राम मंदिरात वापरली उसाच्या बगॅसची भांडी : मोदी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

दहा वर्षांत ऊस उत्पादकांना १ लाख कोटी मिळाल्याचा दावा

नवी दिल्ली : ऊस हे महत्वाचे पीक असून, त्याच्या उपपदार्थांमुळे जीवाश्म इंधनावरील (पेट्रोलियम) अवलंबित्व कमी होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी केले. तसेच उसापासून पर्यावरणपूरक वस्तू बनतात. अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापना सोहळ्यावेळी बगॅसपासून बनवण्यात आलेले कप, ताट, वाट्या, चमचे अशी विविध प्रकारणची भांडी वापरण्यात आली, अशी माहितीही त्यांनी दिली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरकारने इथेनॉल डिस्टिलरीजमध्ये ₹40,000 कोटींची गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत, असेही सांगितले. ‘द मिंट’ने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.
.
“अयोध्येतील राममंदिराच्या अभिषेक समारंभात वापरण्यात आलेले कप, ताट, वाट्या आणि चमचे हे उसाच्या बगॅसपासून बनवले गेले होते. दैनंदिन जीवनात अशा गोष्टींचा वापर केल्याने उसाच्या उपपदार्थांची उपयुक्तताही वाढली आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पोटॅशची गरज भागवण्यासाठी भारत आयातीवर अवलंबून आहे, परंतु उसाच्या मदतीने ते कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.

“सध्या आपण पोटॅशची गरज भागवण्यासाठी आयातीवर अवलंबून आहोत. मात्र, उसाच्या बगॅसच्या सहाय्याने हे अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. उसाच्या उपउत्पादनांपैकी एक असलेल्या प्रेस-मडचा वापर देखील केला जातो. तो हळूहळू वाढत आहे. एक तर ते जैव खत म्हणून वापरले जात आहे. दुसरे म्हणजे, प्रेस-मड देखील CBG किंवा कॉम्प्रेस्ड बायोगॅसच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे,” असे ते म्हणाले.

इथेनॉलच्या मिश्रण योजनेसह अन्य बाबींवर बोलताना त्यांनी, शाश्वत विकासासाठी सरकारच्या प्रयत्नांना कशी बळकटी दिली याबाबतही त्यांनी सांगितले.

“आम्ही पाच महिन्यांपूर्वी पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य गाठले होते. सध्या ते 12% पर्यंत पोहोचले आहे आणि आम्ही 20% पर्यंत इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर आहोत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

जैवइंधन आणि पर्यावरणाबाबत भारताच्या वचनबद्धतेबद्दल, पंतप्रधान मोदी म्हणाले की, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या धोरणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या 10 वर्षांत एक लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे.

“आम्ही इथेनॉल मिश्रण योजनेद्वारे शेतकऱ्यांना एक लाख कोटी रुपये देणार आहोत, असे मी जाहीर केले असते तर माध्यमांची हेडलाइन झाली असती. देशभर चर्चेचा विषय झाला असता. परंतु मला त्यात रस नाही, ऊस शेती आणि उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकडे आमच्या सरकारचे लक्ष आहे’’, असे प्रतिपादन मोदी यांनी केले.

इथेनॉल डिस्टिलरीजवर पंतप्रधान म्हणाले की सरकारने इथेनॉल डिस्टिलरीजमध्ये ₹ 40,000 कोटींची गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत.

“आम्ही जीवाश्म इंधनावरील आमचे अवलंबित्व झपाट्याने कमी करत आहोत आणि त्या मिशनमध्ये उसाच्या उप-उत्पादनांची खूप मदत झाली आहे. ऊसाच्या बगॅसमुळे विजेच्या उत्पादनातही वाढ झाली आहे. ऊसाच्या बगॅस आणि बायोमास कोजनरेशन प्लांटची उत्पादन क्षमता वाढली आहे. देशात सातत्याने वाढ होत आहे,” असे ते म्हणाले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »