अतिवृष्टीबाधित मराठवाड्याच्या मदतीला पुणेकर सारसावले

आवडल्यास ही बातमी शेअर करा

रविवारी होणार साहित्य संकलन

पुणे : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात प्रचंड नुकसान झाले आहे, लाखो शेतकरी बांधव उघड्यावर आले आहेत. त्यांना मदतीचा हात पुढे करत, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी पुण्यातील जागृती ग्रुप पुढे सरसावरला आहे. मराठवाड्यातील आपल्या बांधवांना सढळ हस्ते जमेल ती मदत करण्याचे आवाहन संस्थेचे केले असून, त्यासाठी येत्या २८ सप्टेंबरला, अन्नधान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचे संकलन केले जाणार आहे.

मराठवाड्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या विनाशकारी परिस्थितीत तेथील जनतेला मदत करण्याची गरज आहे. पिके गेली, शेती गेली, डोक्यावरील छप्परही गेले असे सर्वस्व हरवलेले अतिवृष्टीबाधित बांधव, मदतीसाठी उर्वरित महाराष्ट्रातील जनतेकडे आशेने पाहत आहेत. आपत्तीमुळे बाधित झालेल्यांमध्ये हजारो लहान मुलांचाही समावेश आहे. शासकीय स्तरावरून मदत सुरू आहे; मात्र जिथे आभाळच फाटले आहे, तिथे आणखी मदतीची गरज आहे, म्हणून आपण आपला मदतीचा हात त्यांच्यापुढे करू या, असे आवाहन जागृती ग्रुपचे अध्यक्ष राज देशमुख यांनी केले आहे.

फर्ग्युसन येथे मुख्य मदत संकलन केंद्र उभारण्यात आले असून, रविवार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७ ते संध्या. ५ या वेळेत पुणेकरांनी जमेल त्या स्वरूपात मदत करावी, असे आवाहन जागृती ग्रुपने केले आहे.

अशी साहित्यरूपी मदत करू शकता

  • तांदुळ, गव्हाचे पीठ, तुरडाळ, मुगडाळ, हरभरा डाळ, बिस्कीट पुडे, मॅगी पॅक, फरसाण, नमकीन, पोहे, साखर, टूथपेस्ट, आंघोळीचा साबण, चहा पावडर आदी.
  • ब्लॅंकेट, चादर, टॉवेल, बेडशीट (फक्त नवीन)

मदत देण्यासाठी पुढील स्वयंसेवकांशी संपर्क साधावा.

  • नारायण: ९१५८०५९१७५, संदीप: ९८११२०८१५०, शुभं: ९०७५८३८३९६, प्रशांत: ९८२२८८८८९३, किशोर: ९८८१९०३६१४, रवी: ९८२२१६४८३०,

अशा संकटसमयी पुणेकरांनी नेहमीच मदतीसाठी हात पुढे केलं आहेत, यावेळेसही मराठवाड्यातील हजारो नागरिकांसाठी पुणेकर मदतीचे हात पुढे करतील, असा विश्वास जागृती ग्रुपने व्यक्त केला आहे.

जागृती ग्रुप आपत्कालीन परिस्थितीत सर्वांच्या मदतीला धावून जाणारी संस्था आहे. दक्षिण महाराष्ट्रात महापूर आला तेव्हा या संस्थेने २५ ट्रक जीवनावश्यक साहित्य नागरिकांसाठी पाठवले होते. त्यावेळीदेखील पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली होती.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »