घोडखिंड पराक्रम

आज रविवार, जुलै १३, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक २२, शके १९४७
सूर्योदय : ०६:०९ सूर्यास्त : १९:२०
चंद्रोदय : २१:२७ चंद्रास्त : ०८:१४
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : आषाढ़
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : तृतीया – ०१:०२, जुलै १४ पर्यंत
नक्षत्र : श्रवण – ०६:५३ पर्यंत
योग : प्रीति – १८:०१ पर्यंत
करण : वणिज – १३:२६ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – ०१:०२, जुलै १४ पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : मकर – १८:५३ पर्यंत
राहुकाल : १७:४१ ते १९:२०
गुलिक काल : १६:०२ ते १७:४१
यमगण्ड : १२:४४ ते १४:२३
अभिजितमुहूर्त : १२:१८ ते १३:११
दुर्मुहूर्त : १७:३४ ते १८:२७
अमृत काल२ : ०:२६ ते २२:०२
वर्ज्य : १०:५२ ते १२:२८
सरणार कधी रण प्रभू तरी
हे कुठवर साहू घाव शिरी ?
दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरि ही छाती
अजून जळते आंतर ज्योती
कसा सावरू देह परी ?
सरणार कधी रण प्रभू तरी !
हो तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातुन
मिटण्या झाले अधीर लोचन
खड्ग गळाले भूमिवरी
सरणार कधी रण प्रभू तरी ! – कवी – कुसुमाग्रज
” तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला “
छ. शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचण्यासाठी बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्दीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते.
सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. ही घटना दिनांक १३ जुलै, १६६० रोजी घडली.
मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले.
१६६०: घोडखिंड पराक्रमी बाजी प्रभू देशपांडे व मावळ्यांच्या पराक्रमाने पावन – खिंड झाली. ( जन्म : ३० ऑगस्ट,१६१५ )
सदाशिव गोरक्षकर : प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअममध्ये (आताचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) साहाय्यक अभिरक्षक म्हणून १९६४ मध्ये त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली.
संग्रहालयशास्त्रातील डॉक्टरेटदेखील त्यांनी मिळवली. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच कोकणातील देवरूख येथील लक्ष्मीबाई पित्रे कलासंग्रहालय साकारले गेले. तेथे इंग्रजकालीन बॉम्बे स्कूल ऑफ आर्टच्या शैलीतील चित्रकलेचे अत्यंत दुर्मिळ नमुने संरक्षित करण्यात आले आहेत.
‘राजभवन्स इन महाराष्ट्र’, ‘अॅनिमल्स इन इंडियन आर्ट’, ‘द मॅरिटाइम हेरिटेज ऑफ इंडिया’, ‘कार्ले केव्हस ऑफ वेस्टर्न इंडिया’, ‘कालिदास अँड द महायोगी ऑफ घारापुरी’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. या पुस्तकांच्या शीर्षकातून त्यांच्या लेखनाचे स्वरूप आणि व्याप्ती लक्षात येते.
महाराष्ट्राच्या दृष्टीने त्यांच्या हातून घडलेली अजून एक लेखनकृती म्हणजे ‘डॉन ऑफ सिव्हिलायजेशन ऑफ महाराष्ट्र’. यात त्यांनी उत्खननातून हाती आलेल्या तिसऱ्या शतकातील महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक नमुन्यांच्या आधारे इतिहासाच्या प्रदीर्घ कालौघातील महाराष्ट्राचा दीर्घ प्रवास अधोरेखित केला. तसेच त्यांनी पश्चिम भारतातील गुप्ताकालीन शिल्पकलेवरही लेखन केले.
त्यांच्या एकंदर कार्यकर्तृत्वाची दखल सरकार दरबारी वेळीच घेतली गेली आणि त्यांना २००३मध्ये ‘पद्मश्री’ हा नागरी सन्मान देउन गौरवण्यात आले होते. २०१६ मध्ये त्यांना ‘चतुरंग’च्या जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
२०१९ : पद्मश्री पुरस्कार सन्मानित ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह आणि जतन करण्याबद्दलचे शास्त्राचे तज्ञ सदाशिव वसंत गोरक्षकर यांचे निधन ( जन्म : ३१ मे, १९३३ )
नैसर्गिक अभिनय साकारणारे – निळू फुले ज्यांच्या आवाजाला कसलीच तोड नव्हती, ज्यांच्या डोक्यावरील सावकारी टोपीला कधी आराम नव्हता , असे हे अवघ्या महाराष्ट्राच्या “सरपंच” असलेले आपले लाडके अभिनेते ‘निळू फुले’.
मग अशा भूमिका निळूभाऊंच्या घरी रांग लावू लागल्या.
वास्तविक जीवनात अतिशय साधे आणि सरळ असणारे निळूभाऊ चित्रपटांमध्ये मात्र ‘नायिकांवर’ अत्याचाराच्या भूमिका साकारू लागले. कारण खलनायक या भूमिकेला न्याय देणं हे त्यांच्या इतकं कुणाला जमायचं नाही. अशाचवेळी निळूभाऊंचा ”बाई वाड्यावर या…” हा डायलॉग इतका काय गाजला की, जोवर मराठी चित्रपट सृष्टी आणि मराठी श्रोते आहेत तोवर हा डायलॉग कुणीच विसरणार नाही.
निळूभाऊंच्या अशा नायक-नायिकांवर चित्रपटात केलेल्या अन्यायी भूमिकेमुळे चित्रपट चाहते त्यांचा तिरस्कार करू लागले. मात्र हीच त्यांच्या अभिनयाची पावती होती की जी प्रेक्षांकडून त्यांना शेवटपर्यंत मिळत गेली.
त्यांच्या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार लाभले. त्यांत महाराष्ट्र शासनाचा ‘साहित्य संगीत अकादमी पुरस्कार’ सलग तीन वर्ष लाभला. असे अनके पुरस्कार निळूभाऊंना मिळाले. अनेक ठिकाणी त्यांना गौरवलं गेलं.
निळूभाऊंच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट होता- ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’. त्यानंतर मात्र प्रेक्षकांना निळूभाऊ पुन्हा रंगमंचावर कधीच दिसले नाहीत. आणि १३ जुलै २००९ रोजी निळूभाऊंनी शेवटचा श्वास घेतला आणि आपल्या सर्वांचा निरोप या महान कलाकाराने घेतला.
• २००९: हिंदी मराठी चित्रपट अभिनेते निळू फुले यांचे निधन. (जन्म: १६ मे, १९३० )
- घटना :
१९०८: ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.
१९२९: जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचा मृत्यू झाला.
१९५५: २८ वर्षीय रुथ एलिसला प्रियकराचा खून केल्याबद्दल फाशी दिली. ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली.
१९८३: श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तामिळ व्यक्तींची हत्या. ४,००,००० हून अधिक तामिळींचे पलायन.
२०११: मुंबई शहरात बॉम्बस्फोटांत २६ जण ठार, तर १३० जण जखमी.
• मृत्यू :
• १९६९: तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९०२)
• १९९०: क्रीडा समीक्षक व समालोचक अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ बॉबी तल्यारखान यांचे निधन.
• १९९४: धृपद गायक, संगीतकार शिक्षक पं.के. जी. गिंडे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर, १९२५)
• २०००: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका इंदिरा संत यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी , १९१४)
• २०१०: सुप्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग यांचे निधन. (जन्म: ८ मार्च१९३१)
- जन्म :
१८९२: जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७)
१९६४: भारतीय क्रिकेट खेळाडू उत्पल चॅटर्जी यांचा जन्म.