परिवर्तन विरुद्ध नवपरिवर्तन पॅनेलमध्ये प्रमुख लढत

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच 20 जून 1920 रोजी स्थापन झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळ सन 2024 ते 2029 या कालावधीकरिता निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झालेला असून या निवडणुकीत पोलिस कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग दर्शविल्यामुळे चुरस निर्माण झालेली आहे.

13 जागांसाठी 57 उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले असून उमेदवारी माघार घेण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी असून त्यानंतर खरी लढतीचे चित्र स्पष्ट होईल. मात्र प्रामुख्याने दोन पॅनेल निर्माण झाले असून विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील सहभागाने परिवर्तन पॅनेल तर विरुद्ध नवनिर्वाचित उमेदवारांनी नवपरिवर्तन पॅनेल तयार करून प्रचारात आघाडी घेतली आहे. खरी लढत परिवर्तन विरुद्ध नवपरिवर्तन पॅनेलमध्ये होत असून निवडणूक प्रचारार्थ विरोधी पॅनेलकडून विद्यमान पदाधिकाऱ्यांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या जात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या या सोसायटी निवडणुकीत चांगलाच राजकीय रंग भरला आहे.

नवपरिवर्तन पॅनेल व परिवर्तन पॅनेलच्या उमेदवार निवडी झालेल्या आहेत. काही अपक्ष उमेदवार देखील स्वतंत्रपणे प्रचारात मग्न आहेत. पुणे शहर व जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची दि पूना डिस्ट्रीक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटी एकमेव क्रेडिट सोसायटी असून एकूण 13 जागांसाठी 11 हजार 206 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार सोसायटीचे एकूण सभासद संख्या साधारण 12 हजार 355 असुन एकुण भागभांडवल (काटकसर निधीसह) 141 कोटी रुपये इतके आहे.

दि पूना डिस्ट्रीक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या संचालक मंडळ सन 2024 ते 2029 या कालावधीकरिता निवडणूक कार्यक्रम 29 जानेवारी 2024 रोजी निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर-2 मा. निलम पिंगळे यांनी जाहीर केला असून 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती तर नामनिर्देशन पत्र माघार घेण्याचा कालावधी 20 फेब्रुवारी 2024 तारखेपर्यंत असून चिन्ह वाटप व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी 21 फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार 5 मार्च 2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 6 मार्च 2024 रोजी मतमोजणी करण्यात येऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. एकूण 11 हजार 206 मतदार पुणे शहर व जिल्ह्यातील 44 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार असून सर्व मतदान केंद्र पोलीस स्टेशन मध्येच आहेत.

दि पूना डिस्ट्रीक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप होत असल्याने सोसायटीच्या कारभाराच्या सुरेल कथा चर्चिल्या जात आहेत. विशेषतः सोसायटीच्या मालकीच्या चारचाकी वाहन आरोपांच्या केंद्र स्थानी आहे. त्या वाहनावर वाहतूक नियमांचा भंग व दंडात्मक कारवाई, वाहनाची आवश्यकता होती का? तसेच सोसायटीकडून बंदोबस्तासाठी देण्यात येणाऱ्या जेवण त्याचे असमान वाटप, यासह अन्य मुद्यांच्या प्रश्नांचे काहूर प्रचाराच्या वादळात घुमत आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांनी देखील प्रचारात कंबर कसली असून आरोपांना चोख प्रत्युत्तरादाखल संबंधितांना कायदेशीररीत्या नोटीसा पाठवण्याचा इशारा देखील दिला आहे.

2017 मध्ये एका सभासद पोलीस उपनिरीक्षकाने सोसायटीच्या विरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये चक्क फसवणुकीची तक्रार दिलेली होती त्यावेळी देखील सोसायटीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला जात आहे. दरम्यान मागील निवडणुकीतील आकडेवारी पाहता अपक्ष उमेदवारांना मतदारांकडून डावलण्यात गेलेले होते आहे.परंतु पॅनल मधील उमेदवारीच्या निवडीला त्यांचा फटका बसू शकतो.मागील निवडणुकीत एकूण चार पॅनल मध्ये लढत झालेने मत विभागणी झालेली होती. या निवडणुकीत विद्यमान काही पदाधिकऱ्यांच्या पॅनल विरोधात ३ पॅनलने एकत्र मिळून नवनिर्माण पॅनल उभारले असून त्याला विद्यमान संचालक श्री नामदेव आप्पा रेणुसे व श्री.सचिन उगले यांनी सुद्धा पाठिंबा दिल्याने नवपरिवर्तन पॅनलचे पारडे सरस असल्याचे दिसून येते.

श्री.संपतराव जाधव, अध्यक्ष शिखर संस्था मा.व्हाईस चेअरमन पोलीस सोसा. व दत्तात्रय गिरमकर (अण्णा) मा.संचालक पोलीस सोसा. यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.महेश (पितांबर) गंबरे यांची पॅनेल प्रमुख व श्री.महेश गायकवाड यांची प्रचार प्रमुख म्हणून एकमताने निवड करून सर्वांच्या मान्यतेने पॅनेल मधील उमेदवारांची निवड केली आहे. दि पूना डिस्ट्रीक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटीचा नावलौकिकता वाढविण्यासाठी व सभासदांच्या हक्कांसाठी नवपरिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून विकासात्मक जाहीरनामा घेऊन आम्ही मतदारांपर्यंत जात आहोत. आम्हाला विद्यमान संचालकांवर केवळ आरोप करण्यासाठी नव्हे तर प्रामाणिक, गतिमान प्रशासन देण्यासाठी नवपरिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवीत आहोत. मतदारांचा आमच्या पॅनेलच्या उमेदवारांना भरघोस पाठींबा मिळत असल्याने निश्चितपणे यश मिळेल असा निर्धार नवपरिवर्तन पॅनलचे मार्गदर्शक दत्तात्रय गिरमकर यांच्यासह पदाधिकारी यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष श्री. प्रशांत लक्ष्मण शिंदे यांच्या पुढाकाराने व कैलास गावडे सरांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून या निवडणुकीस सामोरे जात आहेत. या परिवर्तन पॅनेलमध्ये विद्यमान उपाध्यक्ष राजेंद्र पालांडे आणि विद्यमान संचालक दिपक वर्पे व विनायक जाधव यांचा समावेश आहे. अन्य नवनिर्वाचित उमेदवार परिवर्तन पॅनेलमध्ये आहेत. एकाच ध्यास सर्व सभासदांचा सर्वांगीण विकास या उद्घोषणेने परिवर्तन पॅनेल प्रचार करीत आहे. परिवर्तन विरुद्ध नवपरिवर्तन पॅनेलमध्ये प्रमुख लढतीने प्रचारातील रंगत आली असून शहर व जिल्ह्यातील सभासदांच्या अर्थातच पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये निवडणुकीबाबत उत्कंठा दिसून येत आहे.

दि पुना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या 5 मतदारसंघातील 13 जागांसाठी एकूण 57 नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल झालेले आहेत.

१. सर्वसाधारण या मतदारसंघासाठी 8 जागांसाठी 28 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत यामध्ये खालीलप्रमाणे उमेदवारांची नावे आहेत- 1.जाधव विनायक एकनाथ, 2.शिंदे प्रशांत कलक्ष्मण, 3.गावडे अनिल बाळासाहेब, 4.पालांडे राजेंद्र आत्माराम, 5.गायकवाड अमोल अरुण, 6.मोमिन इम्तियाज दस्तगीर, 7.वर्पे दिपक विठठल , 8.डोळस सुधीर हरिश्चंद्र, 9.काळभोर उदयकुमार सुदाम, 10.घोरपडे विठ्ठल अनिल, 11.गडांकुश दिनेश प्रल्हाद, 12.दावणे महावीर म-याप्पा, 13.नरुटे शशिकांत हरीदास, 14.भोंग अनिल मनोहर, 15.कदम सुमित लहू, 16.भोकरे मनोज सोमेश्वर, 17.तांबोळी जमीर बाबालाल, 18.गायकवाड महेश वसंत, 19.गोरे गणपत धोंडीबा, 20.सरोदे गणेश रामदास, 21.भाटे विलास एकनाथ, 22.खोमणे रक्मिणी गुलाब, 23.जठार रमेश पांडुरंग, 24.ताठे अनिल तुकाराम, 25.गवळी गणेश शिवाजी, 26.जगताप गणेश अशोक, 27.भोसले सुशांत राजेंद्र, 28. राजेंद्र बाळकृष्ण मारणे यांचा समावेश आहे.

२. महिलांसाठी राखीव या मतदारसंघासाठी 2 जागांसाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत यामध्ये खालीलप्रमाणे उमेदवारांची नावे आहेत- 29.थोरात उषा राहूल 30.काळे अनुपमा दिपक, 31.तायडे अर्चना राहुल, 32.राठोड आशा चुनीलाल, 33.गोडगे वैशाली अशोक, 34.शिदे सीमा शंकरराव यांचा समावेश आहे.

३. अनुसूचित जाती- जमाती प्रवर्ग या मतदारसंघासाठी 1 जागेसाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत यामध्ये खालीलप्रमाणे उमेदवारांची नावे आहेत- 35.बगाड संतोष काशिनाथ, 36.गडांकुश दिनेश प्रल्हाद, 37.फ़ासगे आकाश नारायण, 38.भाटे विलास एकनाव, 39.तिटकारे दिनेश मंगल, 40.शिवशरण अविनाश श्रीमंत यांचा समावेश आहे.

४. इतर मागासवर्ग या मतदारसंघासाठी 1 जागांसाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत यामध्ये खालीलप्रमाणे उमेदवारांची नावे आहेत- 41.ताठे अनिल तुकाराम, 42.भोग अनिल मनोहर, 43.नदाफ इम्रानखान सिकंदर, 44.शिंदे प्रशांत लक्ष्मण, 45.तांबोळी जमीर बाबालाल, 46.जगताप गणेश अशोक यांचा समावेश आहे.

५. भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागासवर्ग या मतदारसंघासाठी 1 जागेसाठी 11 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत यामध्ये खालीलप्रमाणे उमेदवारांची नावे आहेत- 47.माने राहूल रामचंद्र, 48.पांढरे गोविंद हेबंत, 49.गंबरे पितांबर सदाशिव, 50.गोरे गणपत धोंडीबा, 51.पवार बळीराम वामन, 52.हांगे दादासाहेब विष्णू, 53.सामसे महावीर लक्ष्मण, 54.गवळी गणेश शिवाजी, 55.खुणवे राकेश शिवाजी, 56.शिंदे गणेश दत्ता, 57.म्हेत्रे धनेश नागनाथ यांचा समावेश आहे.

केंद्र निहाय मतदान पाहिल्यास सर्वाधिक मतदान 20 क्रमांकाच्या केंद्रावर 1868 असून सर्वाधिक कमी मतदान 6 क्रमांकाच्या केंद्रावर 39 इतके आहे. निवडणुकीसाठी केंद्र क्र. व मतदार संख्या खालीलप्रमाणे- 1-102, 2-108, 3-178, 4-164, 5-122, 6-39, 7-125, 8-252, 9-207, 10-709, 11-158, 12-35, 13-226, 14-118, 15-151, 16-393, 17-709, 18-447, 19-214, 20-1868, 21-50, 22-220, 23-313, 24-190, 25-74, 26-433, 27-94, 28-89, 29-105, 30-142, 31-252, 32-242, 33-137, 34, 260, 35-67, 36-92, 37-100, 38-393, 39-85, 40-86, 41-173, 42-168, 43-839, 44-277, एकूण मतदार संख्या- 11206 अशा प्रकारे आहे.

चंद्रकांत भुजबळ

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब…

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »