणरावांच्या एका मंत्राचा नरेंद्रजी मोदी आयुष्यभर जागर करत आहेत – “समर्पित होवून देशाची सेवा करायची”

राष्ट्र पुनर्निर्माणाच्या प्रयत्‍नांत सहकाराचे महत्त्व ओळखून सहकारी चळवळीची गुणात्मक वाढ व्हावी, आणि या चळवळीत सुसंस्कारित कार्यकर्त्यांची फळी तयार व्हावी म्हणून लक्ष्मणरावांनी १९७८मध्ये सहकारभारती या संस्थेची स्थापना केली.

सहकारभारतीत आज २०१७ साली, भारतभरांतील ४०० जिल्ह्यांध्ये विखुरलेल्या २०,०००हून अधिक सहकारी संस्था आहेत.
कै लक्ष्मणराव इनामदार यांचे प्रमाणेच त्यांचे एक बंधू श्री तात्या इनामदार यांनी सुध्दा लक्ष्मणरावां प्रमाणेच सी . ए परिक्षा उत्तीर्ण झाल्या नंतर संघासाठी आजन्म संघ प्रचारकी जीवन व्रत घेतले. तसेच त्यांचे अजून एक बंधू श्री किसनभाऊ हे सुध्दा संघाचे काही वर्ष प्रचारक होते.
* “राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय इदं न मम”*

१९१७ : रा. स्व. संघाचे ज्येष्ठय प्रचारक लक्ष्मणराव इनामदार तथा वकील साहेब यांचा जन्म (भाद्रपद शु ५, ऋषि पंचमी) ( मृत्यु : १५ जुलै, १९८४ )

संगीत अभ्यासक – पं. जितेंद्र अभिषेकी –

सुस्पष्ट उच्चार,लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेऊन मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचं मर्म होतं.
गोव्यातील मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणार्या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात त्यांचा जन्म झाला. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून,माधुकरी मागून ते शिकले. त्यांनी एकूण २१ गुरु केले व प्रत्येक गुरुकडून नेमकं तेवढंच घेतलं. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायनशैली निर्माण केली.

संगीताची आराधना करत असताना त्यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही.ते संस्कृतचे पदवीधर होते.त्यांचे वाचन अफाट होते.संस्कृतपासून ते उर्दु शेरोशायरी पर्यंतचे कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते.

अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. विद्याधर गोखल्यांच्या नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून रंगभूमी पुन्हा टवटवित झाली ती १९६४ साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकामुळे.या नाटकातल्या पदांचं संगीत अभिषेकींचे होतं.त्यांनी एकूण १७ नाटकांना संगीत दिलं.गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.
अभिषेकींनी जसं स्वत: संगीत दिलं तसं दुसर्यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणी साठी केलेल्या बिल्हण या संगीतिकेत पु.लं.च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती. तर वैशाख वणवा या चित्रपटासाठी दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले गोमू माहेरला जाते हो नाखवा हे गीतही त्यांनी म्हटले.
१९८८ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

१९२९ : पद्मश्री पुरस्कार सन्मानित शास्त्रीय गायक व संगीत अभ्यासक पं. जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म ( मृत्यू : ७ नोव्हेंबर, १९९८ )

  • घटना :
    १७९२ : अठराव्या लुईचे साम्राज्य बरखास्त केले आणि फ्रेंच प्रजासत्ताकाचा जन्म झाला
    १९३४ : प्रभातच्या दामले यांनी सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन प्रभात चित्र मंदिर पुण्यात सुरु केले
    १९४२ : दुसरे महायुद्ध – युक्रेनमध्ये नाझींनी २८०० ज्यू लोकांची हत्या केली
    १९६४ : माल्टा देश युनाइटेड किंग्डम पासून स्वतंत्र झाला
    १९६८ : रिसर्च अँड अनॅलिसिस विंग ( RAW ) ची स्थापना झाली.
    १९८१ : बेलीझ देश युनाइटेड किंग्डम पासून स्वतंत्र झाला
    १९९१ : अर्मेनिया हा देश सोविएत संघापासून स्वतंत्र झाला

• मृत्यू :

१७४३ : जयपूर संस्थांचे राजे सवाई जयसिंग यांचे निधन ( जन्म : ३ नोव्हेंबर, १६८८ )
१९८२ : मराठी कवी, कलाकार व अनुवादक सदानंद रेगे यांचे निधन ( जन्म : २१ जून, १९२३ )
१९९२ : चित्रपट निर्माते रटरचंद बडजात्या यांचे निधन ( जन्म : १० मे, १९१४ )
२०१२ : पत्रकार, द हिंदू वृत्तपत्राचे संपादक गोपालन कस्तुरी यांचे निधन ( जन्म : १७ डिसेंबर, १९२४ )

  • जन्म :

१९३९ : भारतीय तत्वज्ञानी , शैक्षणिक अभ्यासक व राजकारणी स्वामी अग्निवेश यांचा जन्म ( मृत्यू : ११ सप्टेंबर, २०२० )
१९४४ : चित्रपट निर्माते, कवी, कलाकार, व सामाजिक कार्यकर्ते राजा मुजफ्फर अली यांचा जन्म

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »