तिरंग्याचे जनक पिंगाली वेंकय्या

आज शनिवार, ऑगस्ट २, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक ११, शके १९४७
सूर्योदय : ०६:१६ सूर्यास्त : १९:१४
चंद्रोदय : १३:२७ चंद्रास्त : ००:४१, ऑगस्ट ०३
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : श्रावण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : अष्टमी – ०७:२३ पर्यंत
नक्षत्र : विशाखा – पूर्ण रात्रि पर्यंत
योग : शुक्ल – पूर्ण रात्रि पर्यंत
करण : बव – ०७:२३ पर्यंत
द्वितीय करण : बालव – २०:३४ पर्यंत
सूर्य राशि : कर्क
चंद्र राशि : तूळ – २३:५२ पर्यंत
राहुकाल : ०९:३० ते ११:०७
गुलिक काल : ०६:१६ ते ०७:५३
यमगण्ड : १४:२२ ते १५:५९
अभिजित मुहूर्त : १२:१९ ते १३:११
दुर्मुहूर्त : ०६:१६ ते ०७:०८
दुर्मुहूर्त : ०७:०८ ते ०७:५९
अमृत काल : २०:४३ ते २२:३०
वर्ज्य : ०९:५७ ते ११:४४
भारतीय तिरंग्याचे जनक पिंगाली वेंकय्या- वयाच्या १९व्या वर्षीच ते ब्रिटीश लष्करात भरती झाले. ते दक्षिण आफ्रिकेमधील अँग्लो बोएर युद्धामध्ये सैनिक म्हणून ब्रिटिशांच्या बाजूने लढले. याच काळात त्यांची आणि महात्मा गांधींची दक्षिण आफ्रिके मध्ये भेट झाली. त्यानंतर पुढील पन्नास वर्षाहून अधिक काळ हे दोन्ही नेते एकमेकांच्या संपर्कात होते.
पिंगली हे जियोलॉजीमध्ये डॉक्टरेट होते. ते हिरे खाण उत्खन्नातील तज्ञ होते. त्यामुळेच त्यांना डायमंड वेंकैया हे टोपणनाव देण्यात आले होते.त्याचप्रमाणे कापसावरील संशोधनामध्ये त्यांना विशेष स्वारस्य असल्याने त्यांना कॉटन वेंकैया नावानेही ओळखले जायचे. त्यांना उर्दू तसेच जपानी भाषेबरोबरच इतरही अनेक भाषा अवगत होत्या.
३१ मार्च १९२१ मध्ये पिंगाली यांनी विजयवाडा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीमध्ये भगव्या आणि हिरव्या रंगाचा झेंडा भारतीय राष्ट्रध्वज म्हणून सादर केला. मूळचे जालंधरच्या असणाऱ्या लाला हंसराज यांनी या झेंड्यावर चरखा असावा असे सांगत चरख्यासहीत हा झेंडा सादर केला तर गांधीजींनी भगव्या आणि हिरव्या रंगाच्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या पट्टीचा सल्ला दिला. आणि अशाप्रकारे तिरंग्याचा जन्म झाला.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पिंगली यांच्या कल्पनेतून साकारलेल्या तिरंगी झेंड्याला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून मान्यता मिळाली.
भारतीय संविधान समितीने २२ जुलै १९४७ रोजी तिरंगा झेंडा भारताचा राष्ट्रध्वज असल्याचे जाहीर केले. पिंगली यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली. भारताचा तिरंगा दिल्लीतील लाल किल्ल्यावर फडकताना पाहण्याची त्यांची इच्छा होती. मात्र त्यांच्या कुटुंबाकडे त्यांना दिल्लीला पाठवण्याइतके पैसे नसल्याने त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
१९६३ साली पिंगली यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर काही दशकांनी २००९ साली भारतीय पोस्ट खात्याने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले. स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी हे तिकीट जारी करण्यात आले होते. २०११ साली भारतरत्न पुरस्कारासाठी (मरणोत्तर) पिंगली यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.
१८७६ : भारतीय तिरंग्याचे जनक पिंगाली वेंकय्या यांचा जन्म (मृत्यू : ४ जुलै, १९६३)
सिंधी समाजाचे धार्मिक गुरू म्हणून दादा वासवानी यांची ओळख होती. त्यांचा जन्म सध्याचे पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील हैदराबाद येथे झाला.. ते अविवाहीत होते. त्यांचे शिक्षण बी.एस्सी., एम.एस्सी.भौतिकशास्त्र तसेच एल.एल.बी. पर्यंत झाले होते. त्यांनी आयुष्यभर शाकाहाराचा प्रचार-प्रसार करतानाच प्राण्यांच्या जतन आणि संवर्धनासाठीही मोठं काम केलं होतं. त्यांनी अध्यात्मावर एकूण १५ पुस्तके लिहिली आहेत. शिकागो येथील जागतिक धर्म संसद आणि न्यूयॉर्क येथील जागतिक शांतता परिषदेला त्यांनी संबोधित केलं होतं.
१९१८ : सिंधी समाजातील ऋषितुल्य व्यक्तीमत्व, अध्यात्मिक गुरु दादा जे. पी. वासवानी यांचा जन्म (मृत्यू : १२ जुलै, २०१८)
घटना :
१६७७ : छत्रपती शिवाजी महाराज तामिळनाडूतील विरूधाचलम येथे देवदर्शनास गेले. त्यावेळी त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.
१७९० : अमेरिकेत पहिली जनगणना सुरु झाली
१८७०: जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची टॉवर सबवे ची लंडन मध्ये सुरवात झाली.
१९५४ : दादरा व नगर हवेली प्रांत पोर्तुगीजांकडून ताब्यात घेतला
१९९० : इराकने कुवेतवर आक्रमण केले त्यामुळे गल्फ युद्ध सुरु झाले.
१९९६: अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत, एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकवला.
- मृत्यू :
१७८१ : पेशवाईतील मुत्सद्दी, साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे सखाराम बापू बोकील यांचे निधन
१९८० : पद्म भूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध बंगाली मूर्तिकार रामकिंकर बैज यांचे निधन. (जन्म : २५ मे, १९१०)
२००४ : प्रसिद्ध मल्याळी, इंग्लिश, संस्कृत लेखक व्ही. बालकृष्णन यांचे निधन (जन्म : १३ फेब्रुवारी, १९३२)
जन्म :
१८६१ : भारतीय रसायन शास्त्रज्ञ, बेंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल कंपनी चे संस्थापक आचार्य प्रफुल्ल चन्द्र रे यांचा जन्म (मृत्यू : १६ जून, १९४४)
१८८६: आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ रामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९५७)
१८७७ : भारतीय वकील व राजकारणी रवीशंकर शुक्ला यांचा जन्म (मृत्यू : ३१ डिसेंबर, १९६५)
१९१० : कादंबरीकार, नाटककार, कवी व समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म (मृत्यू : १७ फेब्रुवारी, १९७८)
१९२९ : राजकारणी विद्या चरण शुक्ला यांचा जन्म (मृत्यू : ११ जून, २०१३)
१९४५: भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ते बंकर रॉय यांचा जन्म.